राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या वर्णनात्मक उत्तरपत्रिकांच्या गुणांकनाबाबत काही उमेदवारांनी आक्षेप नोंदवले आहेत. संबंधित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करून त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. मात्र, संपूर्ण निकाल रद्द करून सर्व उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याऐवजी, सध्या उत्तीर्ण उमेदवारांवर अन्याय होणार नाही आणि न्यायालयीन गुंतागुंतही टाळता येईल, असा सर्वमान्य तोडगा काढण्याची मागणी आज मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी माझी भेट घेऊन केली.
यानंतर विद्यार्थ्यांच्या काही प्रतिनिधींना सोबत घेऊन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. गुणांकनावर आक्षेप असलेल्या उमेदवारांकडून पुनर्तपासणीचे अर्ज मागवून केवळ त्यांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करावी व पुनर्तपासणीनंतर आरक्षण प्रवर्गनिहाय Cut-off पार करणाऱ्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून अतिरिक्त मुलाखतीची संधी देण्याचा सर्वमान्य तोडगा काढण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.
आयोगाशी चर्चा करून पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या सर्व संबंधित उमेदवारांना न्याय मिळेल असा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@MahaDGIPR
#Devendrafadanvis #MPSC #MPSCStudent #Maharashtra #महाराष्ट्र #भाजप #BJP
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये ज्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तपासणीत मानवी चुका किंवा गंभीर त्रुटींचे पुरावे आहेत, त्यांच्या उत्तरपत्रिकांचे तातडीने Revaluation + Retotaling करा.
संपूर्ण निकाल रद्द करून सर्व 438 पात्र उमेदवारांना पुन्हा अनिश्चिततेत ढकलण्याचा निर्णय घेण्याऐवजी त्रुटींचे पुरावे असलेल्या उमेदवारांचे Revaluation + Retotaling करावे. त्यातून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीची संधी द्यावी. आधीच पात्र ठरलेल्या 438 उमेदवारांच्या मुलाखती तातडीने घ्याव्यात. संपूर्ण प्रक्रिया अनावश्यकपणे 5-6 महिने लांबवू नये.
विद्यार्थ्यांना न्याय हवा आहे, आणखी विलंब नाही.
MPSC ने निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे भविष्य आणि वेळ दोन्ही वाचवले पाहिजेत.
@INCMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#MPSC #Rajyaseva2025 #dhananjayshinde #ChhatronKiGoonj
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत आयोगाकडून मानवी चुका झाल्याचे पुरावे समोर आले होते. हे पुरावे आम्ही आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा Revaluation + Retotaling ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची भूमिका होती.
मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने मात्र संपूर्ण मुख्य परीक्षेचाच निकाल रद्द करून सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांचं फेरमूल्यांकन करावं, अशी अव्यवहार्य मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनीही ती मान्य केली. त्यामुळं या प्रक्रियेला पुन्हा किमान पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. शिवाय आधीच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सुमारे ४३८ विद्यार्थ्यांचं भवितव्यही अधांतरी असून याबाबत ते कोर्टातही जाऊ शकतात.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ज्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाले किंवा तपासणीमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे, तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांचं Revaluation+Retotaling करून यातून जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतील त्यांना अगोदरच मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ४३८ मुलांसोबत मुलाखतीची संधी उपलब्ध करून देणं हाच पर्याय योग्य आहे. अन्यथा ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि कायदेशीर कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #JusticeForStudents #StudentsFirst
@AmazonHelp@amazonIN@JeffBezos i just mesaged u query in pvt dm. your just making me chat with different chat assistant, but not solving my problem, you should have mentioned below that order that this item is self return
@amazonIN@JeffBezos - Amzn return service is too bad, no one came for pick up upto 15 days. when i contacted customer service 2 times they mentioned that now i have to self return the product and this is happning in metro city,not getting support for return pick up
@AmazonHelp@amazonIN@JeffBezos and i am asking you? What is this policy. If return pick up was originally available and if ur agent didn't came for 15 days. I didnt cancel pickup even once. Then why i have to self ship. Why so??
Please arrange return pickup.
@telegram removed my VK IAS telegram channel with 1.6 lakh students and 50+ UPSC rankers, where free newspaper analysis was done since 4.5 years in tandem with Section 52(2) of the Copyright Act, 1957, impacting thousands of students https://t.co/1CbgNerkKL
@GoI_MeitY Pl help.