283 इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील विविध महाविद्यालयांमध्ये नव मतदार नोंदणी बाबत शिबीर आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर येथे श्री उगले, नायब तहसिलदार विद्यार्थ्यांशी संवाद साधताना.
दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी 283 इस्लामपूर विधानसभा मतदार संघा मध्ये तहसिल कार्यालय वाळवा इस्लामपूर येथे दिव्यांग व्यक्तींना EVM VVPAT मशीन या संबधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती करण्यात आली.
दिनांक 04 ऑक्टोंबर 2023 रोजी आष्टा येथील भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वस्तीला भेट देवून पात्र मतदारांचे नमुना नंबर 6 चे फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच मतदार यादीत नाव असणारे मतदार परंतु मतदान ओळखपत्र नाही अशा मतदारांचे नमुना 8 चे फॉर्म भरून घेण्यात आले.
त्यावे��ी श्रीमती धनश्री शंकरदास, सहा.मतदार नोंदणी अधिकारी (283 इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ) तथा अप्पर तहसिलदार आष्टा, श्रीमती सीमा सोनवणे, प्र.निवडणूक नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
'लोकशाही गप्पा भाग-११'
लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण
या ��ार्यक्रमात सामाजिक छायाचित्रकार 'इंद्रजीत खांबे' यांनी 'लोकशाही मूल्यं' याविषशी व्यक्त केलेले मत.
लाइव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी ceo_maharashtra ला फॉलो करा.
आज दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी महादेव नगर अनंत गंगा समोरील भाग इस्लामपूर येथील भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वस्तीला भेट देवून पात्र मतदारांचे नमुना नंबर 6 चे फॉर्म भरून घेण्यात आले.
तसेच मतदार यादीत नाव असणारे मतदार परंतु मतदान ओळखपत्र नाही अशा मतदारांचे नमुना 8 चे फॉर्म भरून घेण्यात आले. त्यावेळी श्रीमती सीमा सोनवणे, प्र.निवडणूक नायब तहसिलदार व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या!
#blo#boothlevelofficer#officer
लोकशाही बळकट करण्याच���या दृष्टीने सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देत आहेत.
यासंबंधी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी.