सावळा गोंधळ नाही मॅडम पूर्ण काळा गोंधळ आहे. आत्ता पर्यंत पदवीधर विद्यार्थ्यांवर यांनी अन्याय्य केलेला आहे.यांना वाटत की डिग्री पेक्षा डिप्लोमा भारी. अवघड आहे. धन्यवाद @TV9Marathi@RaviDadaChavan साहेब लवकरात लवकर काय तरी action घ्या 🙏🙏
गट क साठी पदविका/पदवी/पद्युत्तर पात्र परंतु गट ब साठी अपात्र फक्त पदविका पात्र. वाह रे सरकार, हेच आहे का वेगवान आणि गतिमान महाराष्ट्र सरकार. अजून पण कालबाह्य १९९८ GR vr महाराष्ट्र तील PWD विभाग काम करत आहे, नक्की सरकार चालवत कोण आहे? मंत्री मंडळी की ठराविक संघटना?@RaviDadaChavan
१२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता)साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्यGRनुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे.
@CMOMaharashtra@RaviDadaChavan#degree_for_JE
विकास विकास विकास.. बिअर उद्योगाची वाढ होण्यासाठी अभ्यास समिती परंतु सार्वजनिक बांधकाम विभागात पदवीधरांची वाढ होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत.विकास विकास विकास 🔥🔥🔥
सरकार जर बारावी करून पदवी प्राप्त केलेल्या अभियंत्यांचा अंतच बघत असेल व #PWD_JE साठी पात्र करत नसेल तर आम्हाला सुद्धा मार्ग निवडावा लागेल.
परंतु लक्षात ठेवा 5-6 लाख कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप आपण करत आहात.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@RRPSpeaks
तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय.. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय.. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?
@CMOMaharashtra
आज सकाळी विविध माध्यमांतून तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. आणखी किती दिवस आपल्या विद्यार्थ्यांना हे सहन करावं लागणार आहे?
अशा प्रकारांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय तर होतोच, पण त्याचबरोबर सरकारी व्यवस्थेकडे बघण्याचा तरुणाईचा दृष्टिकोनही नकारात्मक होत चालला आहे. असं घडणं हे खूपच दुर्दैवी आहे.
विधानपरिषदेत मी हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्य सरकारला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की हा दुहेरी धोका लक्षात घेऊन याला आळा घालण्यासाठी तातडीने ठोस पावलं उचलावीत!
#तलाठी_भरती #MPSC #PaperLeak
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
.@Dev_Fadnavis साहेब तलाठी चा पेपर आज पासून सुरू झाले. सकाळची पहिलीच शिफ्ट आणि पेपर फुटून बाहेर आलेच. बाहेर फिरणाऱ्या मुलांच्या मोबाईल मध्ये पेपर सापडला. म्हणजे पेपर हा फुटलाच ना.आता प्रश्न पडतोय की त्याला कोणी पाठवला. अजून किती जनापर्यंत हा पेपर गेला असेल. आपण राजीनामा द्या आता.
#तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या. नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुलंमुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात, परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफुटी होते आणि या सर्व युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं जातं. वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर अधिवेशनात आवाज उठवला असता गृहमंत्री महोदयांनी पेपर फुटल्याचा बातम्या खोट्या असल्याचं सांगत राज्याची दिशाभूल केली होती. गृहमंत्री महोदयांनी तेंव्हाच कणखर भूमिका घेतली असती तर आता पेपर फुटले नसते. युवांच्या प्रश्नांवर शासन दुर्लक्ष करणार असेल तर नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा युवा वर्ग #seriuous झाला तर सरकारला खूप महाग पडेल. त्यामुळं पेपरफुटी होणार नाही याकडं शासनाने लक्ष द्यावं, ही कळकळीची विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
एका जाहिरातीसाठी एकच शुल्क असा निर्णय झाला असेल,तर जिल्हा परिषदेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, उमेदवार १०-१० हजार रुपये भरून अर्ज करत आहे. #ZP अर्जाच्या प्रणालीत सुधारणा करून एकाच शुल्कात सर्व अर्ज भरण्याची मुभा देण्यात यावी.ज्यांनी पेमेंट केले असेल त्यांना रीफंड देण्यात यावा.
.@Dev_Fadnavis आज लातूर मध्ये पेपरफुटी वर कायदा करा आणि वाढीव शुल्क यावर आंदोलन सुरू आहे. हे लोन पूर्ण महाराष्ट्र मध्ये पसरू नये म्हणून लवकर निर्णय घ्या नाहीतर पूर्ण महाराष्ट्र पेटल्या शिवाय राहणार नाही.
@Awhadspeaks@RRPSpeaks#पेपरफुटीवर_कायदा_करा
https://t.co/WrSdc2xRuL
#seriousness च्या नावाखाली परीक्षा फी च्या माध्यमातून सुरु असलेल्या #serious लुटमारीचा हा ब्रेकअप ................... नक्कीच विचार करण्यासारखा नाही का ?
स्पर्धा परीक्षेसाठी भाजपची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. सत्तेत असताना पेपरफुटी घोटाळा असो की अधिकचे शुल्क,भाजपने रान पेटविले होते. पण सत्तेत आल्यावर नोकर भरतीच्या प्रत्येक अर्जासाठी १००० रू. इतके तिप्पट शुल्क आकारला जात आहे. वन विभाग घोटाळा,मुंबई पोलीस पेपरफुटी ई. घोटाळे गाजत आहे
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .