संदर्भ : आप महाराष्ट्र/२०२४/१२०९०२
मा. गिरीश महाजन,
ग्रामविकास मंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : आरोग्यसेवक परीक्षेस बसलेल्या उमेदवारांच्या मागणीबाबत.
महोदय,
नुकत्याच २०२३ मध्ये घेतलेल्या आरोग्यसेवक ५०% पदभरती मध्ये काही जिल्हा परिषदांनी जसे की बुलढाणा, बीड यांनी फवारणी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य देण्यात येईल असा २००३ चा GR दाखवून कागदपत्र पडताळणी साठी व निवड साठी २००३ चा GR वापरण्यात येईल असे विभागाकडून उमेदवारांना कळवले जात आहे. परंतु, २००३ च्या GR चा जाहिरातीपासून आतापर्यंत कधीही उल्लेख झालेला नाही आणि फवारणी साठी प्राधान्य देण्यात येईल असं पात्रतेत सांगितलं आहे, परंतु प्राधान्य या शब्दाचा अर्थ ४ मे २०२२ च्या GR नुसार फक्त आणि फक्त समसमान मार्क्स ची स्थिती असल्यावर त्या प्रमाणपत्र वाल्या उमेदवारांना दिला जातो असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषदे प्रकाशित केलेल्या जाहिरातीं मध्ये असा कोणताही उल्लेख केलेला नव्हता की कमी गुण असेल तरीही हंगामी फवारणी कामाचा ९० दिवस अनुभव वाल्यांना आधी निवडले जाईल. सर्वसामान्य उमेदवारांना विभागाच्या अशा भूमिकांमुळे नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांना ४ मे २०२२ रोजीचा नवीनतम GR वापरला जावा अशी सर्व गुणवत्ता धारक उमेदवारांची मागणी आहे.
कृपया उमेदवारांच्या मागणीचा विचार करून त्यांना दिलासा द्यावा हि विनंती.
धन्यवाद,
@girishdmahajan@mieknathshinde
अमरावती जिल्ह्यातील MPSC क्लर्क भरती प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी माझी भेट घेऊन या भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांच्या व्यथा मांडल्या.
MPSC क्लर्क या पदासाठी जानेवारी 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती,पूर्व परीक्षा एप्रिल 2023 मध्ये पार पडली तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये झाली.
या परीक्षेसाठी कौशल्य चाचणी जुलै 2024 मध्ये पूर्ण झाली आहे परंतु कौशल्य चाचणी दरम्यान किबोर्ड खराब आल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे व याच कारणामुळे काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयात (MAT) दाद मागितली आहे परंतु MAT ने भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही.
सदर भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत 20 महिन्यांचा कालावधी लोटला आहे तरीही अद्याप ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही यामुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय न होऊ देता लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.
अनेक अडचणींचा सामना करत गोरगरिबांची मुलं आपल्याला नोकरी मिळेल या आशेने परीक्षा देत असतात परंतु भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एवढा मोठा कालावधी लागणं ही खेदजनक बाब आहे.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde तसेच मा. उपमुख्यमंत्री
@dev_fadnavis व @AjitPawarSpeaks यांना विनंती आहे की आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे.
@achievershub10@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks Pahile tya sglya faltu yojna band krun bharatya kara election javal aal ki asl suchtay paise vatayche kantrati bharati mdhe rojgar deyche he ajibat chalnar nahi favegiri krnare srkar aahe he
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेखाली 6-6 महिन्याचे कंत्राटी भरती करून उमेदवारांचा नियमित हक्काची भरती रोखून ठेवली आहे.बहिणींना खुश भाचे नाराज. सरकार ने याचा विचार करावा आणि ही योजना बंद करावी.ही विनंती @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो, एकवेळ उपाशी राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच, सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
अभ्यासात खंड पडू नये, प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
एका जागेसाठी आम्ही हजार-हजार जण स्पर्धेत असतानाही, असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही, तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिकपणे मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो. हे सरकारनेही #seriousness दाखवत समजून घ्यायला हवं.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावं.
आमच्या अत्यंत सोप्या आणि रास्त मागण्या आहेत, नका हो खेळू आमच्या आयुष्याशी...! आम्ही विद्यार्थी #serious आहोत, आता सरकारनेही आमचा अंत न पाहता #serious होऊन नोटिफिकेशन काढावं !
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC_आंदोलन | #MPSC | #Pune |
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
100's of candidates sent opting out mails to the WRD.Zones are requested to consider the e-mails who wish to opt out & make the waiting candidates eligible. Waiting often takes 6-7mnts if the option of opting out is not considered at the right time @Deepakk75058621@Dev_Fadnavis
माननीय मंत्री महोदय आत्राम साहेब ,अनेक वर्षांपासून रखडलेली drugs inspector या पदांची भरती लवकरात लवकर mpsc कडे मागणीपत्र पाठवून आम्हा विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण करावी.बेरोजगारी तून मुक्त करा आम्हाला...
@AtramBaba@mieknathshinde@Dev_Fadnavis@RRPSpeaks