@bhangire_pramod मुलांनी RTI टाकून पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या Answer kays देता का नाही आल्या PMC ला...?? आणि आता सरळ जोईनिंग
व्हा PMC व्हा 🤕👏👏
लाज कशी वाटतनाही यांना...@PMCPune@Dev_Fadnavis
सर्वात चिघळलेला मुद्दा शुक्रवारी सर्वात उशीरा माहिती देऊन बंद....
#NICECOVERUP....🔥🔥
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतून प्रश्नांचे फोटो बाहेर येऊनही मनपा प्रशासन जबाबदारी झटकतंय. गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी मनपासमोर आंदोलन केलं त्यावेळी संपूर्ण चौकशी होईपर्यंत नियुक्ती देऊ नये. असे ठरले असताना आता IBPS च्या अहवालात merit further investigation असा स्पष्ट निष्कर्ष असताना तसंच विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतरही मनपा प्रशासनाला प्रसिद्धीपत्रक काढून तातडीने नियुक्ती आदेश देण्याची एवढी घाई का झालीय? यामागं कोणता म्होरक्या अदृश्यपणे दबाव आणत आहे का?
नियुक्ती तात्काळ थांबवाव्यात.
#PMCJuniorEngineerScam #PuneMunicipalCorporation #CivilEngineeringRecruitment #StopUnfairAppointments #IBPSInvestigation #StudentProtest #TransparentRecruitment #PuneNews
कनिष्ठ अभियंता भरतीत मोठा गैरप्रकार; पेपर फुटल्याचे महापालिकेने मान्य केले, मग नियुक्त्या का सुरू ठेवल्या?
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून, परीक्षेचा पेपर फुटल्याचे खुद्द पुणे महानगरपालिकेनेही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांनी या गैरप्रकाराचे पुरावे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेने तीन विद्यार्थ्यांवर कारवाई केली. मात्र, पेपर फुटला होता हे मान्य केल्यानंतर हा गैरप्रकार केवळ तीन विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित होता, हे महापालिकेने कशाच्या आधारे ठरवले? फुटलेला पेपर आणखी किती उमेदवारांपर्यंत पोहोचला? किती उमेदवारांनी त्याचा लाभ घेतला? या प्रश्नांची उत्तरे न शोधताच इतर उमेदवारांना नियुक्त्या देण्याची घाई का करण्यात आली?
तीन विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, मग संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी का झाली नाही? पेपर फुटल्याचे मान्य असताना त्याच परीक्षेच्या निकालावर आधारित नियुक्त्या वैध कशा ठरू शकतात? हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल, तर त्यांना पुन्हा समान आणि निष्पक्ष संधी देणे ही महापालिकेची जबाबदारी नाही का? त्यामुळे कनिष्ठ अभियंता भरतीतील सर्व नियुक्त्या तात्काळ स्थगित करून, संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे.
या प्रकरणात पुणे महानगरपालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत शिवसेनेकडे खात्रीदायक माहिती आणि महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे मोठ्या माशांना वाचवून केवळ तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? संपूर्ण रॅकेटची चौकशी कोण करणार? आणि दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने द्यावीत. वेळप्रसंगी शिवसेनेकडे उपलब्ध असलेले पुरावेही जनतेसमोर मांडले जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कारवाई होईपर्यंत शिवसेना हा लढा आक्रमकपणे लढणार आहे.
@PMCPune@pmccarepune@PMCCare
#PMC #shivsena #punecity #hadapsar
पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता परिक्षेत तिघे जण पकडले आहेत. पण प्रश्न हजारो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आहे..!
पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता भरतीतील हायटेक कॉपी प्रकरणानंतर केवळ दोषींवर कारवाई करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. संपूर्ण परीक्षेची विश्वासार्हता तपासली का? इतर उमेदवारांना फायदा झाला नाही, याची खात्री कोण आहे देणार.? प्रामाणिक विद्यार्थ्यांना संशयाच्या वातावरणात निकाल का स्वीकारावा लागतो.? पुणे महानगरपालिका प्रशासनाने उत्तर द्यावे. नसता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक आंदोलन करुन महापालिका प्रशासनाला धारेवर धरणार
#विद्यार्थीन्याय #PMC #भरती #पारदर्शकता
@bbcnewsmarathi@LokshahiMarathi@saamTVnews@News18_marathi@abpmajhatv@zee24taasnews
🛑PMC भरती घोटाळा :
There is something called as Accountability and Responsibility.
