हॉटेल व्यावसायिक, मॉल व इतर ठिकाणच्या रेस्टॉरंट्समध्ये स्वच्छता पाळली जाते किंवा नाही तसेच इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणताही संसर्गजन्य रोग नसावा यासाठी नियमित आरोग्य तपासणी होते किंवा नाही याबाबतचा अहवाल वेळोवेळी घेण्यात यावा ! #FDA#Maharashtra#FDAMumbai@OfficeofUT
सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या अन्न व औषधाच्या तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा ! @CMOMaharashtra@NCPspeaks@fssaiindia
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच बुलडाणा जिल्हा पालकमंत्री श्री राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या देऊळगाव राजा नगरीत आज भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला...
@NCPspeaks
आज सन्मान आपण करत आहात याचा मला अभिमान व मनस्वी आनंद वाटतोय,आजवर लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यासाठी काम करण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे,यापुढेही मी माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करत राहील, आपला हात आशीर्वाद रुपी ठेवून मला काम करण्यास स्फूर्ती द्या!
(२/२)
देऊळगावराजा नागरी सत्कार समितीतर्फे देऊळगावराजा शहरात @NCPspeaks चे राज्य सरचिटणीस तथा पक्षातील माझे सहकारी मा.@amolmitkari22 यांच्या उपस्थितीत ह्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात आज माझा सन्मान करण्यात आला यासाठी सर्व आयोजकांचा मी आभारी आहे.आपल्याच कुटंबातील एका सदस्याचाच
(१/२)
मुंबईतल्या 'इस्टर्न फ्री वे' ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या. तसेच परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ अंतर्गत नारायणखेड येथे खडकपूर्णा प्रकल्पावरील डाव्या कालव्यावर उपसा सिंचन योजनेची निर्मिती जलसंपदा विभागाने केली आहे.या योजनेचे आज जलपूजन करून उदघाटन केले,या योजनेमुळे परिसरातील गावांच्या सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे!
संक्रांत अर्थातच संक्रमण किंवा स्थित्यंतर, या स्थित्यंतरातून जात असतांना परस्परातील स्नेह, प्रेम वृद्धिंगत करत, कटुता दूर सारत माणसा-माणसात स्नेहाचे बंध निर्माण करूया. संक्रांतीचे वाण लुटतांना माणुसकीचा, सौहार्दाचा वसा अंगीकारूया,सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
संत चोखामेळा महाराज यांचा ७५२ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला.आज सपत्निक त्यांच्या जन्मस्थळी मेहुणाराजा येथे जयंतीनिमित्त अभिवादन करून आशीर्वाद घेतले!
ऐसी आनंदाने नामाच्या गजरी |
दिली महाद्वारी समाधी त्या ||
आभाळाची व्यापकता आणि सागराची अथांगता ज्यांच्या कार्याला आहे असे साहसाचे आणि शौर्याचे प्रतिक छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा आज राज्याभिषेक दिन,त्यांच्या पावन स्मृतीस माझे विनम्र अभिवादन!
#श्रीशंभूराज्याभिषेकसोहळा
ना. @Awhadspeaks यांनी आज सिंदखेडराजा येथे जिजाऊ जनमस्थळी भेट देऊन अभिवादन केले. पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी ते नेहमी संघर्ष करत असतात. जय जिजाऊ ! @NCPspeaks@BuldanaNcp@MumbaiNCP @ThaneNCP
काल जिजाऊ जन्मोत्सव सोहळा निमित्त आदरणीय खा.@supriya_sule ताई ह्या सिंदखेडराजाला आल्या होत्या.हे त्यांचे सलग ६वे वर्ष आहे.सालाबादप्रमाणे या वर्षीही @NCPspeaks च्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता. सोबत मा.ना.@rajeshtope11(आरोग्य मंत्री) व आ.प्रकाश गजभिये हे देखील उपस्थित होते!
आज सिंदखेडराजा येथे सकाळी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त त्यांच्या जन्मस्थळी जाऊन सहकुटुंब अभिवादन केले. या पवान भूमी चा लोकप्रतिनिधी म्हणून मी येणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांचा मनपूर्वक स्वागत करतो ! #जयजिजाऊ@NCPspeaks@supriya_sule@Awhadspeaks@rajeshtope11
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे…!
#जय_जिजाऊ#जिजाऊ_जन्मोत्सव#सिंदखेड_राजा
We are happy to have a sincere and dedicated leader as our Guardian Minister. Looking forward to work under your leadership for the progress and growth of #BrilliantBuldhana@DrShingnespeaks