आमची नम्र विनंती: SIT चौकशी मुदतबद्ध पूर्ण व्हावी.SR पदाची DV प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी SR ची DV आधी झाली, तर ७६ कॉमन मुले मोकळी होऊन STI च्या ७६ जागा वेटिंग लिस्टसाठी उपलब्ध होतील आणि मागील ४ महिन्यांपासून सरावात असलेल्याPSI ग्राउंडचा मार्ग मोकळा होईल
आमदार श्री विक्रमसिंह पाचपुते खूप खूप धन्यवाद
MPSC गट-ब परीक्षेतील ऐनवेळी रद्द झालेल्या सब-रजिस्ट्रार(SR)पदाच्या DV आणि विद्यार्थ्यांच्या व्यथांबद्दल आपण अत्यंत खंबीरपणे प्रशासकीय व्यासपीठावर आवाज उठवला याबद्दल समस्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनापासून आभार!
डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार ही पदेच जर MPSCच्या राज्यसेवा परीक्षेतून काढून घेतली, तर मग ही परीक्षा नेमकी कशासाठी?
राज्यसेवा परीक्षा म्हणजे लाखो विद्यार्थ्यांसाठी केवळ एक परीक्षा नाही; मेरिटच्या जोरावर राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग आहे. हीच प्रमुख पदे पदोन्नतीने भरून थेट भरतीच्या संधी कमी केल्या, तर राज्यसेवा परीक्षेचे मूळ अस्तित्व आणि महत्त्वच धोक्यात येईल. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास, आर्थिक त्याग आणि असंख्य अडचणी सहन करून या परीक्षेची तयारी करतात. त्यांच्या मेहनतीनंतरही जर मुख्य प्रशासकीय पदांच्या संधीच कमी केल्या जाणार असतील, तर त्यांच्या स्वप्नांना न्याय कसा मिळणार?
पदोन्नती हा सेवाव्यवस्थेचा आवश्यक भाग आहे; पण त्यासाठी स्पर्धा परीक्षेतून येणाऱ्या गुणवत्तेला आणि नव्या पिढीच्या संधींना बळी देता येणार नाही. सरकारने स्पष्ट करावे, राज्यसेवा परीक्षेतून विद्यार्थ्यांना नेमक्या किती आणि कोणत्या अधिकारी पदांच्या संधी उपलब्ध राहणार आहेत?
डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार यांसह महत्त्वाची पदे MPSCमार्फत पारदर्शक, नियमित आणि स्पर्धात्मक थेट भरतीतून उपलब्ध झालीच पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या मेहनतीची थट्टा करू नका. त्यांच्या स्वप्नांची दारे बंद करू नका.
#MPSC #Rajyaseva #RojgarNyay #MPSCStudents
@RahulAsks सर तो २०२५ combine पास नाही झाला ,नापास झाला आहे २०२५ ची combine.
मेरिट लिस्ट मधे प्रत्येक पोरांचे मार्क्स असतात
हे दोन्ही २०२४ ,२०१६,२०१७,२०२१,२०२२ मधे पण पूर्व परीक्षा पास आहेत फक्त DI च्या एग्जाम मधे सिलेक्टेड आहेत ज्यात त्यांनी घोटाळा केला
@RRPSpeaks सर तो २०२५ combine पास नाही झाला ,नापास झाला आहे २०२५ ची combine.
मेरिट लिस्ट मधे प्रत्येक पोरांचे मार्क्स असतात
हे दोन्ही २०२४ ,२०१६,२०१७,२०२१,२०२२ मधे पण पूर्व परीक्षा पास आहेत फक्त DI च्या एग्जाम मधे सिलेक्टेड आहेत ज्यात त्यांनी घोटाळा केला
@RRPSpeaks सर तो २०२५ combine पास नाही झाला ,नापास झाला आहे २०२५ ची combine.
