धर्म, संयम आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून देणाऱ्या भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवाच्या या पावन दिवशी आपल्या जीवनात सद्बुद्धी, धैर्य आणि आनंद लाभो हीच प्रार्थना.
🚩 जय श्रीराम! 🚩
#RamNavami#ShriRam#FestiveWishes
🗓 ५ मार्च २०२६ | 📍 मुंबई
वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप मागे
अन्यायकारक ई-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यव्यापी वाहतूकदारांच्या संपासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाहतूकदार संघटनांची शिखर समिती ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी’च्या सदस्यांशी संवाद साधला.
त्यांच्या मागण्यांचा शासन सहानुभूतीपूर्वक विचार करत असून, संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
#Devendrafadanvis #Eknathshinde #Pratapsarnaik #Transportminister
#Echallan
🗓 १७ फेब्रुवारी २०२६ | 📍 मंत्रालय
एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना मिळणार अभेद्य संरक्षण
राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल ₹१११ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीच्या बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण ६३३ ठिकाणी तब्बल ७०३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे एसटीच्या प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल नजर राहणार आहे.
या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (UAT) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येणार आहे.
'नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हा केवळ कॅमेरे बसविण्याचा उपक्रम नसून, तो एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणारा आणि प्रवाशांच्या विश्वासाला नवे बळ देणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे ‘लालपरी’चा प्रवास आता केवळ वेगवानच नव्हे, तर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानसज्ज होणार आहे. हीच या प्रकल्पाची खरी यशोगाथा ठरणार आहे.
@msrtcofficial
#PratapSarnaik #TransportMinister #MSRTC #CCTV #PublicSafety
महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या हातून असेच जनसेवेचे कार्य अविरतपणे सुरू राहो आणि आपणांस निरोगी आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
#Eknathshinde#DCM#Birthdaywishes@mieknathshinde
बारामतीत झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले. या घटनेने आज संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
अपघात क्षणात आयुष्य बदलून टाकतो, आणि काही व्यक्तींचं जाणं हे केवळ एका कुटुंबाचं नव्हे, तर संपूर्ण राज्याचं अपूरणीय नुकसान असतं. राज्यात सर्वाधिक उपमुख्यमंत्री पदाची धुरा अजित पवार यांनी सांभाळली. कुशल अर्थ मंत्री म्हणून त्यांनी राज्याला प्रगतीपथावर नेण्यास त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. नियोजनबद्ध, प्रशासनावर मजबूत पकड, शिस्तप्रिय, स्पष्टवक्ते, संघटनात्मक कौशल्य, जनतेसाठी झटणे हे त्यांच्या नेतृत्वाचे गुण कायम स्मरणात राहतील. राजकारणातून नाही आपल्या कामांमधून स्वतःची ओळख करून देत ते साऱ्या महाराष्ट्राचे हक्काचे दादा झाले. कोरोनाच्या काळात राज्याचा आर्थिक कारभार सक्षमपणे सांभाळत महाराष्ट्राची आर्थिक घडी नीट बसवली.
माझ्यासाठी ही हानी अधिक वैयक्तिक आहे… दादांशी घरचे, जिव्हाळ्याचे संबंध होते. कुटुंबातील व्यक्तीसारखं त्यांचं मार्गदर्शन, आपुलकी आणि आधार नेहमीच जाणवत राहिला. आज तो आधार हरपल्याची वेदना शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे.
या अत्यंत कठीण क्षणी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐
अखंड जीवन जनसेवेसाठी समर्पित करणारे आमचे प्रेरणास्थान गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#ananddighesaheb#shivsena#thane
आपल्या प्रखर विचार आणि अमोघ वकृत्वाने मराठी जनांवर अधिराज्य गाजवणारे, व्यंगचित्रातून फटकारणारे, मराठी अस्मितेचा केंद्र बिंदू, आमचे प्रेरणास्थान शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन!
#BalasahebThackeray #HinduHridaySamrat #ShivSenaSupremo #MarathiPride #MarathiAsmita #जन्मशताब्दी
🗓️ २३ जानेवारी २०२६ | 📍 मंत्रालय
हिंदुहृदयसम्राट, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस वंदन केले. यावेळी त्यांच्या कार्य व विचारांना उजाळा देण्यात आला.
#BalasahebThackeray#BirthCentenary#Ministry#Tribute
🗓 २४ जानेवारी २०२६ | 📍 ठाणे
ठाणेकरांचा बहुप्रतिक्षित असा संस्कृती आर्ट फेस्टिव्हल दि. ६ फेब्रुवारी ते दि. ९ फेब्रुवारी दरम्यान उपवन तलाव येथे आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा फेस्टिव्हल 'कला संगमाची विठ्ठलवारी' या संकल्पनेवर आधारित आहे. याची अधिकृत घोषणा आज पत्रकार परिषदेद्वारे केली. युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे सेक्रेटरी मनोज पिल्लई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा रंगणार आहेत. ७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पिता-पुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मन जिंकतील. ८ फेब्रुवारी रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजाने सुरेल संध्या रंगेल. ९ फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी व अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे.
याच बरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाचा मोहपात्रा, भरतनाट्यम् कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचे सादरीकरण होणार आहे. तसेच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत, भारूड, पोवडा, अभंग आदींचा सुंदर मिलाफ फेस्टिव्हल मध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक, चित्रप्रदर्शनाचाही समावेश आहे. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन विविध कलांचा मनमुराद आनंद घ्यावा.
#Pratapsarnaik #Transportminister #Sanskrutiartfestival2026
🗓 १९ जानेवारी २०२६ | 📍 मिरा भाईंदर
आज मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली.
- उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या २७०० कोटी रुपये निधीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती घेतली. काही प्रकल्प पूर्ण करण्यास अधिकाऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणी समजून घेतल्या. या सर्व अडचणी शासन स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करून सर्व प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागतील.
- मिरा भाईंदर शहराचा विकास करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आणखी निधी आणण्याचा प्रयत्न करत आहोत.
- मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी रस्ते विकासासाठी मंजूर केला असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया निवडणुकीच्या आचार संहितेमुळे थांबली होती. ती प्रक्रियाही पुढील महिन्यात सुरू करण्यात येईल.
- मिरा भाईंदर शहर हे फ्री वायफाय शहर बनवण्यासाठीचे सादरीकरण या बैठकी दरम्यान करण्यात आले. पुढील दोन ते तीन महिन्यात त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल.
- दर महिन्याला महानगरपालिका आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन पूर्वीप्रमाणेच नियमितपणे करण्यात येईल.
- स्थानिक आमदार आणि मंत्री अशी जबाबदारी मला जनतेच्या आशीर्वादाने मिळालेली आहे. माझ्या या पदाचा योग्य विनियोग व्हावा आणि जनतेला त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी प्रत्येक महिन्यात एक लोक दरबार माझ्या उपस्थितीत घेण्यात येईल. मिरा रोड, भाईंदर पूर्व आणि भाईंदर पश्चिम विभाग अशा तीन ठिकाणी लोक दरबार भरवण्यात येईल.
या बैठकीत मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाबिनोद शर्मा आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@My_MBMC
#PratapSarnaik #MBMC #meeting #develomentworks #MiraBhayandar
🗓️ ११ जानेवारी २०२६ |📍मिरा भाईंदर
मिरा भाईंदर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार 🚩
मिरा भाईंदरमधील शिवसेनेच्या ८१ उमेदवारांच्या प्रचारार्थ स्वप्नांच्या शहराची सभा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानावर शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित केले. उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांचे विशेष प्रेम मिरा भाईंदर शहरावर आहे. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना मिरा भाईंदर शहराच्या विकासासाठी १८०० कोटी दिले. त्यामुळे मी या शहराचा विकास करू शकलो. आपल्याला या शहराला विकसित आणि स्वप्नांचे शहर बनवायचे आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानावर ही सभा होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. तुम्ही आम्हाला १३ जागा देत होते. आता तुमचे १३ जागा तरी येतात का आम्ही शिवसैनिक बघणार आहोत, असा टोला नरेंद्र मेहता यांना लगावला.
विविध समाजभवने, २१८ एमएलडी पाणी योजना, मेट्रो आणि स्व. इंदिराबाई सरनाईक कॅशलेस रुग्णालय हे सर्व प्रकल्प पूर्णत्वास नेऊन मिरा भाईंदर शहराचा विकास करून नागरिकांना सर्व सोयी सुविधा दिल्या. जो विकास भाजपा मिरा भाईंदर महानगरपालिका सत्येत असताना नाही झाला तो मी करून दाखवला.
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे मिरा भाईंदर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे स्वप्न येत्या १६ जानेवारीला नक्कीच सत्यात उतरेल असा मला विश्वास आहे.
उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांनी सभेला संबोधित केले. सभेला जमलेली गर्दी बघून विरोधकांच्या पोटात गोळा उठला असेल. १५ जानेवारीला हेच प्रेम हेच आशीर्वाद शिवसेना उमेदवारांना द्या. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ''मुंबईत भगवा, ठाण्यात भगवा तर मिरा भाईंदर मध्ये का नाही भगवा ?'' म्हणून कार्यसम्राट मंत्री प्रताप सरनाईक यांनी विडा उचलला आहे की, मिरा भाईंदर महानगरपालिकेवरती भगवा फडकला पाहिजे.
ठाण्याप्रमाणे मिरा भाईंदर शहरावरही माझे प्रेम आहे. सर्वसामान्यांचा विकास हाच शिवसेनेचा अजेंडा आहे. प्रताप सरनाईक यांच्या नावातच प्रताप आहे. इम्पॉसिबल हा शब्द आमच्या डिक्शनरी मध्ये नाही. अशक्यला शक्य करणे शिवसेनेला चांगले येते. शिवसेना को हराना मुमकिन ही नही नामुमकीन है । शिवसेने का एक ही नारा है अब मिरा भाईंदर हमारा है । शिंदे साहेबांनी अशी घोषणा देताच सर्व शिवसैनिकांमध्ये जोश भरला.
प्रताप सरनाईक आमदार झाल्यापासून या शहराचे भाग्य बदलल आहे. गेल्या तीन वर्षात १८०० कोटी रुपये मिरा भाईंदर शहराच्या विकासासाठी दिले. त्यातून अनेक विकास कामे झाली. यानंतर विकास निधीमध्ये कोणतीही कमरता भासू देणार नाही हा माझा शब्द आहे. भगव्या विचाराचे पाईक म्हणजे प्रताप सरनाईक. शहर का नाम मिरा-भाईंदर और प्रताप सरनाईक इस शहर का असली धुरंदर। प्रताप सरनाईक येथे ठाण मांडून बसले आहे. ते यंदा मिरा भाईंदर महानगरपालिकेवर भगवा फडकवणारचं.
प्रभू श्रीरामांचे धनुष्यबाण निशाणी समोरील बटण दाबून येत्या १५ जानेवारीला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा. मिरा भाईंदरवर शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन शिंदे साहेबांनी मिरा भाईंदरकर वासियांना केले.
यावेळी शिवसेना स्टार प्रचारक तथा प्रवक्ते संजय निरूपम, शिवसेना प्रवक्त्या ज्योती ताई वाघमारे यांच्यासह मिरा भाईंदरमधील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Eknathshinde #PratapSarnaik #Shivsena #MBMC #ElectionCampaign #जाहीरसभा
@mieknathshinde@drjyotiwaghmare@sanjaynirupam@Shivsenaofc
🗓 १० जानेवारी २०२६ | 📍उत्तन
मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये शहरात आणि गावात शिवसेनेच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, उत्तन येथे प्रभाग क्रमांक २४ मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चौक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा उत्तर भारतीय पदाधिकारी मुन्ना सिंह यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
प्रभाग २४ मधील २४ ‘अ’ जॉर्जी गोविंद, २४ ‘ब’ शर्मिला बगाजी, २४ ‘क’ फ्रीडा बर्नट डिमेलो हे शिवसेनेचे उमेदवार आहेत.
