फुलेनामा
राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी
‘फुलेनामा’त काय हवे ?
महात्मा फुले भारतीय स्वातंत्र्याचे पहिले उद्गाते. शिवराज्य आणि बळीराज्याचे पुरस्कर्ते. समतेचे महामेरू. स्त्री मुक्तीचे क्रांतीसूर्य. शेतकर्यांचे असूड.
महात्मा फुले म्हणजे जातीविद्रोह. मानवमुक्तीच्या लढ्याचे युगपुरुष.
समान शिक्षण हक्काचे प्रणेते, इतिहास आणि धर्म शास्त्राचे चिकित्सक सत्यशोधक, बंडखोर साहित्यिक, शेतकरी आणि कामगार चळवळींची प्रेरकशक्ती, उद्योग आणि व्यापारातील बहुजन प्रवर्तक. कितीतरी क्षेत्रात फुले यांनी योगदान दिलं. तेही मूलभूत.
स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय. दोन्ही विचारांची लढाई फुलेंनी सुरू केली.
महाराष्ट्र आणि भारत महात्मा फुलेंच्या विचारांवरच उभा आहे. म्हणून ते राष्ट्र पितामह. बापाचे बाप.
महात्मा फुलेंची जन्म द्विशताब्दी साजरी करायची म्हणजे काय करायला हवं आपण?
सरकारकडे काय मागणी करता येईल ?
‘फुलेनामा’ तयार करण्यासाठी आपल्या प्रत्येकाची सूचना महत्त्वाची आहे. ‘फुलेनामा’ साठी आपल्या सूचना / अभिप्राय / टीपण [email protected] या इमेल आयडीवर जरूर पाठवा.
आपले स्नेहांकित,
कपिल पाटील, ज्ञानेश महाराव
निमंत्रक, राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समिती
शासकीय यंत्रणांवरील लोकांचा उरलेला विश्वास तुकाराम मुंडे, जयंत मीणा आणि पवन बनसोड यांसारख्या निष्ठावान, निर्भीड आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे टिकून आहे. मोहाला अन् दबावाला न जुमानता कायद्याचं राज्य आणि जनहित सर्वोच्च मानणाऱ्या अशा अधिकाऱ्यांमुळेच सामान्य माणसाला न्यायाची आशा वाटते.
लाखो शिक्षक उमेदवारांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळणाऱ्या टीईटी पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना भिवंडी पोलिसांनी डी.सी.पी. पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा, दिल्ली आणि बिहारमधून अटक करून मोठी कारवाई केली आहे. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास हादरवणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश होणं महत्त्वाचं होतं.
मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी नागरिकांना ‘पेन किलर’च्या नावाखाली उंदीर मारण्याचे विषारी औषध देणाऱ्या गुन्हेगाराला डी.सी.पी. जयंत मीणा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी तात्काळ अटक केली. वेळेत हस्तक्षेप झाला नसता तर १४ हजार गोळ्यांनी शेकडो निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात आले असते.
या दोन्ही घटनांमध्ये तातडीने कारवाई करणाऱ्या पोलीस दलाचे आणि भेसळखोरांचा जीवघेणं जाळं मोडून काढणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
समाजाच्या सुरक्षिततेसाठी अशा कठोर आणि सजग कारवाया सातत्याने होत राहिल्या पाहिजेत.
#tukarammunde #jayantmeena #pawanbansod #tetscam #mumbaipolice #MaharashtraPolice
कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.
आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे.
“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.
विश्वास बसत नव्हता, पण आमदार संजय गायकवाड यांनी स्वत:च कबुली दिली आहे, की आवाज त्यांचा आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचं त्यांनी उघड समर्थन केलं आहे.
त्यांनी केवळ शिव्याच दिल्या नाहीत तर प्रशांत आंबीच्या आई आणि पत्नीवर अत्याचार करण्याची धमकी दिली आहे. परस्त्रीला माते समान मानणार्या छत्रपती शिवरायांचा इतका अपमान कुणी केला नसेल.
गायकवाड यांना सरकार माफ करणार की कारवाई करणार ? की त्यांचं मराठी भाषेवरील अगाध प्रभुत्व पाहून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांच्याकडे रिक्षावाल्यांना मराठी शिकायला पाठवणार ?
प्रशांत आंबी यांच्या संयमाला आणि हिमतीला सलाम !
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@Chh_Udayanraje@Shivendraraje11@YuvrajSambhaji@PratapSarnaik
ऐसे कैसे झाले भोंदू ।
कर्म करोनि म्हणती साधू ।।
अंगा लावूनियां राख ।
डोळे झांकुनी करिती पाप ।।
• संत तुकाराम
बुवाबाजी आणि भोंदूगिरीचा धर्म आणि अध्यात्माशी काही संबंध नाही. पण अध्यात्म आणि धर्माचा आधार घेतल्याशिवाय भोंदूगिरी शक्य होत नाही.
स्त्रियांचं लैंगिक शोषण आणि सामान्यांची आयुष्ये उदध्वस्त करणारी बुवाबाजी तेव्हाच शक्य होते, जेव्हा त्याला राजाश्रयही मिळतो.
राज्यव्यवस्था पोखरणाऱ्या अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका आणि केलेली कारवाई अभिनंदनीय आहे.
ही लढाई सोपी नाही. स्वकीय आणि व्यवस्था या विरुद्धचं हे युद्ध आहे. हे युद्ध अटीतटीला जाऊन लढण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांचा दिसतो आहे.
नरबळी आणि जादूटोणा कायदा ड्राफ्ट करण्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, तत्कालीन मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासोबत माझा प्रत्यक्ष सहभाग होता. त्या विधेयकाला कडवा विरोध करणारे दिवाकर रावते यांनीही मी सुचवलेले बदल आणि रदबदली मान्य करत विधेयकाला समर्थन दिलं. अखेर तो कायदा पास झाला. त्याच कायदाचा फास पहिल्यांदाच इतक्या हायप्रोफाइल प्रकरणात आवळला जातोय, याचं मनस्वी समाधान आणि आंनद आहे.
कुणासोबत फोटो आहे म्हणून कुणाला लगेच दोषी ठरवण्याची गरज नाही. पण मुख्यमंत्री जी लक्ष्मण रेषा घालून देत आहेत, ती राजकारण्यांनी ओलांडली नाही तर विवेक बुद्धीचं चीरहरण होणं थांबेल.
~ कपिल पाटील
#देवेंद्रफडणवीस #DevendraFadanvis
शब्बीर अन्सारी गेले.
मुस्लिम ओबीसींचा योद्धा गेला.
पक्का लोहियावादी आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा मुस्लिम समाजात घेऊन जाणारा नेता हरपला.
केवळ मुस्लिम ओबीसीत नव्हे तर महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीचा पाया रचणाऱ्यांपैकी ते एक होते. महाराष्ट्रातील ओबीसींचे मूळपुरुष अॅड. जनार्दन पाटील यांच्यासोबत सत्तरच्या दशकातच ते काम करत होते. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ तर राष्ट्रीय पातळीवर शरद यादव, रामविलास पासवान, चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्यासोबतीने शब्बीर भाईंनी काम केलं. दिग्ग्ज सिने अभिनेते दिलीप कुमार पस्मांदा मुस्लिमांच्या चळवळीत उतरले तेही शब्बीर भाईंमुळेच. शायर हसन कमाल, अंजुमन इस्लामचे डॉ. झहीर काझी, बिहारचे अली अन्वर अन्सारी या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी मुस्लिम ओबीसींची चळवळ राष्ट्रीय स्तरावर नेली.
जनार्दन पाटील यांच्या ओबीसी संघटनेत शब्बीर भाई मुस्लिम ओबीसी विभागाचे प्रमुख होते. पण हा विभाग नको स्वतंत्र संघटना हवी, असं मी जेव्हा दोघांना म्हणालो तेव्हा दोघांनीही ते मान्य केलं. शब्बीरभाई, जनार्दन पाटील आणि मी आम्ही तिघांनी महाराष्ट्रात मुस्लिम ओबीसी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जालन्याला १९८३ ला झालेल्या स्थापना मेळाव्याला चौधरी ब्रह्मप्रकाश, अझगर अली इंजिनिअर, रा. सु. गवई, रामविलास पासवान हजर होते. पुढे १९९५ मध्ये त्याच संघटनेचं रूपांतर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायशेनमध्ये झालं.
विलासराव देशमुख आणि माधवराव शिंदे यांचंही प्रेम शब्बीर भाईंना मिळालं. काँग्रेसमधून त्यांनी दोन आमदार निवडून आणले होते. मिरजेला हाफिज धतुरे आणि भिवंडीला रशीद ताहीर मोमीन.
शब्बीर भाई म्हणजे अखंड भ्रमंती. पायाला भिंगरी लावून ते फिरत होते. महाराष्ट्रातलं असं एकही खेडं नसेल जिथे पस्मांदा मुस्लिम राहत होते आणि तिथे शब्बीर भाई गेले नाहीत. मुस्लिम समाजातल्या ६० ते ७० हुन अधिक जाती त्यांनी शोधून काढल्या. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. पुढे शरद पवार मुख्यमंत्री असताना, त्यांच्या मदतीने (डिसेंबर १९९४) मंडल आयोग मुस्लिम ओबीसींसाठी लागू गेला. मीच तेव्हा त्यांना पवार साहेबांकडे घेऊन गेलो होतो.
खेड्यापाड्यातल्या मागासवर्गीय मुस्लिमांची नावं, त्यांचे व्यवसाय, गावगाड्यातील त्यांचं स्थान पवार साहेबांना माहीत होतं. पण शब्बीर भाईंनी ज्या पद्धतीने या सर्वांना गोळा केलं होतं, ते पाहून पवार साहेब चकीत झाले होते. त्यांनी निर्णय घेतला आणि या सगळ्या वंचित मुस्लिम जातींना सवलती मिळाल्या.
जुलाह, बुनकर, मोमीन, अत्तार, मेहतर, बकर कसाब, कुरेशी, मुलाणी, अस्वलवाले, माकडवाले, छप्परबंद डफलीवाले, रंगरेज, रंगारी, गुजर, मुजावर, मदारी, पिंजारी, नदाफ, पाथरवट, तांबोली, फकीर, अन्सारी अशा वंचित समाजातील मुलं आता शिकू लागली आहेत. एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मुलं पूर्वी मुस्लिम समाजातून डॉक्टर किंवा इंजिनिअर होत होती. आता हजारो मुलांना संधी मिळू लागली आहे. शिक्षण आणि नोकरी दोन्ही. हे केवळ शब्बीर अन्सारी यांच्यामुळे शक्य झालं आहे.
वंचित, उपेक्षित आणि आताच्या काळात जणू अस्पृश्यता वाट्याला आलेल्या मुस्लिम समाजातील मागास जातींमध्ये एवढा मोठा कायापालट घडवून आणणारा स्वातंत्र्यानंतर शब्बीर अन्सारी यांच्यासारखा दुसरा नेता झाला नाही. इतकं मोठं काम करूनही हा माणूस आयुष्यभर पत्र्याच्या घरात राहिला. फकीर राहिला.
आपल्याकडे माणसांची कदर नसते. ती मेल्यानंतरच होते. पस्मांदा मुस्लिमांना स्वातंत्र्याच्या चळवळीत नेतृत्व दिलं ते अब्दुल कयुम अन्सारी यांनी. पण स्वातंत्र्यानंतर आरक्षणाच्या चळवळीत संघटीत केलं ते शब्बीर अन्सारी यांनी. शब्बीर भाईंचे एक सहकारी अली अन्वर अन्सारी यांना त्यांचं काम पाहून नीतीश कुमार यांनी थेट खासदार केलं. शब्बीर भाईंमुळे अनेकांना राजकीय ताकद मिळाली, पण त्यांना मात्र ना सरकारी किताब मिळाला ना पद्म पुरस्कार.
शब्बीर भाई जाणं ही माझ्यासाठी मोठी हानी आहे. ४५ ते ४६ वर्ष त्यांच्यासोबत काम करत होतो. हा सहप्रवास आता थांबला.
शब्बीर भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली ! अलविदा !
~ कपिल पाटील
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा तर सर्वांनीच दिल्यात. पण दिवस आजचाच का ? कवी कुसुमाग्रज अर्थात नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. कुसुमाग्रज शिरवाडकरांबद्दल आदर राखूनही प्रश्न पडतो, मराठी भाषेचा गौरव फक्त काय शिरवाडकरांमुळे झाला ? काही जण मराठी भाषा दिन म्हणतात. जणू काही मराठी भाषेचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ या तारखेला झाला. १९१२ पेक्षा जास्त वर्ष झाली, मराठी भाषेची गुढी उभारली त्याला. अगदी नेमकी वर्ष सांगायची तर, येत्या १९ मार्चला १९४८ वर्ष होतील. सातवाहन (शालिवाहन) शक सुरू होऊन १९४८ वर्ष झाली. महाराष्ट्र सरकार मात्र मराठी भाषेची ११४ वर्ष साजरी करत आहे.
२७ फेब्रुवारी हा दिवस ज्यांनी निवडला, ती शिवसेना म्हणजे आताची उबाठा आणि मनसे यांचं मराठीचं अभिजात ज्ञान ११४ वर्षांचंच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना - भाजप युती सरकारच्या विरोधात तमाम मराठी सारस्वत, साहित्यिक - सांस्कृतिक जगत जाऊ लागलं तेव्हा त्यांनी २७ फेब्रुवारीचा निर्णय घेतला. त्या सरकारचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हातात होता, ते खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: पु. ल. देशपांडे आणि कुसुमाग्रज यांच्या भेटीला गेले. नतमस्तक झाले.
मराठीचा गौरव पु. ल. आणि कुसुमाग्रज यांच्यामुळे वाढला हे खरंच. पण केवळ त्यांच्यामुळेच वाढला, असं म्हटलं तर त्या तमाम महान सारस्वतांवर अन्याय होईल, ज्यांनी मराठीला वैभवाचं कोंदण दिलं.
ज्ञानेश्वर, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांच्या मांदियाळीमुळे मराठीचं तारांगण प्रकाशलं. तर त्या आधीच कवी मुकुंदराज विश्वजन्माच्या आधीची स्थिती वर्णन करत होते. 'तेव्हा काळोखाने, काळोखाला वेढले होते.' त्याही आधी स्वामी चक्रधर 'मराठीच पाहिजे' असा आग्रही महानुभाव सांगत होते.
अभिजात मराठीचा इतिहास २ हजार वर्षांहून अधिक आहे. मराठी जैन वाङ्मय त्याला पुरावा आहे. सातवाहनांचं राज्य इसवी सनापूर्वी २०० वर्षांपासून होतं आणि नंतरही २०० वर्ष. ४५० वर्षांच्या काळात मराठी बाळसं धरत होती. 'गाथासप्तशती' हालाच्या काळातली. 'पंचतंत्र' पैशाची भाषेतून जगात गेलं. पण त्या गोष्टी गुणाढ्याने प्रथम मराठी राज्यातच सांगितल्या गेल्या. गौतमीपुत्र सातकर्णीने मराठी गुढी उभारली ती प्रथा अव्याहतपणे १९४८ वर्ष, जिथे जिथे मराठी आहे, त्या त्या प्रदेशात गुढी पाडव्याला साजरी केली जाते. मराठी सातवाहनांचं राज्य जिथे होतं, त्या प्रदेशाबाहेर कुठेही गुढी पाडवा नावाचा सण नाही. कारण मराठी वर्षाचा हा पहिला दिवस.
मराठीचा आणि गुढी पाडव्याचा काही संबंध आहे, याची जाणीव असल्यामुळे कदाचित राज ठाकरे त्यांच्या पक्षाचा मेळावा गुढी पाडव्याला घेतात. पण मराठीचं राजकारण करणारे जे कोणी आहेत, ते सातवाहनांचा इतिहास सांगत नाहीत. ज्ञानेश्वरी सांगितली तो दिवस मराठीचा म्हणून साजरा करत नाहीत. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला तो मलिक अंबर इथोपियन वंशाचा होता म्हणून त्यांच्या लेखी नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर मराठी स्वराज्य निर्माण केलं. त्याचं हिंदवी साम्राज्य झालं. मराठी राजकोष त्यांनी तयार केला. तो दिवस मराठी राजाभाषा म्हणून साजरा करण्याचं सुचत नाही.
मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्यांच्या हातात दुसऱ्यांदा सत्ता आली तेव्हा माशेलकर कमिटीच्या अहवालात हिंदी भाषेची पहिलीपासूनची सक्ती आली. वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो अहवाल स्वीकारल्याचं काल सभागृहात सांगितलं. पण मुळात माशेलकर कमिटीच्या अहवालातली ही शिफारस खुद्द माशेलकरांची नव्हती. तर त्या कमिटीचा सदस्य असलेल्या एका शिवसेना उपनेत्याची होती. युवराजांना खुश करण्यासाठी आणि महापालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळांची गरज म्हणून 'आदेशावरून' शेवटच्या क्षणी हिंदी सक्तीची शिफारस घुसडण्यात आली.
परवा २५५ शाळा बंद पडल्याची कबुली शिक्षणमंत्र्यांनी दिली. गेल्या २० वर्षात शेकडो मराठी शाळा बंद पडल्या आहेत. त्या वाचवण्यासाठी तथाकथित मराठी राजकारण्यांचं राज्य होतं, त्यांनी काय केलं ? फक्त मराठी भाषा आणि मराठी माणूस खतरे में है, अशी आवई प्रत्येक निवडणुकीच्या आधी उठवली. २७ फेब्रुवारीचा मराठी भाषा गौरव दिन ही त्यांचीच बतावणी आहे.
२७ फेब्रुवारीच नाही, प्रत्येक दिवस मराठीचा असायला हवा.
अन्यथा गुढी पाडव्याला मराठी माणूस आपल्या मराठीची संस्कृती घराघरात जपतच असतो.
~ कपिल पाटील
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@OfficeofUT@RajThackeray
गिरीश कुबेर माफी मागा
https://t.co/SUbdsBYUoJ
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सभ्यतेच्या आणि सुसंस्कृततेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. स्त्रीविरोधी मनुवादी धर्मशास्त्राचे ते उघड समर्थन करत आहेत. 'सुनेत्राताई तुम्ही चुकलात!' या शीर्षकाखाली त्यांनी पहिल्या पानावर विशेष संपादकीय लिहलं आहे. कुबेर आता एवढंच सांगणं बाकी ठेवतात की, 'सुनेत्राताईंनी सती जायला हवं, नाहीतर केशवपन करून घरात बसायला हवं.' संपादकीयाची सगळी भाषा यापेक्षा वेगळी नाही.
कुबेरांचं हे 'विचारधन', 'न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति' या मनुस्मृतीच्या विचाराने खच्चून भरलेलं आहे.
~ कपिल पाटील
@girishkuber@LoksattaLive@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
अवघा महाराष्ट्र पाणावला आहे. सुन्न आहे.
दादा कसे काय गेले?
जितके फटकळ, तितकेच अत्यंत प्रेमळ. विकासाचा अखंड ध्यास घेतलेला, सामान्य माणसाबद्दल कणव असलेला, प्रगतीशील, तितकाच सेक्युलर आणि सत्यशोधक विचारांचा नेता हरपला आहे. शेतकरी, शेतमजूर, एकूणच ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला नेता गेला. कितीही वाद होवोत लोक अजित दादा पवार यांच्यावर प्रेम करत होते.
म्हणून हा अपघात महाराष्ट्राला पटत नाही आणि सहन होत नाहीये. दादा असे जायला नको होते. दादा माणूस. भला माणूस गेला. आपला माणूस गेला. म्हणून जळलेल्या विमानाची ती दृश्य पहावत नाहीत.