मेरिट लिस्ट मधे प्रत्येक पोरांचे मार्क्स असतात
हे दोन्ही २०२४ ,२०१६,२०१७,२०२१,२०२२ मधे पण पूर्व परीक्षा पास आहेत फक्त DI च्या एग्जाम मधे सिलेक्टेड आहेत ज्यात त्यांनी घोटाळा केला
#MPSC पुढील वर्षासाठीच्या वार्षिक वेळापत्रकाचा(Tentative Schedule) प्रसिद्ध दिनांक -:
➡️2021 & 2022 - 4 डिसेंबर 2021
➡️2023 - 28 सप्टेंबर 2022
➡️2024 - 10 नोव्हेंबर 2023
➡️2025 - 22 नोव्हेंबर 2024
➡️2026 - 17 ऑक्टोबर 2025
➡️2027 - ❓❓
@mpsc_office सर्व जागासोबत वेळापत्रक
Sunday Wisdom!पूर्व परीक्षा+मुख्य परीक्षा आणि फक्त लेखी चाळणी परीक्षा, यापैकी दुसरी परीक्षा #MPSC साठी जास्त जोखमीची."निरीक्षण" सेेवांंच्या विभागीय मर्यादित परीक्षां तर अजून संवेदनशील.
सरळसेवेची पदे भरतांना ठरावीक कालावधी ऐवजी खात्यांच्या गरजेनुसार वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या मागणीपरत्वे निवडप्रक्रिया राबवतांना, मुुलाखतीसाठी उमेदवारांंची संख्या मर्यादित करण्यास्तव घेतल्या जाणाऱ्या लेखी चाळणी परीक्षांसाठी, विषयतज्ञांचे स्विकृत पॅनेल साधारणतः तयार नसल्याने, आवश्यकतेनुसार खात्यांतील अनुुभवी वा सेवानिवृत्त अधिकारी तर काहीवेेळा खात्यांकडील माहिती स्त्रोतांंवर विसंबून व्यक्तींचा विषयतज्ञांंच्या पॅनेलमधे समावेश करण्याकडे कल.
पूर्वानुभव वा सरावाअभावी अशा तज्ज्ञांकडून प्रश्नपत्रिका तयार करतांना प्रमाणीत कार्यपद्धतीचे काटेेकोर अनुपालनात क्वचीत प्रसंगी त्रुटी राहण्याची व त्याने गैरप्रकार करणार्यास वाव मिळण्याची शक्यता किंवा अपवादात्मक प्रकरणी खात्यांतर्गत परस्पर हितसंबंधातून तज्ज्ञांकडूनही गैैरहेेतुुने असे गैरप्रकार घडण्याची संभावना.
औषध निरीक्षक परिक्षेतील पेपरफूट आणि उत्पादन शुल्क दुुय्यम निरीक्षक परीक्षेची गुणदान योजना परीक्षेआधी उघड होण्याचे प्रकारांतून बोध घेत आयोगाने यापुढे अशा परीक्षांसाठी "विषयतज्ञांंची निवड व मानक कार्यपद्धतीचे अनुपालन" याबाबत अधिक दक्षता घेत सजग राहण्याची गरज!
📍 मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्यासोबत ११ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ आयोगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आयोगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची शासनाकडून ठोस, स्पष्ट आणि प्रभावी हमी मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
आयोग संविधानिक संस्था असून सचिव हे आयोगाचे प्रशासकीय प्रमुख आहेत. त्यामुळे प्रशासकीय प्रमुखांशी झालेल्या गैरवर्तनाची घटना गंभीर असून, संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच, आयोगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमकीवजा वक्तव्ये केल्याने त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
#एमपीएससी
#MPSC
Sunday Wisdom!दिवंंगत डाॅ.कर्णिक मलोआ चे अध्यक्ष असतांनाच्या कार्यकाळात घडलेल्या खान्देशातील उमेदवारांच्या एका प्रकरणानंतर आता पुन्हा खान्देशातील दुसर्या प्रकरणी आयोगाची अब्रु धुळीत.मधल्या काळात महत्प्रयासाने #MPSC ची विश्वासार्हता उंचावून ती जपण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांवर या पेपरफूटी प्रकरणाने पाणी.
औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेसाठी पेपर सेटर्सच्या निवडीमधे अवलंबली गेलेली कार्यपद्धत,पेपर सेटींग सारख्या संवेदनशील व गोपनीय कामकाजासाठी विषयतज्ञ व संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांकरीता घालूून दिलेली आचार संहिता व अंगभूत सुरक्षा प्रणाली यांचे या प्रकरणी काटेकोर अनुपालन,याबाबतची वस्तुस्थिती व प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामकाज प्रत्यक्ष सुरु झाल्याच्या दिवसापासून ते पेपर्स परीक्षा केन्द्रांकडे (दूरवरच्या व स्थानीय सुद्धा) रवाना होईपर्यंतच्या संपूूर्ण कालावधीतील,आयोगाचा कार्यालयीन परीसर व गोपनीय परीक्षा कक्षाचे सीसीटीव्ही चित्रिकरण,यांच्या सखोल अंतर्गत पडताळणी अंती आयोगाला निश्चीत निष्कर्षांप्रत पोहोचणे शक्य.