If MPSC can declare Re-Exam bcoz of Fraud by just one candidate, then Why not PMC ?
मुलांचा अंत पाहू नका..
अब याचना नाही, रण होगा!
@PMCPune@navalMH@Dev_Fadnavis@mieknathshinde@RRPSpeaks
विद्यार्थ्यांचा विश्वास ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही!
ज्यांच्यावर पेपरफुटीप्रकरणी संशयाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत,त्यांनी आधी स्वतःवरील संशय दूर करण्यासाठी निष्पक्ष चौकशीला सामोरे जावे.विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थितीत सोडा
तुम्ही हस्तक्षेप थांबवा🙏
@Dev_Fadnavis@RRPSpeaks
पुणे महापालिकेच्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीचा पेपर फक्त ३ विद्यार्थ्यांना मिळाला हे मान्य करुन पेपरफुटीचा प्रकार घडल्याचा स्पष्ट निर्वाळा महापालिकेने दिला आहे. परंतु तरीही महापालिका ही भरती प्रक्रिया रद्द करण्यास तयार नाही. हा गैरप्रकार केवळ ३ जणांपुरताच मर्यादित होता याची हमी महापालिका देऊ शकते का? पेपरफुटीच्या प्रकरणाचे स्वरुप आणि त्याचे धागेदोरे स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे. परंतु तत्पूर्वीच महापालिका निवड झालेल्या उमेदवारांना रुजू करुन घेत आहे. यामुळे इतर अनेक पात्र आणि प्रामाणिक उमेदवारांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे. माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे की ही सदोष भरतीप्रक्रिया रद्द करुन संपूर्ण प्रक्रिया नव्याने पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी.
@CMOMaharashtra@PMCPune@navalMH
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतून प्रश्नांचे फोटो बाहेर येऊनही मनपा प्रशासन जबाबदारी झटकतंय. गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी मनपासमोर आंदोलन केलं त्यावेळी मी स्वतः आयुक्तांची भेट घेऊन चौकशी होईपर्यंत नियुक्त्या न देण्याची विनंती केली होती. आता IBPS च्या अहवालात merit further investigation असा स्पष्ट निष्कर्ष असताना तसंच विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतरही मनपा प्रशासनाला प्रसिद्धीपत्रक काढून तातडीने नियुक्ती आदेश देण्याची एवढी घाई का झालीय? यामागं कुणाचा अदृश्य दबाव कार्यरत आहे का?
हे प्रकरण अतिशय गंभीर असून विद्यार्थ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन न करता प्रशासनाने नियुक्त्या देण्याचा प्रयत्न केला, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मलाही त्यांच्यासोबत मनपासमोर आंदोलनाला बसावं लागेल!
@Dev_Fadnavis
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेतील पेपरफुटी व गैरव्यवहाराचा मुद्दा रोजगार न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसने ठामपणे मांडला होता. विद्यार्थ्यांनी पुरावे देऊन चौकशीची मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती.
काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईचा आग्रह धरला.
अखेर चौकशीत ३ उमेदवार संशयित आढळले, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि परीक्षा केंद्रातील २ कर्मचाऱ्यांसह ५ जणांवर FIR दाखल झाला.
मात्र लढा इथे संपलेला नाही. पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी समोर आल्याशिवाय व खऱ्या सूत्रधाराला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही...
२०१७ पासून Mahapariksha Portal, पोलीस भरती, MHADA, जलसंपदा, तलाठी, वन विभाग, Drug Inspector, PMC, MMRDAपर्यंत भरती घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना महाराष्ट्रातील लाखो प्रामाणिक तरुणांची स्वप्ने उद्ध्वस्त केली; या जबाबदारीपासून ते पळू शकत नाहीत. या संपूर्ण भरती माफियाचा ‘आका’ कोण? महाराष्ट्राला उत्तर हवे!