#Ajitdadapawar #अजितदादापवार
निकालाचा अर्थ आणि अन्वयार्थ
महाराष्ट्रात दोन प्रवाह आहेत.
एक - हिंदूत्ववादी ( जहाल मवाळ )
भाजप आणि तिन्ही सेना
दुसरा - उदारमतवादी/सेक्युलर
काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, वंचित, इतर पक्ष
दुसरा प्रवाह आक्रसतोय.
आपली स्पेस पहिल्या गटाला आंदण दिल्यावर वेगळा निकाल कसा लागेल ?
मुंबई आणि मराठी माणूस संकटात असल्याची आवई पुन्हा एकदा उठवण्यात आली आहे. ठाकरेंचा हाच शब्द झेलत मराठी माणसाने प्रत्येक निवडणुकीत विश्वास ठेवला. शिवसैनिकांनी तर जीवाचीही पर्वा केली नाही. मुंबई महानगरपालिकेत 37 वर्ष आणि काही काळ मंत्रालयात सत्ता होती पण मराठी माणसाला काय मिळालं?
मुंबईतून हद्दपारी. कल्याण, डोंबिवली, वसई, विरारच्या पलीकडे मराठी माणूस फेकला गेला. गिरण्या संपल्या. बेस्ट बसेस प्रायव्हेट केल्या. ना कंत्राट मराठी माणसाला, ना नोकऱ्या मराठी माणसाला. इथल्या कामगारांच्या चळवळीवर मात्र दरवेळी आघात केला गेला.
म्युनिसिपल हॉस्पिटलांची दूर्दशा झाली. शाळा ठरवून बंद पाडण्यात आल्या. विकास दूर राहिला, विकासक मात्र गब्बर झाले.
राहिला प्रश्न मराठीचा, तर पालिकेत मराठी आणली जॉर्ज फर्नांडिस आणि मृणालताई गोरे यांनी. ठाकरेंचा कारभार इंग्रजीतच चालत होता. भाबड्या शिवसैनिकांनी काही काळ राज ठाकरेंचा आणि आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा मार्ग निवडला आहे.
मुंबईत मराठी माणसाचे प्रमाण 50 टक्के होतं. आता ते 25 टक्केच्या खाली गेलं आहे. मराठी कष्टकरी माणसाच्या हातून मुंबई कधीच निसटली आहे. घरकाम करणारी ताई आता बदलापूरहून ट्रेन पकडते. घाबरलेल्या अर्णवला गळफास घ्यावा लागतो.
कधी मराठी, कधी हिंदुत्व, कधी मारपीट, कधी धमक्या ...
भैय्या को मारते मारते, भावालाच संपवलं !
नफरतीच्या उन्मादाने मराठी मुलाचाच बळी घेतला. अवघ्या 19 वर्षांच्या कोवळ्या मराठी मुलाने आत्महत्या करावी, हेच तुमचं राजकारण आहे काय?
यासाठीच तुम्हाला मुंबईचा मराठी महापौर हवा आहे काय?
इतकी वर्ष सत्ता आहे मुंबईत तुमची.
मराठी माणूस मुंबईत राहावा म्हणून काय केलं?
गिरगावचा मराठी माणूस कल्याण - डोंबिवलीला गेला. गिरणगावचा पार बदलापूरच्या पुढे. गिरण्या संपवल्या. SRA मधून तुमचे कॉर्पोरेटर आणि बिल्डर फक्त मातले. मुंबईत भांडी घासायला येणार्या ताई आता विरार - नालासोपार्याहून ट्रेन पकडतात. मुंब्रा - कळव्याला लोकलच्या दरवाज्यात लटकलेले रुळावर पडून मरतात.
‘भाई थोड़ा आगे हो जाओ, धक्का लग रहा है।’ एवढंच तर अर्णव म्हणाला. मराठीत बोलला नाही म्हणून टोळक्याने त्याला हाणलं. ‘हाणा त्यांना’ नेत्यांचा आदेश असतो. झुंडीला तेवढीच भाषा कळत असते.
अपमान आणि भीतीच्या धक्क्याने अर्णव खैरे आतून कोसळला. त्याने गळफास लावून घेतला. पण मराठी पेपरात हेडलाईन होत नाही. नेत्यांच्या साध्या प्रतिक्रिया येत नाहीत.
हे जळकं हिंदुत्व, हा जळका मराठीबाणा. मराठी लेकरांच्याच जीवावर उठलाय.
मराठी – हिंदुत्वाचं उन्मादी राजकारण नरभक्षक बनलंय. नरभक्षक बिबट्यांसारखं.
#arnavkhaire
जगजेत्या भारतीय मुलींना सलाम! 🇮🇳🏆
Congratulations to #TeamIndia on winning their maiden ICC Women’s Cricket World Cup 2025!
This isn’t just victory, it’s hope.
A great step towards gender equality!
हा विजय त्या सर्व मुलींचा आहे, ज्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आलं.
एक काळ होता, जेव्हा महिला क्रिकेटला केवळ उपेक्षा वाट्याला होती, जशी प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला असते.
पण या मुलींनी प्राक्तन बदललं.
नवी मुंबईचं स्टेडियम खचाखच भरलेलं होतं. करोडो भारतीय रात्री एक वाजेपर्यंत जागे होते. आनंद साजरा करत होते, घराघरात लेकींचं कोण कौतुक सुरू होतं.
Harmanpreet Kaur, Smriti Mandhana, Shafali Verma, Jemimah Rodrigues, Pratika Rawal, Amanjot Kaur, Deepti Sharma, Sneh Rana, Kranti Gaud, Arundhati Reddy, Renuka Singh, Shree Charani, Radha Yadav, Richa Ghosh, Harleen Deol, Uma Chetry
तुमचा विजय फक्त वर्ल्ड कप जिंकण्यापुरता सीमित नाही;
तो आहे बंधमुक्त स्त्रीच्या कर्तृत्वाचा विजय. ❤️
तुम्हा सर्वांना या ऐतिहासिक विजयासाठी मनःपूर्वक सलाम! 🙌🇮🇳
#ICCWomensWorldCup2025
ब्राह्मणांना आरक्षण नाही, हे परमेश्वराचे उपकार आहेत, असं म्हणणारे भाजपचे नितीन जी गडकरी
आणि
जाती आधारित नको, आर्थिक निकषावर आरक्षण हवे असं म्हणणार्या, अति उच्चभ्रू वर्गातील तथाकथित 'Gen Z' शी नातं असल्याबद्दल देवाचे आभार मानणार्या राष्ट्रवादी (शप) च्या सुप्रियाताई सुळे.
दोघांचा सुर एकच आहे. गडकरींसोबत सुप्रियाताई सुद्धा 'भागवत' कथा ऐकतात तर !
गडकरी आणि सुप्रियाताईंना नम्रपणे सांगायला हवं लोकमान्य टिळक म्हणाले होते, 'जर परमेश्वर अस्पृश्यता मान्य करत असेल तर मी त्या परमेश्वरला सुद्धा मानणार नाही.'
आरक्षण हा गरीबी निर्मूलनाचा नाही तर जातीभेद निर्मूलनाचा उपाय आहे. पण आपण उच्चभ्रू वर्गातले आहोत, यासाठी देवाचे आभार दोघेही मानतात. उच्चवर्णीय असल्याचा दंभ एकविसाव्या शतकातही गेलेला नाही.
@nitin_gadkari@supriya_sule@Prksh_Ambedkar
#आरक्षण #Reservation
पडळकर एकटेच आहेत का ?
गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अश्लाघ्य, असभ्य आणि असंस्कृत जरूर होतं. पण ते एकटेच असे आहेत का ?
