नाशिक महापालिका भरती विविध पदासाठी दिलेली अनुभवाची अट तत्काळ रद्द ��रून लाखो बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा, नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधीच नाही तर नाशिक मनपा प्रशासन नक्की पदभरती कोणासाठी करत आहे?
#CancelNMCExperience
@CMOMaharashtra
@my_nmc
@mieknathshinde
@degree_holders@CMOMaharashtra@mieknathshinde नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्क��ळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@CMOMaharashtra @mieknathshinde
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@CMOMaharashtra@mieknathshinde
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी.
@navalMH@PMCPune
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोज��� स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद��रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी.
@navalMH @PMCPune
पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना “निर्णय लकवा” झालाय का?
आज वरणगाव नगरपरिषद (तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव) येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुद्धा पुणे महानगर पालिकेला कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी पत्र दिले आहे. लाखो परीक्षार्थी, संघटना व लोकप्रतिनिधींनी विनंती पत्र दिल्यानंतरही जर पुणे महापा���िका आयुक्त योग्य निर्णय घेत नसतील, तर त्यांनी तातडीने पायउतार व्हावं!
मा. अजित दादा,
आपण पुण्याचे पालकमंत्री आहात. पार्थ पवार यांना एक न्याय आणि लाखो परीक्षार्थींना वेगळा न्याय का?
@AjitPawarSpeaks @INCHarshsapkal @chennithala @BMSandeepAICC
@navalMH @PMCPune
1 Dec PMC Exam
900 - 1000 Fees घेऊन सुद्धा Private Center वरती पेपर का ?
Exam Center Prefrences जे विद्यार्थ्यांनी दिले,ते सोडून 300 - 400 km लांबचे सेंटर दिले. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना iON - Digital सेंटर द्यावे. @PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
पुणे महानगरपालिकेअंतर्गत घेण्यात येणारी कनिष्ठ अभियंता JE परीक्षा १ डिसेंबरला घेण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ३००-४०० कि.मी. लांब परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळं दुसऱ्या दिवशी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदान��साठी विद्यार्थी पोहोचू शकणार नाहीत, शिवाय आधीच शासकीय सेवेत असलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्शन ड्युटी असल्याने त्यांनादेखील ही परीक्षा देता येणार नाही. याशिवाय परीक्षेत पारदर्शकता राहण्या��ाठी ही परीक्षा TCS ION CENTER वरच आयोजित करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे.
ही बाब लक्षात घेत शासनाने सदर परिक्षा पुढे ढकलावी आणि निवडणूक संपताच आठवड्याच्या आत ही परीक्षा TSC ION CENTER वर घेऊन व विद्यार्थ्यांचं होणारं संभाव्य नुकसान टाळावं, ही विनंती!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@Dhananjay4INC पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता ह्या पदाची एक्झाम पुढील तारीख देऊन टीसीएस अधिकृत या सेंटरवरच एक्झाम घेण्यात यावी ही कृपया कळकळीचे विनंती आहे तमाम महाराष्ट्रातील युवकांची व बेरोजगारांची मागणी आहे
@Dhananjay4INC माननीय पुण े महानगरपालिका ला मनापासून विनंती आह े की त्यांनी मुलांच े जास्त हाल करु नये.. वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यासक्रम, बदलेली अभ्यास पद्धती आण ि परीक्षेची वाढती fees ला ���ेऊन विद्यार्थी आधीच खूप त्रस्त असतात त्यात खूप लांब लांब सेंटर टाकून आमच े जास्त हाल करु नये... #PMC
PMC ज्युनियर इंजिनिअर भ���ती परीक्षा १ डिसेंबरला आहे, पण उमेदवारांनी निवडलेली केंद्रे न देता शेकडो किमी दूर खासगी केंद्रे लादली गेली आहेत!!! अनेकांना १-२ डिसेंबरला नगरपरिषद निवडणूक ड्युटी + २ डिसेंबरला मतदानाचा हक्कही गमावावा लागणार!
परिणामी हजारो पात्र उमेदवार परीक्षेलाच बसू शकणार नाहीत. हा थेट अन्याय आहे!
@navalMH @PMCPune साहेब,
➡️ चुकीची केंद्रे तात्काळ दुरुस्त करा ➡️ १ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही विनंती.
#PMC_JE_Exam #परीक्षा_पुढे_ढकला
@INCHarshsapkal @INCMaharashtra @Mpsc_Andolan @degree_holders @PunyachiMPSC
@NashikCorp ने ( स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांच्या अनुभवाची जाचक अट रद्द करावी.
नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेब आपण यात तत्काळ लक्ष घालावे ही नम्र विनंती.🙏
गतिमान सरकारचं ���ास्तव!
एक वर्ष पूर्ण झालं तरी ना सुधारित सेवा प्रवेश नियम, ना भरतीची जाहिरात!
दोन-दोन मंत्री असलेल्या विभागात इतकी निष्क्रियता म्हणजे तरुणांच्या भविष्यासोबत केलेला स्पष्ट अन्याय आहे.
@Dev_Fadnavis भाऊ,
हीच का “डबल इंजिन” सरकारची गती?
@INCHarshsapkal @RVikhePatil @SanjayDRathods @girishdmahajan
#PaperLeakSarkar #YouthJustice #MPSC
मा. @Dev_Fadnavis साहेब
खालील 3 मुद्दे आपण गंभीरतेने घ्यावे व तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत ही
बेरोजगारांकडून माझी नम्र विनंती
अन्यथा विद्यार्थ्यांना आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही
प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावरची लढाई योग्य नाही.
यात सरकारचीच
प्रतिमा मलिन होते.
🔶 #WRD
@RVikhePatil@girishdmahajan
जलसंपदा कनिष्ठ अभियंता चे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याची कार्यवाही अजून किती महिने सुरु राहणार आहे ? #RR नाहीत म्हणून भरती नाही व भरती लवकर काढायची नाही म्हणून #RR प्रसिद्ध करायचे नाहीत असे ठरवलं आहे काय ???
मा. @maha_governor आपण यावर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देणे आता क्रमप्राप्त झाले आहे.
काही त्रुटी होत्या,त्या दूर झा��ेल्या
असताना इतका प्रदीर्घ कालावधी यासाठी लागणे हे सरकार व प्रशासनाच्या अधोगतीचेच प्रतीकआहे.
महामहीम @maha_governor
महोदय कृपया हा मुद्दा आपण गभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती.
🙏🙏🙏
🔶 @SanjayDRathods आपण विसरला असाल तर स्मरण करून देऊ इच्छितो
आपण #WCD मृद जलसंधारण मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून
तब्बल 8 वेळा पदभरतीची घोषणा केली आहे.
गोरगरीब बेरोजगारांच्या भावनांशी हा खेळ व त्यांची क्रूर चेष्टा आहे.
👉 अडीच महिन्यापूर्वी आपण
संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आकृतीबंधाचा शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले होते ना.
कुठे आहे आकृतीबंध???
तो मंजुरीसाठी पण गेला नाही अजून???
अधिकारी वर्ग आपल्या निर्देशानुसार कार्यवाही करत नाही काय ??
कोण आहेत झारीतले शुक्राचार्य ???
निदान आतातरी आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्याल ही अपेक्षा.
🔶 @MeghnaBordikar
@GulabraojiPatil
आपण दोघांनी यात तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 100%
पदभरतीच्या आश्वासनाचे काय झाले ??
तमाम बेरोजगार कित्येक महिन्यापासून
पदभरतीची वाट पाहत आहेत.
🔶 #WCD_recruitment
#MJP_Recruitment
#WRD_Recruitment
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@NANA_PATOLE
@MahaDGIPR
@INCHarshsapkal
#MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध पदांच्या भरती परीक्षेला दीड-दोन महिने झाले आहेत परंतु अजून निकाल लागलेला नाही. @midc_india आणि विभागाचे मंत्री महोदय मा. उदय सामंत @samant_uday आपल्याला नम्र विनंती आहे, MIDC भरतीचा निकाल लवकर जाहीर करावा.
📍 जलसंधारण विभाग पदभरती
उद्याच्या कॅबिनेट मध्ये जलसंधारण विभागाच्या आकृतीबंध बाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर जाह��रात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WCD_Recruitment
@SanjayDRathods
🔴वाल्मी आंदोलन 🔴
📍वाल्मी,छत्रपती संभाजीनगर आंदोलन आंदोलन बाबत आज प्रमुख पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांची मीटिंग संपन्न झाली,जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती जाहिरातीसाठी आंदोलनाची तयारी आहे असे सर्वांनी सांगितले.
#WCD_Recruitment@SanjayDRathods@Dhananjay4INC
मा. संजय राठोड
मृदा आणि जलसंधारण मंत्री
महाराष्ट्र शासन,
मंत्रालय, मुंबई.
विषय: स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदभरतीच्या जाहिरातीबाबत त्वरित कार्यवाही करण्याबाबत विनंती.
महोदय,
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क आहे आणि यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी आहे.
मृदा आणि जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदभरतीबाबत छत्रपती संभाजीनगर येथे अल��कडेच प्रमुख संघटना, परीक्षार्थी आणि प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत आपण पूर्वी दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता न झाल्यामुळे आणि जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या विलंबामुळे हजारो पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे भविष्य अधांतरी राहिले असून, “संविधानिक मार्गाने रोजगार सत्याग्रह” करण्याचा निर्णय परीक्षार्थ्यांनी घेतला आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी आपण तातडीने निर्णय घेऊन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी, ही संबंधित सर्वांची सामूहिक आणि नम्र मागणी आहे.
यासंदर्भात, ३१ जुलै २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिलेल्या अल्टिमेटमची आठवण करून देतो. त्यानुसार, जर लवकरच जाहिरात प्रसिद्ध झाली नाही, तर छत्रपती संभाजीनगर येथील “वाल्मी” संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रोजगार सत्याग्रह आयोजित करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
आपल्या नेतृत्वाखाली विभागाने अनेक उल्लेखनीय प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले आहेत. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरते��ुळे आणि पदभरती प्रक्रियेतील विलंबामुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे, तसेच हजारो तरुणांच्या रोजगाराच्या आशा धूसर होत आहेत.
आपण तातडीने सकारात्मक पावले उचलून ही प्रक्रिया गतिमान कराल, अशी आम्हाला ठाम अपेक्षा आहे.
आपल्या त्वरित आणि सकारात्मक कार्यवाहीच्या प्रतीक्षेत.
आपला नम्र,
धनंजय रामकृष्ण शिंदे
राज्य संयोजक : रोजगार विभाग
प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती
@INCHarshsapkal @SanjayDRathods @drkalyankale
#WCD_Recruitment #WRD_JE #RojgarSatyagrah #YouthForJobs