Heartiest congratulations to our young wrestlers, coaches and support staff. Their grit, discipline and determination have brought great pride to the nation.
Wishing Team India continued success in the journey ahead.
(3/3)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान २०२५' अंतर्गत 'अ' वर्ग बसस्थानकांमध्ये बारामती बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. या पुरस्कारासाठी मा. उपमुख्यमंत्री व बारामतीच्या आमदार सुनेत्रावहिनी पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले!
आदरणीय अजितदादांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या आधुनिक, स्वच्छ व सुंदर बसस्थानकाने महाराष्ट्रासमोर विकासाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. बारामतीकरांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे!
@SunetraPawar@mahancpspeaks@SunilTatkare@ChhaganCBhujbal@Dwalsepatil@dhananjay_munde@parthajitpawar
आधुनिक भारत के 'इंफ्रास्ट्रक्चर मैन' और केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी @nitin_gadkari को जन्मदिवस की बहुत-बहुत बधाई।
ईश्वर आपको स्वस्थ, सुखी और दीर्घायु रखे। आपके उत्तम स्वास्थ्य एवं दीर्घायु जीवन की मंगलकामनाएं।
कृषी, सहकार, उद्योग, शिक्षण, आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांच्या प्रगतीत आपलं मोलाचं योगदान देणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व, माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
📍मंत्रालय, मुंबई | २६ मे २०२६
मंत्रालय येथे 'पद्म पुरस्कार २०२७' संदर्भातील आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहून पुरस्कार प्रदान प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली. राज्याच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय पातळीवर गौरविण्याच्या दृष्टीने पद्म पुरस्कार प्रक्रियेतील विविध बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला.
राजशिष्टाचार मंत्री श्री. जयकुमारजी रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री श्री. उदयजी सामंत, मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे, मंत्री श्रीमंत छत्रपती श्री. शिवेंद्रराजे भोसले, मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्यासह संबंधित विभागांचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, विज्ञान, कृषी, उद्योग, पर्यावरण, लोकसेवा आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळावा, यासाठी सर्वंकष छाननी करून अंतिम शिफारसी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळावा, या दृष्टीने शिफारसी प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्ताधारित पद्धतीने राबविण्याबाबत यावेळी सर्व समिती सदस्यांनी आपली मते मांडली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गठीत करण्यात आलेली ही राज्यस्तरीय समिती विविध प्रस्तावांचा सखोल अभ्यास करून अंतिम शिफारसी निश्चित करणार आहे. आगामी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२७ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अधिकाधिक पात्र आणि गुणवंत व्यक्तींना स्थान मिळावे, या दृष्टीने ही प्रक्रिया प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे.
#AditiTatkare #PadmaAwards2027 #Mantralaya #Maharashtra #GovernmentOfMaharashtra
निर्णय महायुतीचे, महाराष्ट्राच्या हिताचे !
आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्रीमती. सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने महायुती सरकारची भविष्यवेधी वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
#maharashtra #cabinetdecisions #development #Adititatkare
📍 गीताबाग, सुतारवाडी, ता. रोहा,
सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात 'जनता संवाद' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधला. नागरिकांच्या विविध समस्या, अडीअडचणी प्रत्यक्ष संवादातून जाणून घेतल्या. स्थानिक पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, गावांच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर
अन्यायाच्या विरोधात लढण्याची, उदात्त हेतूच्या रक्षणार्थ समर्पणाची प्रेरणा देणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती...
छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट आजही स्वराज्यातील प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी गाथा आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेला लढा इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. एकाच वेळी ५-५ आघाड्यांवर विजय मिळवणारे रणधुरंधर, वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी "बुधभूषण" हा संस्कृत ग्रंथ रचणारे प्रकांडपंडित म्हणून छत्रपती संभाजी महाराज म्हणून यांनी अवघ्या विश्वात लौकिक मिळवला.
स्वराज्याला लाभलेल्या या महान नेतृत्वाला, छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा !
#छत्रपतीसंभाजीमहाराज #स्वराज्यरक्षक #शंभूराजे #जयंती #अभिवादन
"मुक्ताई गाई सुखीं त्या दुधाची।
केली निवृत्तीनें इच्छा भोजनाची।।"
वारकरी संप्रदायातील थोर संत, योगिनी आणि आदिशक्तीचे रूप मानल्या जाणाऱ्या संत मुक्ताई यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#SantMuktabai#Maharashtra#warkari
आज पुणे येथे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या धरणे आंदोलनाला भेट दिली. आंदोलक शिक्षक बांधवांसोबत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेऊन संच मान्यतेतील प्रस्तावित बदलांबाबत चर्चा केली.
शिक्षक पदसंख्या, ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी संबंधित प्रश्नांवर यापूर्वीही विधिमंडळात आवाज उठवला असून २५ तारखेला होणाऱ्या आंदोलनातही शिक्षक बांधवांच्या या मागण्या मी ठामपणे मांडणार आहे.
#TeachersRights #Education #FutureGenerations #Maharashtra
@ChDadaPatil@dadajibhuse
परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमारजी जेथलिया यांच्या परतूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच चिरंजीव नितीनजी जेथलिया व शोकाकुल कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
Behind every patient is a nurse who works tirelessly to ensure comfort, care, and recovery. Today, we celebrate these silent heroes who dedicate their lives to the service of humanity.
Happy International Nurses Day!
