बाळकुम पाडा न.१ गणेश बावडी जवळील ताशविनी हॉटेल समोर, साकेत रोड वरील बाळकुम, ठाणे पश्चिम या ठिकाणी असलेल्या अनधिकृत इमारती वर नाममात्र कारवाही करून माजिवडा मानपाडा प्रभाग समिती चे अधिकारी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याचा कोर्टाचा आदेश असून कोर्टाच्या आदेशाचा ही अवमान केला जात आहे, ठामपा अधिकारी कर्मचारी यांचा स्वतःचा आर्थिक फायदा करून अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिले जात आहे अशी शंका निर्माण जनतेच्या मनात तयार होत आहे.
तेव्हा बाळकुम मधील काम चालू असलेल्या अनधिकृत इमारती वर जमीनदोस्त करण्याची हिंमत आणि ईमानदारी ठाणे महानगरपालिका आयुक्तांन कडे आहे का? हिंमत असेल तर तसे योग्य कारवाही करून सिद्ध करावे
@TMCaTweetAway@ThaneCityPolice@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Awhadspeaks@rautsanjay61@PratapSarnaik #balkum #illegalconstruction
ठाणे मधील विवयाना मॉल जवळील सर्विस रोड हून माजिवडा सर्कल कडे जात असताना हे वाहन दिसले (MH04LN 2799-Toyota) हे अतिशय वेगाने सायरन वाजवत रस्त्यावर धावत होते, वाहनाला सरकारी वाहन किंवा emergency सेवेचे कोणतेही लेबल फलक नव्हते, मग प्रश्न असा निर्मांत होतो की अशी खाजगी वाहने सायरन वाजवत जलद गतीने धावतात त्याकडे ठाणे वाहतूक पोलिस कसे काय दुर्लक्ष करतात?
ठाणे वाहतूक पोलिस हे वाहन कोणत्या VIP चे आहे याचा शोध घेऊन 🚨 सायरन वाजवत फिरणाऱ्या या वाहनाला सायरन वाजवण्याची कोणती विशेष परवानगी दिली आहे हे जनते समोर स्पष्ट करतील का?
@ThaneTraffic@ThaneCityPolice@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@PratapSarnaik@nareshmhaske@Awhadspeaks@rautsanjay61 #thane #traficrules @nitin_gadkari
नवी मुंबई मधील रबाळे, घणसोली येथे घर घेणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी
नवी मुंबई मधील रबाळे येथील गोठवली गाव येथील, MSEB ऑफीस जवळील नवी मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार निदर्शनास आला आहे. मुख्य रस्ता लागत सध्या 5 मजले इमारत पहायला मिळत आहे, पण जानेवारी 2025 मधील फोटो मध्ये आपण पाहू शकता ही इमारतीचं चौथ्या मजल्याच काम सुरू असताना दिसुन आले होते.
सदर इमारत ही अनधिकृत इमारत असून या इमारतीबाबत घणसोली येथील नवीमुंबई महानगर पालिकेच्या घणसोली प्रभाग समिती एफ विभाग कार्यालय येथे विचारणा केली असता त्यांनी एक लेखी उत्तर दिले आहे ते सोबत जोडलेले आहे.
या पत्रकानुसार ही अनधिकृत इमारत 21/7/2023 या दिनी पालिकेच्या निदर्शनास आली होती व त्यानंतर 21/7/2023 यादिनी MRTP नियमानुसार कलम 54 अन्वये नोटीस देण्यात आली व त्यानंतर 29/8/2023 या दिनी या अनधिकृत इमारतीवर अंशतः कारवाही करण्यात आली आणि आता 21/1/2025 या दिनी स्थानिक पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या सर्व नाममात्र कारवाह्या करून फक्त कागद काळे करण्याचं काम महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यामार्फत केलेले स्पष्ट होत आहे.
इमारत 21/7/2023 या दिवशी जेव्हा अनधिकृत असल्याचं निदर्शनास आले तेव्हा कठोर कारवाही का नाही करण्यात आली?
बांधकाम अनधिकृत असल्यास जमीनदोस्त करण्याचा नियम पालिका विसरली आहे का?
आता जुलै 2025 चालू असून ही अनधिकृत इमारत ही 5 मजले पूर्ण झालेले दिसून येते.
यातून एकच स्पष्ट होत आहे की नवीमुंबई महानगरपालिकेमध्ये नियम फक्त गरिबांसाठी आहेत अधिकाऱ्यांचे खिसे गरम करणाऱ्या इमारत विकासकाना सगळे गुन्हे माफ असच यातून सिद्ध होत.
नागरिकांना कळ कळीची विनंती आहेकी अनधिकृत इमारती मध्ये घर घेऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका.
घर घेताना कायदेशीर चौकशी करावी
धन्यवाद.
तोफखाना डिजिटल
संपर्क -- 8605735811
@NMMConline@DGPMaharashtra@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@ShivSenaUBT_@Awhadspeaks@INCIndia@BJP4India #rabale #ghansoli #navimumbai #illegalconstruction @rabalepolice
सावधान!
ऐरोली, नवीमुंबई मध्ये घर घेत असाल तर सावधान!
जेबी बाई निवास, ऐरोली गावठाण गल्ली रोड, सेक्टर न २०, ऐरोली येथे अनधिकृत इमारतीचं बांधकाम होत असल्याचं निदर्शनास आले आहे व या बांधकामा संबंधित नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली जी विभाग कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले आहे व या लेखी उत्तरात स्पष्टपणे ही इमारत अनधिकृत असून या इमारत विकासकाला नोटीसा देऊन अंशतः कारवाही करून २५००० रुपये दंडात्मक शुल्क वसूल केले आहेत.( सोबत जोडलेलं पालिकेने दिलेले पत्रक आवश्य वाचावे)
सध्या ही इमारत आपण प्रत्यक्षात जाऊन पाहिली तर कुठल्याही प्रकारची कारवाही झालेली नाही हे दिसून येते उलट ही इमारतिचे बांधकाम पूर्ण होण्यास पालिकेकडून मदत करत असल्याचं दिसून येत, केवळ किरकोळ नाममात्र कागदी कारवाही करून मुभा दिल्याचं दिसून येते.
अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याचा महानगरपालिकेचा नियम असताना ही व उच्च न्यायालयाचा आदेश असुन ही स्वतःच्या फायद्यासाठी महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी मुद्दाम डोळे मिटून बसलेले आहेत.
नागरिकांना विनंती आहे अनधिकृत इमारती मध्ये घर घेऊ नका.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज फॉरवर्ड करा
धन्यवाद
तोफखाना डिजिटल
आधिक माहिती साठी संपर्क
8605735811
ठाणे पश्चिम येथील होरायझन फ्लोरा समोर मल्टी कार वर्क शॉप्सच्या बाजुला, भाईंदरपाडा, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम येथे एका भलमोठ अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं दिसुन आले आहे सदर बांधकामां बाबत ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समिती येथे चौकशी केली असता, हे बांधकाम अनधिकृत असुन यावर लवकरच कारवाही केली जाईल अशी अधिकाऱ्यांकडून उत्तर देण्यात आले आहे.
सदर बांधकाम ठिकाणाचा इतिहास पाहिला असता ऑक्टोबर 2021 मध्ये येथे कोणतेही बांधकाम दिसुन येत नाही, त्यानंतर एप्रिल 2025 मधील फोटो ही आपण पाहू शकता याकाळात ही कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू असलेले दिसुन येत नाही पण आता जुलै महिन्यातील फोटो आपण पाहू शकता, जुन - जुलै याकाळात हे बांधकाम सुरू झाले असावे असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
यासर्व प्रकरणातून एकच सिद्ध होते की महानगरपालिकेची यंत्रणा कुठे तरी कमी पडत आहे किंवा मुद्दाम असे विषय दुर्लक्षित केले जात आहेतका? याचे उत्तर महानगरपालिकेचे आयुक्त देतील का?
तोफखाना डिजिटल आधीक माहितीसाठी संपर्क करा
8605735811
@TMCaTweetAway@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@DGPMaharashtra@ThaneCityPolice #thane #ghodbunder #illegalconstruction
ठाणे महानगरपालिकाच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या कार्यालयाच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर रस्त्याची ही अवस्था आहे, लोखंडाचे एक मोठे झाकण मोडकळीस आले असुन एखादा पादचारी किंवा वाहन चालकाचा अपघात होण्या अगोदर पालिकेने खराब झालेले गटाराचे झाकण दुरुस्त करण्याची जनतेवर मेहरबानी करावी
@TMCaTweetAway@ThaneCityPolice@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
Watch full Viseo now -
जय जिजाऊ
काही दिवसांपूर्वी कळवा येथे रस्त्यावर राहत असलेल्या आजीना निवारा मिळवुन देण्याबाबत आपण एक व्हिडिओ केला होता व सतत प्रयत्न करून आज त्या आजींना निवारा मिळवुन देण्यात यश आलेले आहे.
आजींना वैद्यकीय मदत मिळाली असुन त्यांना राहण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिका संचालित:- मा आस्था सामाजिक विकास सेवा संस्थामुंबई घणसोली येथील निवारा केंद्रात राहण्यासाठी जागा मिळाली आहे.
संभाजी ब्रिगेड चे खंबीरपणे साथ देणारे मित्र व जिजाऊ ब्रिगेडच्या ठाणे जिल्हाध्यक्ष सुनीता पाटील मॅडम आणि महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या कडून मिळालेल्या सहकार्य बद्दल आभारी आहोत
अशाच प्रकारे आपल्या सगळ्याच्या साथीने आपल्या हातून सदैव असे चांगले सामाजिक कार्य घडत राहील अशी इच्छा व्यक्त करतो.
शिवश्री नितीन शा. झेंडे
ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
#जयजिजाऊ #नमोबुद्धाय #जयमहाराष्ट्र #जयभीम #जयशिवराय #ठाणे #नवीमुंबई #घणसोली #कोपरखैरणे #homelessshelter #nmmccommissioner #thanksforyoursupport @highlight
ठाणे येथील माजिवडा बाळकुम या परिसरातील सिद्धार्थ नगर, बुद्धविहार जवळ असलेल्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम आपण २०२४ मध्ये निदर्शनास आणून दिले होते पण आज कित्येक महिने झाले तरी या बांधकामावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही, महानगरपालिका केवळ कागदी कारवाही करून अनधिकृत इमारत पुर्ण होण्यास मदत करताना दिसत आहे, महानगरपालिका अधिकारी कर्मचारी पगार सरकारचा घेतात पण काम मात्र भूमाफिया गावगुंडासाठी करतात.
ठाणे महानगरपालिका आयुक्तांना नम्र विनंती आहे की या विषयात सखोल चौकशी करून अनधिकृत असलेल बांधकाम जमीनदोस्त करावे ही विनंती.
@TMCaTweetAway@DGPMaharashtra@ThaneCityPolice@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@nareshmhaske@PratapSarnaik@DrSEShinde #thane #balkum #illegalconstructions
तुम्हाला नक्की काय बनायचे आहे? #धर्म#विज्ञान#अंधभक्त#अंधश्रध्दा#हिंदू Pravin Gaikwad Sambhaji Brigade - अधिकृत Anandraj Ambedkar Sambhaji Brigade Mumbai CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Jitendra Awhad PMO India संभाजी ब्रिगेड नवी मुंबई Satish Patil BHIM ARMY Aimim- All India Majlis-E-Ittehadul Muslimeen Balasaheb Ambedkar Vanchit Bahujan Aghadi @highlight
MSEB कार्यालया जवळ, सेक्टर ३०, गोठिवली गाव, शारकार वाडी, रबाळे, नवी मुंबई ४००७०१, (सोबत GPS फोटो लोकेशन जोडले आहे) या परिसरातील असलेल अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले होते पण आज कित्येक महिने झाले तरी या बांधकामावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही, महानगरपालिका केवळ कागदी कारवाही करून अनधिकृत इमारत पुर्ण होण्यास मदत करताना दिसत आहे, महानगरपालिका अधिकारी कर्मचारी पगार सरकारचा घेतात पण काम मात्र भूमाफिया व गावगुंडासाठी करतात. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना नम्र विनंती आहे की या विषयात सखोल चौकशी करून अनधिकृत असलेल बांधकाम जमीनदोस्त करावे ही विनंती. @NMMConline@DGPMaharashtra@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSEShinde@Awhadspeaks
ठाणे पश्चिम येथील आई माता मंदिर, ठाणे येथील आईमाता मंदिर चौकात, आनंद टॉवर च्या बाजुला , युनियन बँक ऑफ इंडिया समोर, आचार्य अत्रे मार्ग , लोकमान्य नगर, ठाणे पश्चिम 400606, या परिसरातील असलेल अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले होते व त्यावर काही दिवसापूर्वी किरकोळ तोडक कारवाही केली गेली, सदर कारवाई संबंधित पालिकेचे पत्रक ही प्राप्त झाले. पण ठाणे महानगरपालिका आयुक्तांना माझा प्रश्न असा आहे की केवळ किरकोळ कारवाई का केली जाते जेव्हा बांधकाम ही अनधिकृत असल्यास त्याला जमीनदोस्त का केले जात नाही, किरकोळ कारवाई करण्यात पालिका बांधकाम करणाऱ्यास पुन्हा बांधकाम रिपेअर करून पूर्ण करण्याची संधी देत आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर आयुक्त साहेब देऊ शकतील का?
@TMCaTweetAway@DGPMaharashtra@ThaneCityPolice@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSEShinde@PratapSarnaik #thane #lokmanyanagar #वर्तकनगर
ठाणे पश्चिम येथील बाळकुम पाडा न.1 जवळील अशोक नगर समोरील, पाइपलाइनला लागून असलेले भंगारवाल्यानी अनधिकृतपणे बांधलेल्या गाळ्यावर अंशतः कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तांना एक विनंति आहे फक्त फेरीवाले, छोटे मोठे भंगारवाले, फेरीवाले यावर कशी फौज फाट्यासह कारवाही केली जाते तशीच मोठ्या मोठ्या अनधिकृत इमारत बांधकाम वर कारवाही करण्याची हिम्मत दाखवावी
@CMOMaharashtra@TMCaTweetAway@DGPMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSEShinde@PratapSarnaik@Awhadspeaks
बाळकुम पाडा न.1, गणेश बावडी जवळील, ताशविनी हॉटेल समोर, साकेत रोड, बाळकुम ठाणे पश्चिम या ठिकाणी अनधिकृत इमरतीच बांधकाम सुरू होते याबद्दल ठाणे महानगरपालिका आयुक्त व माजिवडा मानपाडा प्रभाग समिती यांना वर्ष भरापासून माहिती पुरवण्यात आली होती पण आता जून 2025 चालू असून इमारत पूर्ण तयार झाली असून पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाही केलेली दिसत नाही उलट अनधिकृत बांधकाम पूर्ण होण्याकरिता मदतच केलेली दिसून येते. गरीब फेरीवाले, छोटे छोटे व्यावसायिक टपऱ्यावर रोज कारवाही करणाऱ्या पालिकेला या मोठ मोठ्या भूमाफिया आणि इमारत विकासकाना सूट कशी काय देत असेल हे सर्व सामान्य लोकांना आता समजत चालले आहे. @TMCaTweetAway@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSEShinde@PratapSarnaik@Awhadspeaks@DGPMaharashtra@ThaneCityPolice@highlight #thane #majivada #balkum
मुंबई नाशिक हायवे भिवंडी येथे मानकोली नाक्या जवळील भागात आज भर पावसात रस्त्याचं काम सुरू असताना दिसुन आले. पावसाळ्या अगोदर संपणारी कामे आता घाई घाईने केली जात आहे विशेष म्हणजे हे पूर्ण काम साचलेल्या पाण्या मधेच काँक्रिट टाकलं जात आहे, यातून कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या कंपमीला आपले काम लवकरात लवकर संपवण्याची घाई दिसत आहे पण या मुळे रस्त्याच्या गुणवत्ते कडे सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे
@nitin_gadkari@MMRDAOfficial@msrd@TMCaTweetAway@CMOMaharashtra@DrSEShinde@Balyamama_FC@AjitPawarSpeaks #bhivandi #mankolinaka #mumbai #nashik #highwayvideo #mumbainashikhighway #roadconstruction @PMOIndia #MaharashtraPolitics
बाळकुम पाडा न.1, गणेश बावडी जवळील, ताशविनी हॉटेल समोर, साकेत रोड, बाळकुम, ठाणे पश्चिम या ठिकानी सुरू असलेल्या अनधिकृत इमारत बांधकामावर ठामपा माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अतिक्रमण विभागा तर्फे अंशतः तोडक कार्यवाही करण्यात आली. सोबत जोडलेलं व्हिडिओ आपण पाहू शकता केवळ इमारतीवर तुटपुंजी कारवाही करून केवळ कारवाही केली अस नाममात्र दिखावा केला जातो, सदर कारवाही ही रिपेअर करण्यासारखी असते बांधकाम धारक पुन्हा रिपेअर करू शकतात व पुन्हा ही दर्जाहीन अनधिकृत घरे विकुन नागरिकांची फसवणूक करू शकतात. ठामपा आयुक्तांना माझा एकच प्रश्न आहे वारंवार तुटपुंज्या कारवाही करण्यात नागरिकाचा टॅक्स चां पैसे आपण किती व्यर्थ करणार आहात . ठाणे मधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त कधी करणार आहात?
@TMCaTweetAway@DGPMaharashtra@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSEShinde@PratapSarnaik@Awhadspeaks@nareshmhaske #thane #balkum #majiwada #illegalconstruction