पूर्वपरीक्षा+लेखी परीक्षा वा केवळ लेखी/चाळणी परीक्षा या दोहोंसाठी विषयतज्ञांच्या निवडीचे निकष व कार्यपद्धती,पेपर सेटींगचे संवेदनशील कामकाज,छपाई,साठवणूक, वाहतूक व आनुषंगिक सुरक्षा प्रणाली आणि संवेदनशील परीक्षा विभागात अधिकारी/कर्मचारी नियुक्तीस्तव योग्यता या बाबींचा आयोगाने "सर्वांप्रती अविश्वास" या तत्वावर संर्वकष फेेरआढावा घेत कार्यनियम व मानक कार्यपद्धतीतील उणीवा तातडीने दूर करून ती अधिक सक्षम करणे गरजेचे!
यातील मुद्दे बघा.. समाजमाध्यमात मोकळीक आहे म्हणून काहीही बरळत बसू नका.. ठोस पुरावे असतील तर कायदेशीर वाट धरा.. नपेक्षा शांत बसा आणि पुराव्यानिशी जे काम करतायत त्यांना करू द्या.. अशाने जे उमेदवार कष्टाने पास झालेत त्यांनाही साशंक नजरेने पाहण्यास समाजास तुम्ही प्रवृत्त करत आहात..❤️
MPSC विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार; आयोगतील मूलभूत रचनात्मक सुधारणासाठी पाठपुरावा करणार
गेल्या 2-3 दिवसांत हजारो MPSC विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करणारे संदेश पाठवले. हा विश्वास एका-दोन दिवसांत निर्माण झालेला नसून गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या कामातून तो निर्माण झाला आहे. MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि MPSC च्या प्रश्नांवर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना अभिमन्यू पवार कोण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आज काही लोक माझा पेपरफुटीशी संबंध असल्याच्या बातम्या पेरत आहेत. आज मोठी PR टीम अशा प्रकारचे आरोप पसरवण्यासाठी कामाला लागली आहे. हे आरोप कोणत्या द्वेषातून आणि मत्सरातून होत आहेत, याची जाणीव विद्यार्थ्यांना आहे. काही नवखे कार्यकर्ते तर केवळ प्रसिद्धीतून स्वतःच्या राजकीय करियरला उभारी मिळवून देण्यासाठी आरोप करत आहेत. त्यांच्या करियरसाठी माझ्या शुभेच्छा. अशा आरोपांना उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही.
असो, राजकारण सुरूच राहील. पण MPSC चा पेपर फुटणे ही वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर आघात करणारी बाब आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे आयोगाला विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा शून्यापासून कमवावा लागेल. त्यासाठी काही मूलभूत सुधारणा तातडीने आवश्यक आहेत :
1. आयोगाचे सचिवपद सहसचिव दर्जाऐवजी प्रधान सचिव दर्जाच्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्याकडे असावे.
2. परीक्षा विभाग, निकाल विभाग यांसारख्या महत्त्वाच्या कक्षांच्या प्रमुखपदी उपसचिव/अवरसचिव यांच्याऐवजी कनिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
3. प्रश्नपत्रिकेच्या मुद्रणापासून साठवणुकीपर्यंतच्या ते परीक्षा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेसाठी IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली CRPF/SRPF तुकड्यांचीची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था नियुक्त करावी आणि या तुकड्या ठराविक कालावधीनंतर बदलण्यात याव्या.
4. आयोगात कायमस्वरूपी तक्रार कक्ष स्थापन करावा व प्रत्येक तक्रारीची चौकशी करून त्याचा अहवाल प्रसिद्ध करावा.
5. प्रत्येक कामकाज In-Camera व्हावे, CCTV दृश्यांच्या Live चित्रीकरणाचे निरीक्षण करणारा स्वतंत्र कक्ष असावा व पार्किंगसह पूर्ण इमारत प्रवेश मर्यादित करावी.
वरील सुधारणांसह आणखी काही महत्वाच्या मागण्या घेऊन येत्या आठवड्यात मा. मुख्यमंत्री तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांची भेट घेणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या सूचनांचे देखील स्वागत आहे.
या विषयासह विविध प्रश्नांसाठी लवकरच पुण्यात भेटूया !