भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सशस्त्र क्रांतीची वाट दाखवणारे आणि आपल्या कार्यातून मनामनांत स्वातंत्र्याच्या आकांक्षेची ज्योत पेटवणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#Vasudevbalwantphadke
राज्य सरकारने रद्द केलेली पोलीस भरती, महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेले प्रकल्प, वाढती बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पुणे जिल्ह्याच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रत्यक्षात सह��ागी होऊन आंदोलकांना पाठिंबा दर्शवला.
@NCPspeaks
राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीत बळीराजा पुरता खचला आहे. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर येण्यासाठी उशीरा का होईना राज्य सरकारला शहाणपण सुचले आणि राज्य ��रकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वस्त केले. मात्र या नुकसान भरपाईत शेतकऱ्यालाच लुटण्याचे काम होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील तीन दिवस पवार साहेबांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.
#NCP
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवणारे, भारतीय एकता व अखंडतेचे प्रतीक भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#SardarVallabhbhaiPatel
'गरिबी हटाओ नारा' चा देत देशात लोककल्याणकारी निर्णयांची अंमलबजावणी करत देशाच्या विकासात अतुलनीय योगदान देणाऱ्या, अचूक निर्णय क्ष���तेमुळे जागतिक राजकारणात देशाची प्रतिमा उंचावणाऱ्या देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारशी केलेल्या पत्रव्यवहाराबाबत आज विर���धी पक्षनेते अजितदादांनी प्रकाश टाकून विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. @AjitPawarSpeaks
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे ��ातून स्पष्ट होते.
https://t.co/yNiROyta3E
पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विरोधकांनी आजही विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
#mansoonsession2022#पावसाळीअधिवेशन२०२२
ग्रामपंचायत निवडणुका सुधारणा विधेयकाबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेत मूळ घटनेचा ढाचा राजकारणासाठी कोणीही बदलता कामा नये, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. @AjitPawarSpeaks यांनी व्यक्त केले.
#maharashtra#MonsoonSession2022
https://t.co/uqrfLOQrTn
राज्यात आता शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. पण राज्यात विविध ठिकाणी विकासकामे रखडली असून सुविधांची वानवा आहे. झाडी, डोंगर फेम आमदार शहाजी पाटील यांच्या सांगोला तालुक्यातील महुद गावात निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत. @amolmitkari22
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांच्या मान्यतेने धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी श्री. सुरेश सोनावणे तसेच कार्याध्यक्षपदी श्री. जितेंद्र मराठे व श्री. प्रशांत बदाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
#NCP#नियुक्ती
नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणुक व्हावी या आशयाचे विधेयक आ�� मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनादरम्यान मांडले. या विधेयकामुळे नगरपालिकेच्या कामकाजात कसा गोंधळ निर्माण होऊ शकतो याबद्दलचे माझे मत सभागृहात मांडले.
https://t.co/522eM5AiOB
#पावसाळी_अधिवेशन
राज्यातील सेवायोजन कार्यालय (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) जवळपास बंद झालेले आहेत. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून पूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या त्या आता होत नाहीत. तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी बेरोजगारी भत्ता मिळत होता. राज्य सरकारने तो भत्ता बंद केलेला आहे.
सध्या केंद्राच्या निकषांनुसार ज्येष्ठ नागरिक वयोमर्यादा ६० वर्षे आहे तर आजही आपल्या राज्यात ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वर्षे असावे लागते, ही वयोमर्यादा ६० वर्ष कधी करणार? हा निर्णय ताबडतोब होणार? असा मुद्दा आज माननीय आमदार @mrhasanmushrif यांनी विधानसभेत उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी तस��च राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांविषयी विरोधी पक्षातील सहकारी आमदारांसह आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
#MonsoonSession
सरपंच, नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणुक घेण्यासंबंधी विधेयक मुख्यमंत्री मा.@mieknathshinde यांनी सभागृहात मांडले. मविआ सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना मा.शिंदे यांनीच हे विधेयक अस्तित्वात येणे चूक आहे यासाठी वकिली केली होती. एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते?
बीड, लातूर व उस्मानाबाद यांसह काही जिल्ह्यांमधील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पीकही हाती लागले नाही. कपाशीवर पडलेल्या बोंडअळीसाठी ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली,
@dhananjay_munde
महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की,कृपया आपण यावर तातडीने कारवाई करावी.
प्रगतीशील विचारांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धेतून लोकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
छत्रपती संभाजीनगर मधील एक भोंदूबाबा केवळ डोक्यावर हात ठेवून आजार बरा करीत असल्याचे वृत्त @abpmajhatv या वृत्तवाहिनीने दाखविले आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून या प्रकरणी चौकशी करुन तातडीने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
https://t.co/geDMM9Cra3