सर्व प्रकरणांची Court-Monitored SITमार्फत चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा कधी होणार?
@INCMaharashtra@BJP4Maharashtra
कनिष्ठ अभियंता भरती - पुणे महानगरपालिकेस खुले प्रश्न:
PMC ने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांसाठी १४६ उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले आहेत. फक्त काही उमेदवारांची उमेदवारी रद्द केल्याचे सांगितले आहे. महानगरपालिकेने स्वतः म्हटले आहे की IBPS चा अहवाल पारदर्शकतेसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे / आला आहे. तरीही हजारो उमेदवारांमध्ये संशय आणि असंतोष कायम आहे.
PMC ला थेट प्रश्न:
१. IBPS अहवाल पूर्ण स्वरूपात (सर्व परिशिष्टे व विश्लेषणासह) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे का?
२. ज्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली, त्यांना रद्दीकरणापूर्वी औपचारिक सुनावणी आणि स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती का?
३. परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही, ऑडिट लॉग आणि इतर पुरावे स्वतंत्र तपासणीसाठी उपलब्ध कराल का?
४. संपूर्ण प्रक्रियेची तटस्थ व स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यास तयार आहात का?
पारदर्शकता म्हणजे फक्त निवड यादी लावणे नव्हे. उमेदवारांच्या आणि जनतेच्या मनातील संशय दूर करण्यासाठी पूर्ण माहिती आणि पुरावे समोर आणा. शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने न्याय्य भरती प्रक्रिया हि आमची मागणी आहे.
@INCMaharashtra@degree_holders@prajytnair@PMCPune@navalMH@MDNagpure
अभ्यासिकेत दिवस अन् ढेकणात रात्र काढली
कधी वडापाव मॅगीवर भूक भागवली
कधी परीक्षेच्या तारखा पाहून
कित्येक दसरा अन् दिवाळी
घराची पायरी नाही चढली
अन् AC त बसून पेपर फोडणाऱ्यांनी
पोरांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली.
@degree_holders@PMCPune@prajytnair@navalMH#PMCJE
अहवाल प्रसिद्ध केला म्हणजे प्रश्न संपलेले नाहीत, प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे!
काँग्रेसने रोजगार न्याय यात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे पेपरफुटी व गैरव्यवहाराची स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी मागितली होती. त्यानंतर ३ उमेदवार संशयित आढळले आणि परीक्षा केंद्रातील २ कर्मचाऱ्यांसह ५ जणांवर FIR दाखल झाली.
पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न -
ज्या कंत्राटदार कंपनीने परीक्षा घेतली, त्याच कंपनीकडून तिच्याच परीक्षा व्यवस्थेबाबत नकारात्मक अहवाल घेणे कितपत निष्पक्ष आहे? गैरप्रकाराची संपूर्ण साखळी काय होती? पेपर/प्रश्नांची माहिती नेमकी कुठून बाहेर गेली? आणखी कोण सहभागी होते? खरे सूत्रधार कोण?
१४६ निवड झालेल्या उमेदवारांच्या मेहनतीचा आम्ही पूर्ण आदर करतो. हा लढा त्यांच्या विरोधात नाही; त्यांच्यासह प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याच्या न्यायासाठी आहे.
३ उमेदवार आणि ५ FIR वर प्रकरण संपत नाही. मूळ सूत्रधार सापडेपर्यंत लढा सुरूच राहील.
@INCHarshsapkal@INCMaharashtra@degree_holders@INCRojgar
#JusticeForPMCJE #PMCExam
रात्री नियुक्ती आदेश काढून PMC ने खरंच “गतिमान कारभाराचा” नवा आदर्श घालून दिला आहे! 👏
JE भरतीत 5 आरोपी चौकशीचे प्रश्न कायम पण नियुक्त्या मात्र रात्रीच घाईघाईने!
वा@PMCPune ! गैरप्रकाराचा तपास नंतर, नियुक्त्या आधी अशी कोणती “नवी कार्यपद्धती” सुरू केली आहे?
@navalMH@prajytnair