शिवसेनेचे सर्व शिलेदार उत्तन येथील पाली गावाला आधुनिक ओळख देण्याचा संकल्प करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पाली गावाचा सर्वांगीण विकास हाच शिवसेनेचा ध्यास आहे. आपल्या उत्तन येथील विकासाची गंगा अविरत प्रवाहित ठेवण्यासाठी येत्या १५ जानेवारीला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. आपलं एक मत मिरा भाईंदरचं आणि उत्तनचे भविष्य बदलू शकतं.
🗓 10 January 2026 | 📍 Uttan
Shiv Sena’s campaign for the Mira–Bhayandar Municipal Corporation General Elections 2026 is receiving an increasingly strong response across both urban and rural areas. Today a Chowk Sabha was organized in Uttan to campaign for Shiv Sena candidates from Ward No. 24. On this occasion, several party workers, including BJP’s Munna Singh, joined the Shiv Sena today.
The Shiv Sena candidates from Ward No. 24 are:
24 ‘A’ – Georgie Govind
24 ‘B’ – Sharmila Bagaji
24 ‘C’ – Freida Bernard D’mello
All Shiv Sena representatives have a firm resolve for development of Pali village, Uttan. To ensure that the momentum of development in Uttan continues uninterrupted,I appeal everyone to vote in large numbers and elect all Shiv Sena candidates on 15th January.
One vote has the power to change the future of Mira–Bhayandar and Uttan.
#PratapSarnaik #Shivsena #MBMC #ElectionCampaign #Uttan
@Shivsenaofc
🗓 ११ जानेवारी २०२६ | 📍 मिरा भाईंदर
मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी प्रचार दौऱ्यादरम्यान प्रभाग क्रमांक ३ येथील शिवसेना निवडणूक कार्यालयाला भेट दिली. तसेच शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभागतील विविध रहिवासी संकुलांना भेट दिली. या दौऱ्यात कार्यकर्त्यासोबत दुचाकीवर स्वार होऊन प्रचाराचा आनंद देखील घेतला.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. '३' 'अ' मधून कविता मांडवकर, क्र. ३ 'ब' मधून शीतल पांडे, क्र. ३ 'क' मधून दिनेश नलावडे आणि ३ 'ड' मधून राजेश वेतोस्कर हे शिवसेनेचे उमेदवार जनतेच्या सेवेत तत्पर आहेत.
या भेटीदरम्यान उपस्थित नागरिक, व्यापारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न ऐकून घेतले व मिरा भाईंदरच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडला.
यावेळी जनतेचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिवसैनिकांची मोलाच्या साथीने ही निवडणूक यशस्वीरित्या पार पडेल असा आत्मविश्वास वाटतो. मिरा भाईंदरच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी येत्या १५ जानेवारीला शिवसेनेच्या सर्व शिलेदारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले.
@Shivsenaofc
#PratapSarnaik #Shivsena #MiraBhayandar #ElectionCampaign #MBMC
🗓 ११ जानेवारी २०२६ |📍भाईंदर (पश्चिम)
मिरा भाईंदर येथे प्रभाग क्रमांक ६ मध्ये सुरू असलेल्या अध्यात्मिक शिबिरास भेट देऊन मुनी श्री १०८ अजित सागर जी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. तसेच संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांच्या प्रतिमेस माझ्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी मुनी श्री अजित सागर जी महाराज यांनी जैन समाज शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची भावना व्यक्त केली. त्याचबरोबर समाजाच्या वतीने गौशाळा उभारणीची मागणी करण्यात आली असून, ही मागणी नक्कीच पूर्ण केली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
माझ्या समवेत प्रभाग ६ ‘अ’ सरिता शिंदे, ६ ‘ब’ रमिता रवींद्र जैन, ६ ‘क’ कृणाल पुरोहित व ६ ‘ड’ उदय मोदी हॆ शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते.
#PratapSarnaik #Shivsena #MiraBhayandar #ElectionCampaign #MBMC