राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
महाराष्ट्रात नोकर भरतीचे पेपर वारंवार फुटत आहे,करोडोंचा घोटाळा सुरू आहे. TCS/IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये खासगी परीक्षा केंद्र मॅनेज केली जात आहे. म्हणून उद्या ट्विटर वॉर आयोजित केला आहे. सर्वांनी नक्की सहभागी व्हा.
#परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION#पेपरफुटीवर_कायदा_करा
#PSIRATIOWADH#OPTINGOUT
👉कंबाइन पुर्व 2022 निकालामध्ये मा.आयोगाने मागच्या प्रमाणे Ratio घ्यावा.
👉1500 पेक्षा जास्त मूल अगोदरच पदे मिळवलेली आहेत त्यांना opting out चा पर्याय उपलब्ध करुन द्यावा व नंतर निकाल लावून इतरांना संधी द्यावी.
@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde