माहिती मिळणवण्यासाठी आज खूप साधन उपलब्ध आहेत...social media, news channel,google,books... पण ज्ञान हे तुम्हाला तूमच्या सदसद्विवेकबुद्धी जागृत असेल तरच प्राप्त होते... नाहीतर मग चांगलं-वाईट, खरं-खोटं काहीच समजत नाही...
आला message कर forward..🤣
गेल्या काही निवडणुकांपासून आपण बघतोय की लोक सर्रास पैसे घेऊन मतदान करतात. त्यामुळे प्रभागात, मतदारसंघात काही समस्या असल्या तरी लोकप्रतिनिधी मतदारांना बांधील असल्यासारखे वागत नाहीत. थोडक्यात मतदारांना सर्व लायकीप्रमाणे मिळालेले आहे. त्यामुळे त्यांनी थयथयाट करण्यात काही अर्थ नाही.
Dhurandhar 2
चित्रपटातील प्रत्येक पात्र मी तपासले:
1.हमझा – 2004 (काँग्रेस सरकार)
2.रेहमान डकैत – मृत्यू 2009 (काँग्रेस सरकार)
3.अर्शद पप्पू – मृत्यू 2013 (काँग्रेस सरकार)
4.SP अस्लम खान – मृत्यू 2014 (काँग्रेस सरकार)
5.जमील जमाली (नाबील गाबोल यांच्यावरून प्रेरित) – 45 वर्षांपूर्वी शिक्षा (काँग्रेस सरकार)
या सर्व व्यक्ती मरण पावल्यानंतर नोटाबंदी झाली. तरीही ती चित्रपटाच्या कथेत गुंफण्यात आली आहे , हे उघडपणे एका वादग्रस्त निर्णयाला न्याय्य ठरवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.
मी काँग्रेसची कडवी टीकाकार होते. त्यामुळेच मी India Against Corruption चा भाग होते.
पण आज मी BJP चीही तितकीच टीकाकार आहे.
सत्य कोण सत्तेत आहे यावर बदलत नाही.
आज राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पूजन करण्यात आले. यावेळी दादांच्या पवित्र स्मृतींचे स्मरण करत भावपूर्ण आदरांजली वाहिली.
।।ॐ शांती।।
📍राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, मुंबई
राज्य टिकवण्यासाठी राजाच शुरवीर आणि मुत्सद्दी असावा लागतो..!!
बाळ राजेंना गादीवर बसवून, राणी सरकारांकडे नावा पुरती सुत्र ��ेऊन दरबारातल्या चौकाडींनी चालवलेली राज्य लयाला गेलेत हा इतिहास आहे. भावनिकते पेक्षा व्यवहारिकता श्रेष्ठ!🙏
पण विठ्ठल रुक्मिणीच मंदिर आजूनही मला कळत आस बिना शिखराच आहे... गावात आजून filtered पाण्याची सोय नाही. .. गावाला दवाखाना नाही. शाळेला चांगले सोई नाहीत. आस माझं गाव... पण मी फक्त इथेच लिहू शकते...
गेल्यावर्षी आमच्या गावात वंजारी समाजाने पुढाकार घेऊन भगवान बाबांच मंदिर बांधलं. नंतर धनगर समाज्याच्या वतीने बिरोबा देवाचं मंदिर बांधून झालं..त्यानंतर या वर्षी मराठा समाजाने श्यामनाथ महाराजांचे मंदिर बांधायला काढले. देणग्या भरभरून आल्या. ..Continue
‘पैशाचं सोंग आणता येत नाही ’ म्हणजे सरकार चालवायला राज्यकर्ते पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत.... त्यांना काय पैसे कुठून कमवून नाही आणायचे आहेत.. पण योग्य नियोजन नसल्याने त्यांना आस म्हणायची वेळ आली आहे...
#मराठवाडा#mahapur
सततचा कोरडा दुष्काळ पाहणाऱ्या मराठवाडयाच्या शेतकऱ्यांच्या नशिबी ओला यंदा दुष्काळ. .. महापुरात घरं, गुरढोर, पीक इतकंच काय पण माती सुद्धा वाहून गेली. .. चांगले दिवस आहेत का नाहीत मराठवाड्याच्या शेतकऱ��याच्या नशिबी... #marathvada #mahapur
@rebelliousManoj भारतात private sector मध्ये कुठे जात बघून नौकरी लागलेली माझ्या तरी पाहण्यात नाही... आणि अमेरिकेतही भारतातली बहुतांश लोक हे private सेक्टर मधेच काम करतात...
माझा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो. त्याला मराठी आणि हिंदी दोन्ही भाषा आहेत आता .. आणि त्याची हीच अडचण होते. .. त्याची मराठी खराब होत चालली आहॆ त्यामुळे. .. मुळात तिसरी कोणतीच भाषा नकोच....
पहिलीच्या वर्गात हिंदी मराठी एकत्र शिकवली जाईल. एक उदाहरण देतो , जेंव्हा आकडे शिकवले जा���ील तेंव्हा लहान मुलांची गल्लत होणार नाही का? नक्कीच होणार. याची परिणीती म्हणजे शब्दांची सरमिसळ आणि एकही भाषा नीट न येणे.
मातृभाषा मेंदूची कार्यक्षमता वाढवते, इथे हिंदीच्या अतिक्रमणामुळे थेट मुलांच्या आकलन क्षमतेवर घाला घातला जाणार आहे. विचार करा. हिंदी हा विषय महाराष्ट्रात कोणत्याही शाळेत पहिली ते चौथी शिकवलाच जाऊ नये. सर्वांचा मराठीचा पाया पक्के करणारे शैक्षणिक धोरण पाहिजे.
खरं म्हणजे हुंडा देण्या पेक्षा किंवा महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा. .. आई वडिलांनी मुलाप्रमाणे मुलीलाही प्रॉपर्टी मध्ये तिचा हिस्सा द्यायला हवा... #हुंडा_बळी
खरं म्हणजे Divorce हा normalise व्हायला हवा.... हे माझं statement काहीस Bold असेलही... पण नको असलेल्या, मानसिक दृष्ट्या त्रास होणाऱ्या आणि प्रतिष्ठा ��ाठी अडकून राहिलेली लग्न आणि संसार टिकवण्या पेक्षा त्यातून मुक्त होणं हे दोघांसाठीही चांगलंच....
“शत्रुवर कारवाई केल्याची एखादी महत्वाची बातमी दोन दिवस उशिरा दिली तरी चालेल पण ती खरीखुरी द्या” एवढीच माफक अपेक्षा आता भारतीय वृत्तसंस्था आणि वाहिन्यांकडून आहे. सैन्य कमावणार आणि मीडिया घालवणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मूर्ख मीडियामुळे जागतिक स्तरावर नाचक्की होतेय आपली.