📍 जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता १५३५ पदे रिक्त आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४५६ पदे रिक्त आहेत. आदरणीय @girishdmahajan साहेब कृपया जलसंपदा विभागांत १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏
@Deepakk75058621
📍 जलसंधारण अधिकारी पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी जलसंधारण राज्यमंत्री@naikindranil साहेबांची भेट घेऊन नियुक्ती संदर्भात निवेदन दिले.
👉 नियुक्ती संदर्भात मंत्री महोदयांनी संबंधीत अधिकारी यांना आदेश दिले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.विद्यार्थ्यांना वेळ दिल्याबद्दल आभार🙏
मा. देवेंद्रजी,
राज्यसेवा २०२२ परीक्षेतील क्लास १,२ अधिकारी ३ वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल लागून १ वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला तरी नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. लाल फितीच्या कारभारामुळे निवड झालेले अधिकारी सामाजिक, आर्थिक,मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत.
राज्य शासन खरोखरच “गतिमान” आहे का?
@Dev_Fadnavis
'जलसंपदा विभागात मेगा भरती लवकरच ' सदरील घोषणा करून आज एक महिना झाला.
परंतू अद्याप जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, कृपाय लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WRD_JE@girishdmahajan@Deepakk75058621
सेवा प्रवेश नियम हे शासनाच्या विविध विभागांची मंजुरी भेटून प्रसिद्ध होतात परंतु सदरील प्रक्रियेत कित्येक महिने एकाच विभागात RR बद्दल चा मसुदा असतो असे आमच्या निदर्शनास आले आहे.सेवा प्रवेश नियमांबाबत 'कालबध्द' कार्यक्रम असला पाहिजे यासाठी मुख्य सचिव यांच्या कार्यालयात निवेदन दीले.
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन साहेबांना प्रलंबित कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी यासाठी विद्यार्थ्यांनी निवेदन दीले. @Deepakk75058621@girishdmahajan#WRD_JE
सेवा प्रवेश नियमांची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ आहे त्यामुळे प्रमुख २ गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत ही विनंती,
१)सेवा प्रवेश नियम बाबत कालबध्द कार्यक्रम असला पाहिजे.२) सेवा प्रवेश नियमांचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधीत विभागाचे दोन कर्मचारी दिले जावे. @MahaChiefSec@ssaunik
साहेब सुरुवात पुणे जिल्हा परिषदेपासून करावी ही नम्र विनंती.महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद आहे 'पुणे जिल्हा परिषद'अजूनही कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची नियुक्ती दिली नाही.
माननीय अतिरिक्त आयुक्त
पुणे महापालिका,
आपण १५ जानेवारीपर्यंत पुणे महापालिकेची सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येइल असे सांगितले होते परंतु अद्याप सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
@PMCPune@AjitPawarSpeaks
बोगस कर्मचारी यांना सेवेतून काढावे परंतु बोगस प्रमाणपत्रे वितरित करणाऱ्या टोळी शोधून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊन कार्यवाही झाली पाहिजे.
@TribalYouthMH @Narhari_Zirwal@SakalMediaNews@suvishelke
@naikindranil माननीय मंत्री महोदय आपल्याला नम्र विनंती आहे की, प्रलंबित जलसंधारण विभागाच्या WCO-६७० निवड झालेल्या उमेदवारांना लवकरात लवकर रुजू करण्याचे आदेश द्यावे कारण सध्या उमेदवारांना मानसिक आणि आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे, ही कळकळीची विनंती
@naikindranil@SanjayDRathods
याला #मनुवादी विचारसरणी म्हणतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा स्व. अब्दुल कलाम साहेब, आपल्या तारुण्यात गरिबी असतानाही त्यांनी रोडवरील दिव्याखाली अभ्यास केला, संघर्ष केला आणि यश प्राप्त केलं.
म्हणजे गरिब तरुणांनी कधीच शहराची वाट धरू नये? आपल्या गावीच गरिबीत जगावं असं काहींना वाटतंय. संघर्ष करून जर उद्या यातील काही तरुणांना यश मिळाले तर तुमच्या-आमच्या पोटात दुखायच कारण नाही.
अभ्यास करणारे अनेक तरुण स्विगी-झोमॅटो किंवा पडेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहेत, प्रत्येक दिवस संघर्षात काढून ते काहीतरी स्वप्न बघत असतात. राहिली गोष्ट आमच्या भावांना मार्गदर्शन करायची तर अहोरात्र आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण फक्त टीका करून त्यांचा उद्धार कधी केला नाही.
@girishdmahajan साहेब जलसंपदा विभागात देखील कनिष्ठ अभियंता ( सरळसेवा) आणि सहाय्यक अभियंता श्रेणी १ आणि २ (लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी) असंख्य रिक्त पदे आहेत. कृपया पदभरती बाबत आपण वैयक्तिक पातळीवर लक्ष ठेऊन आदेश द्यावेत ही नम्र विनंती 👏
#WRD_JE#WRD_AE