NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे.
तसंच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार.
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं.
इतकं वाईट कम्युनिकेशन तर माझ्या
Ex चं पण नव्हतं! 🤣🤣🤣
Gen Z ना ऐकल्यावर कळतं त्यांच्यापासून सरकार हजार प्रकाशवर्ष दूर आहे.
पूर्ण लिंक - https://t.co/hoO0qle7aP
#MumbaiCJPProtest#Maharashtra
मागील अधिवेशनात आम्ही ड्रग्स माफिया आणि पोलिस यंत्रणेतील संभाव्य संगनमताचा मुद्दा उपस्थित केला होता.
आज एका पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलनातील विद्यार्थ्यांना "ड्रग्सचं पाकीट खिशात टाकून आत टाकू" अशी धमकी दिल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. जर असे वक्तव्य झाले असेल, तर त्यामागील सत्य समोर आलेच पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावणे लोकशाहीला शोभणारे नाही.
प्रदर्शन करू नये म्हणून विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
५० ग्रॅमची पुडी खिशात टाकून आयुष्य उद्ध्वस्त करीन,अशी भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था अशी चालते का?
विद्यार्थ्यांना न्याय मिळणार की धमक्या? 👇
मुंबईत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. लाठीहल्ल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना थेट खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओमध्ये, "तुमच्या खिशात ड्रग्जच्या पुड्या ठेवून तुरुंगात टाकेन," अशी उघड धमकी मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी आंदोलक तरुणांना देताना दिसत आहे.
हे कृत्य अतिशय विकृत, तितकेच निषेधार्ह आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारे आहे. ज्या मुंबई पोलिसांवर अंमली पदार्थांचा व्यापार मुळापासून उखडण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, तेच पोलीस विद्यार्थ्यांना धमकावण्यासाठी ड्रग्जचा वापर करण्याची भाषा करत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे.
या घटनेमुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
१. पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? जर पोलीस खुलेआम विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी देत असतील, तर त्यांना ड्रग्जचा स्त्रोत ठाऊक आहे. जर हा स्त्रोत माहिती आहे, तर मुंबईतील ड्रग्ज माफियांवर कारवाई का केली जात नाही?
२. राज्य सरकारला ही गुंडगिरी मान्य आहे का? मुंबई पोलीस दल हे थेट राज्याच्या गृह मंत्रालयाखाली येते. राज्याच्या राजधानीत आणि सरकारच्या नाकाखाली सुरू असलेला हा प्रकार गृह खात्याला मान्य आहे का?
आंदोलक मुलांना अशा प्रकारे बनावट पुराव्यांची आणि ड्रग्जची धमकी देणे हा भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मानवाधिकार कायद्यांनुसार अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.
खोटे पुरावे तयार करणे किंवा कोणालातरी खोट्या व गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठी पुरावे रचणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अंमली पदार्थ बाळगणे, त्याचा व्यापार करणे किंवा कोणाला तरी अडकविण्यासाठी त्याचा गैरवापर करणे हा देखील गुन्हा आहे.
हा प्रकार मानवाधिकाराचेही उल्लंघन आहे. मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ अंतर्गत नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगण्याचा आणि आपली मते मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. पोलिसांचे हे कृत्य राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उघड उल्लंघन आहे.
आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या देशाच्या तरुण पिढीला गुन्हेगार ठरवण्याचा आणि त्यांच्या खिशात ड्रग्ज टाकून त्यांचे आयुष्य व करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्याचा हा प्रकार अत्यंत भयावह आहे.
संबंधित व्हिडिओतील पोलीस कर्मचाऱ्यावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच, राज्याच्या गृह मंत्र्यांनी यावर मौन न बाळगता महाराष्ट्रातील जनतेला आणि त्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तर द्यायलाच पाहिजे.
@Dev_Fadnavis@MumbaiPolice
भाजपाने आज काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यालाच मराठीत "चोराच्या उलट्या बोंबा" म्हणतात.
काल निष्पाप विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे अमानुष अत्याचार करण्यात आले, खिळे असलेल्या दांड्यांनी मारहाण करण्यात आली, पोलिसांकडून दगडफेक करण्यात आली, विजेचे शॉक देण्यात आले, विद्यार्थिनींना थपडा मारण्यात आल्या, त्यांचे कपडे फाडण्यात आले आणि भाडोत्री गुंडांचा वापर करण्यात आला, त्या सर्व प्रकाराने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची मान खाली घालण्याचे काम झाले आहे. भारताला उत्तर कोरिया आणि चीनसारख्या दडपशाही करणाऱ्या व्यवस्थांच्या रांगेत उभे करण्याचा हा प्रयत्न आहे.
या संपूर्ण प्रकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची आणि विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे.
काल स्वतः नरेंद्र मोदी यांनी पेपर लीक ची घटना "महापाप" असल्याचे म्हटले. त्यामुळे आज काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलनासाठी येणारे हेच खरे महापापी आहेत. भगवान श्रीराम मंदिरातील दानावर दरोडा टाकणारे आणि जनतेच्या विश्वासाशी प्रतारणा करणाऱ्यांना आपले काळे तोंड घेऊन काँग्रेसला प्रश्न विचारण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
देशाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी हवी आहे; चोराच्या उलट्या बोंबा ठोकणारे ढोंगी आंदोलन नव्हे.
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या व विविध प्रलंबित मागण्या या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी आज देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
बैठकीदरम्यान मी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि पेपरफुटीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याबाबत माझी सविस्तर भूमिका मांडली. यासोबतच शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी व्यवस्थापन तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर माननीय पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन माननीय पंतप्रधानांनी दिले. या प्रसंगी माननीय खासदार श्रीमती सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.
अजितदादांची आणि माझी मैत्री १९८५ पासून होती. आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ हून अधिक वर्षे एकत्र काम केले. सुख, दुःख, यश, अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या. आमचे अनेक बाबतीत एकमत सुद्धा असे आणि काही बाबतीत वेगवेगळे मत देखील असे पण चर्चा करून आम्ही एकमतावर यायचो.
दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दर वर्षीचा रिवाज या वर्षी मोडला. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील.
' जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ' असे म्हणण्याची इच्छा होत नाही.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा...
Sorry Rohit for doubting you. Your respect within the Indian dressing room will grow multifold tonight. A spanner for all those writing him off.
#IndvsEng#LordsODI
हा रेकॉर्ड मोडून दाखवा फडणवीस पंत
- विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहाचे सदस्य
- विधानसभा आमदार, बारामती - १९६७ ते १९९१
- विधान परिषद आमदार - १९९३ ते १९९६
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९०, १९९० ते १९९१, १९९३ ते १९९५
- लोकसभा खासदार, बारामती - १९९१ ते १९९३, १९९६ ते २००९, २००९ ते २०१४ (माढा मतदारसंघ)
- राज्यसभा खासदार - २०१४ पासून
- केंद्रीय संरक्षण मंत्री - १९९१ ते १९९३
- लोकसभा विरोधी पक्षनेते - १९९८ - १९९९
- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री - २००४ ते २०११
- केंद्रीय कृषी मंत्री - २००४ ते २०१४
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष २००५-२००८
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष - २०१० ते २०१२
- कुस्ती, कबड्डी, खोखो इत्यादी राज्यस्तरीय क्रीडा संस्थांच्या अध्यक्षपदी निवड
-रयत शिक्षण चे अध्यक्ष पद
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील शालेय साहित्य खरेदी घोटाळा चिंताजनक आहे,
महाराष्ट्राची बदनामी करणारा आहे,
कारवाई झाली तरच नवल वाटेल!
पण मी माझे कर्तव्य बजावत आहे!
@anjali_damania