गेल्या काही वर्षात सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांची भाषा अशीच असभ्य आणि असंस्कृत राहिली आहे. परस्परांना मानवेतर प्राण्यांच्या नावाने हेटाळणं, शिव्या घालणं सुरू आहे. दूषणं देणं, प्रतिमा जाळणं, चपलांचे हार घालणं, काळं फासणं, विधिमंडळात सभापती किंवा अध्यक्षांची बाकं वाजवणं यात फरक कसा करता येईल ?
काहींच्या सभ्य भाषेतही पुरुषसत्ताक, सरंजामी, जातीय दंभ, विखार आणि तुच्छतेचा भाव ठासून भरलेला असतो, त्याचं काय ?
शिखरावरचा बर्फ वितळला की नद्यांना पूर येतो. शिखर नेत्यांच्या सभ्यतेचा बर्फ वितळला की सोशल मीडियामध्ये घाणेरड्या कमेंट्सचा महापूर येतो.
जे पेराल ते उगवतं.
एकट्या पडळकरांना सुळावर का चढवायचं ?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@bb_thorat@OfficeofUT@RajThackeray@Prksh_Ambedkar@rautsanjay61@Jayant_R_Patil@Awhadspeaks@GopichandP_MLA
I strongly condemn the vandalism of the State Emblem of India — the Lion Capital of Ashoka — in Srinagar.
The State Emblem is for all the citizens of India; it represents the entire nation and its people, not a single person or group!
Muslims, by doing and supporting such vandalism of National Symbols, are isolating themselves and the whole community in India.
Muslims should understand that India is Dar-ul-Aman, not Dar-ul-Islam!
उमर खालिद का सरनेम ‘पुरोहित’ या ‘ठाकुर’ होता तो अब तक वो बरी हो जाता।
उमर का अपराध क्या है ?
बिना ट्रायल 5 साल से जेल में है, जमानत की अर्जी भी खारिज की गई।
एक हाथ में तिरंगा और दूसरे में संविधान लेकर दमनकारी सत्ता से लड़ने की बात करने वाले उमर खालिद को ‘देशद्रोही’ ठहराया गया।
इस देश में बलात्कारी बाबाओं को जमानत मिलती है। गैंगरेप आरोपियों को सम्मान मिलता है।
हमारी न्यायदेवता अंधी कही जाती है, क्या वह बहरी भी है?
#UmarKhalid #उमरखालिद
बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत उबाठा गटाचा पराभव करून, शशांक राव आणि बेस्ट वर्कर्स युनियनने निर्णायक विजय मिळवला. बेस्ट कर्मचाऱ्यांना ज्यांनी त्रास दिला, बेस्टचं खासगीकरण केलं आणि भ्रष्टाचार करून बेस्ट बुडवली त्यांचा धुव्वा कामगारांनी उडवला आहे.
जॉर्ज फर्नांडिस आणि शरद राव यांना मानणाऱ्या समाजवादी विचारधारेकडे कामगार एकवटत आहेत, ही या विजयाची महत्त्वपूर्ण बाजू.
या ऐतिहासिक विजयाबद्दल आज समाजवादी कामगार नेते, हिंद मजदूर किसान पंचायतचे राज्याध्यक्ष कपिल पाटील यांनी बेस्ट कामगार आणि शशांक राव यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे राज्याध्यक्ष राजा कांदळकर, दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रामकांत बने, बेस्ट कामगार नेते रंगनाथ सातवसे, सहकारी अरविंद सावला, देविदास लोखंडे व सचिन बनसोडे उपस्थित होते.
बेस्ट पतपेढीचा निकाल, उबाठाचा धुव्वा
कामगार एकजुटीचा विजय !
शशांक राव 14
प्रसाद लाड 07
मनसे-शिवसेना 00
शशांक राव यांचा विजय.
अभिनंदन शशांक राव !
अभिनंदन बेस्ट वर्कर्स युनियन !
जॅार्ज फर्नांडीस - शरद राव यांच्या समाजवादी विचारधारेकडे कामगार एकजूट होत आहेत. ✊
🙏
ताई, मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी लढेन.
सोमनाथ सूर्यवंशी हे एक भीमसैनिक होते, आणि त्यांच्या न्यायासाठी लढणं हे माझं कर्तव्य आहे.