#InternationalNursesDay
आसामचे मुख्यमंत्री मा.श्री. हिमंत बिस्वा सरमा जी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या भाजप-एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी, राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीम. सुनेत्रा अजितदादा पवार यांच्यासमवेत गुवाहाटी येथे पोहोचलो असता आसामच्या स्थानिक नागरिकांनी मोठ्या आपुलकी व आत्मीयतेने पारंपरिक पद्धतीने आमचे स्वागत केले, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
दरम्यान, आसाममधील कामाख्या देवी मंदिरात जाऊन भक्तीमय वातावरणात माता कामाख्या देवीचे मनोभावे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख-समाधान, समृद्धी, शांतीसाठी प्रार्थना केली.
जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या विविध बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी १०वीच्या निकालातून सिद्ध करून दाखवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सकारात्मक जीवनाचा मार्ग स्वीकारत या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे. यंदा पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापाठोपाठ मुंबई उपनगर येथील ८८, अहिल्यानगर येथील ८०, बीड येथील ४७, ठाणे जिल्ह्यातील ४२, सोलापूर येथील ३९ आणि कोल्हापूर येथील ३४ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष कौतुक म्हणजे कोल्हापूरमधील एका विद्यार्थ्याने ९५.२०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून बीडच्या विद्यार्थ्याने ९४% गुणांची नोंद केली आहे. यासोबतच पुणे, सोलापूर, मुंबई आणि धाराशिव येथील अनेक विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत गुणवत्तेचा झेंडा फडकवला आहे.
बालगृहातील या मुलांसाठी आमचा विभाग सातत्याने प्रयत्नशील असून, ऑनलाईन सेशन्स, शिक्षकांचे विशेष वर्ग आणि समुपदेशन अशा सुविधा पुरवल्या गेल्या, ज्याचा मोठा फायदा या निकालात दिसून आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास कटिबद्ध असून, त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव पाठीशी उभे राहू. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
#AditiTatkare #SSCResults #MaharashtraGovernment #WCD #SuccessStory #EducationForAll #MaharashtraEducation
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते जय अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे आजपासून जनता दरबार उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
जनतेच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्या जाणून घेत युवा नेते जय पवार यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ दूरध्वनीवर संपर्क साधत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या प्रश्नांबाबत तत्परता आणि संवेदनशीलता दाखवत प्रशासनाशी समन्वय साधण्यावर त्यांनी विशेष भर दिला. बारामतीतील नागरिकांच्या समस्या जलद आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असून, या माध्यमातून जय पवार नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
तुमच्या मेहनतीचा, चिकाटीचा आणि आत्मविश्वासाचा हा सुंदर विजय आहे. कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे. तुमच्या या यशामुळे कुटुंब, शिक्षक आणि समाजाचा गौरव वाढला आहे.
आयुष्यातील पुढील प्रत्येक पाऊल यश, प्रगती आणि नव्या संधींनी भरलेले असो, हीच शुभेच्छा!
ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळाला नाही, त्यांनी निराश होऊ नये. अपयश हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा मार्ग असतो. स्वतःवर विश्वास ठेवा, पुन्हा जोमाने प्रयत्न करा. यश तुमची नक्की वाट पाहत आहे!
सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#SSCResult2026 #MaharashtraBoard #StudentSuccess #Congratulations #NCP”
इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. यामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या पालकांचे व शिक्षकांचे देखील मनापासून अभिनंदन करतो.
ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी निराश न होता नव्या जिद्दीनं पुन्हा प्रयत्न करावेत. यश नक्की मिळेल!
#SSCResults
काही वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये रायगड जिल्ह्यातील अल्पवयीन मातांबाबत १६,५५७ हा आकडा प्रसिद्ध केला आहे, तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आकडा आहे.
हा आकडा रायगड जिल्ह्यातील, जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग येथे एप्रिल २०२१ ते मार्च २०२६ अखेर प्रसुती झालेल्या मातांची एकूण संख्या आहे. त्याचबरोबर, माझी जी प्रतिक्रिया या बातमीसोबत जोडली जात आहे, ती आजची नसून १ मे २०२६ रोजी बालविवाह रोखण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिलेली आहे.
बालविवाहाची प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी 'महिला व बालविकास विभाग', सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्थानिक जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे आणि आम्ही आमचे काम अधिक जोमाने सुरूच ठेवणार.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@MahaDGIPR
आरक्षण आणि सामाजिक न्यायाचे जनक, बहुजन समाजाचे उद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी.
कोल्हापूर संस्थानात समतेची मुहूर्तमेढ रोवून वंचितांना शिक्षणाचे आणि प्रगतीचे दरवाजे उघडून देणाऱ्या महान लोकराजांचे विचार आजही आपल्याला दिशा दाखवत आहेत. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#राजर्षीशाहूमहाराज
📍अलिबाग (जि.रायगड)
रायगड जिल्ह्यातील आघाडीचे माध्यम असलेल्या "रायगड टाइम्स" च्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व नवनिर्वाचित सदस्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, मंत्री म्हणून काम करत असताना येणारे विविध अनुभव, जनसंपर्काचे महत्त्व, विकासकामांचे प्राधान्य ई. विषयांवर उपस्थितांसोबत संवाद साधला. विधानसभेचे अध्यक्ष मा.श्री. राहुलजी नार्वेकर यांचेही बहुमोल मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा उत्साह खरोखर ऊर्जादायी होता.
यावेळी आमदार श्री. महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. मंगेश वाकडीकर, "रायगड टाइम्स"चे संपादक श्री. राजन वेलकर, नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले माजी सनदी अधिकारी व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@rahulnarwekar
#रायगड #रायगडटाइम्स