♦️तलाठी भरती घोटाळा.
एका #माजी_आमदाराची_मुलगी, एका जिल्ह्यामधून तलाठी भरतीत तिसरी टॉपर आहे. त्या मुलीचा आणि स्पर्धा परीक्षेचा काडीमात्र सबंध नसल्याचे अनेकांनी आम्हाला सांगितले आहे.
आता आमदारांचे मुल-मुली तलाठी, तर काही मंत्र्यांच्या मुली शिक्षिका आणि इतर शासकीय विभागात नोकऱ्यांवर लागणार असल्याने श्रीमंत आणि गरीबांमध्ये येत्या काळात सामाजिक-आर्थिक दरी अजून जास्त वाढण्याची चिन्हे आहेत.
बरोबर, चुक.. अशा लाख चर्चा होत राहतील. पण जरांगे पाटलांचा प्रामाणिकपणा, तळमळ, चिकाटी, धडपड, निरपेक्ष वृत्ती, निडरपणा या लाखमोलाच्या गोष्टी आहेत. आजची वेळ मारून नेली असे जर सरकारमधील अण्णाजी पंतांना वाटत असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की हा शेवट नसून जरांगे पाटलांची सुरुवात आहे.
सगेसोयरे याची व्याख्या करताना सरकारने त्यात रक्तनाते आणि पितृसत्ताक हे शब्द टाकलेले आहेत.
रक्तनाते या शब्दामुळे सगेसोयरे या शब्दाला अर्थच राहत नाही.
आपल्याकडे व्याही (इव्हाई), जावई यांना सगेसोयरे समजले जाते. सरकारी व्याख्येत पितृसत्ताक आणि रक्तनाते या शब्दांमुळे पूर्वी जसे आजोबांचे वडिलांना, वडिलांचे मुलाला, काकाचे पुतण्याला जात प्रमाणपत्र लागायचे तेच या अध्यादेशाच्या ड्राफ्टमध्येचआहे, ड्राफ्ट काही अंतिम नाही. कुणबी प्रमाणपत्र कसे देणार याची मार्गदर्शक तत्वे सरकारकडून जाहीर केलेले दिसत नाही.महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची जी आस होती ती काही पूर्ण होताना दिसत नाही.
पूर्वीच्या काळात लग्ने हे पंचक्रोशीतच व्हायची. साधारण लग्नासाठी बैलगाडीने प्रवास होईल अश्या ठिकाणीच सहसा सोयरीकी पाहिल्या जायच्या.
तालुका आणि जिल्ह्याबाहेर लग्न झालेली उदाहरणे फार क्वचित आहेत.त्यामुळे जो लोकांचा समज आहे असा झाला आहे की सगळेच सरसकट कुणबी होतील. समजा जालन्यात एखादी कुणबी नोंद सापडली तर त्याचा फायदा गडहिंग्लजमधल्या लोकांना होईल याची खात्री नाही.
सरकारने शब्दंछल करुन मराठा समजाला फसवले आहे, अशी भावना राज्यभरातील अनेक मराठ्यांमध्ये आहे.
भविष्यात याची जाणीव लोकांना लवकरच होईल..
निव्वळ मराठा समाजाला मुर्ख बनवनं चालू आहे, आज सचिवांनी जी माहिती पाटलांना दिली तीच चुकीची आहे, कारण नव्या नोंदी केवळ ३२ हजार सापडलेल्या असतांना(कारण ५४लाख नोंदीतील९९% लोकांकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहे),सरकार म्हणत आहे की,५७ लाख नोदी सापडल्या, सरकारने अजून एक चुकीची माहिती दिली ती म्हणजे ३७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, मुळात, ज्या लोकांकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र होते अशाच लोकांना सरकार आता "आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले" असं म्हणतंय,हे असं म्हणनं म्हणजे मराठा समाजाची "घोर शुध्द फसवून" आहे,उद्या जेव्हा सरकार तर्फे "कुणबी प्रमाणपत्र देलेल्या मराठ्यांचा डेटा" सादर करण्यात येईल, तेव्हा ह्याच "ऑलरेडी कुणबी" असणाऱ्यांचाच डेटा सादर केला जाणार व असे सांगितले जाणार की," आम्ही ५७ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले " पण ही मराठा समाजाची साफ फसवणूक आहे कारण, ह्या ५७ लाख लोकांपैकी ९९% मराठे मुळातच कुणबी आहेत व ते कुणबी असल्याचा लाभ घेत आलेले आहेत, जेव्हा सरकारणे "मुळातच कुणबी असणारांना" ह्या यादीत घेतले तेव्हाच सरकारने "खरा डाव" खेळला आहे,कारण मुळातच कुणबी असणारांना पुन्हा एकदा " कुणबी प्रमाणपत्र " वाटून खऱ्यां गरजवंत मराठ्यांना, ओबीसी आरक्षणा पासून लांब ठेवले व ओबीसी नेत्यांचे हे सांगून समाधान केले की,आम्ही तुमच्या आरक्षणाला अजिबात धक्का लावला नाही, कारण आम्ही त्याच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले आहे, जे ऑलरेडी कुणबी च होते,अशा प्रकारे सरकारने मराठा समाजाचा विश्वास घात चालवला आहे, भोळे भाबडे मराठे वेडे बनतीलही पण संपूर्ण मराठा समाज भोळा भाबडा नाही ही गोष्ट सरकारने लक्षात ठेवावी, सकल मराठा समाज, न्याय मिळेपर्यंत हा लढा चालू ठेवील!
https://t.co/iWKEmxttYs
नियुक्त्या दिल्यानंतरही, "घोटाळ्यांमुळे" पदभरती रद्द होऊ शकते का? याचं उत्तर खालील बातमीत आहे.
उत्तरप्रदेशात UP जल निगम साठी, ८५४ इंजिनिअर आणि ३३५ लिपिक भरतीत घोटाळा झाला. उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या, त्यांना नोकरीवर रुजू होऊन वर्ष झालं पण नंतर घोटाळ्याचा तपास SIT कडे गेला. प्रामाणिक आणि घोटाळेबाज कोण हे शोधणे शक्य नसल्याचे SIT ने रिपोर्ट दिला आणि संपूर्ण पदभरती रद्द करण्यात आली. असे अनेक राज्यातील उदाहरणे आहेत.
त्यामुळे निकाल लागला म्हणून आणि नियुक्त्या झाल्या तरी काही फरक पडणार नाही, एकदा SIT चौकशी झाल्यास केव्हाही पदभरती रद्द होऊ शकते. सरकारने SIT लावल्यास किंवा आपल्या PIL/Writ याचिकेत न्यायालयीन SIT ची मागणी पूर्ण झाल्यास सत्य समोर येईल आणि तलाठी पदभरती रद्द करावी लागेल.
म्हणून आपल्याला याचा पाठपुरावा रस्त्यावर आणि कायदेशीर मार्गाने सुरूच ठेवावा लागणार आहे.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@maharevenue@CMOMaharashtra@RRPSpeaks@tcs_ion
♦️Normalisation बाबतचा अहवाल जाहीर करतो आहोत.
Normalised गुणांचा थेट संबंध तलाठी भरती घोटाळ्याशी आहे. आम्ही नमूद केलेल्या काही उमेदवारांना बाद करावेच लागणार आहे, त्यामुळे इतर उमेदवारांचे Normlised गुण बदलतील. म्हणून आताचा Normalised गुणांवर नियुक्त्या देता येऊ शकणार नाहीत. त्यामुळे आता अंतिम आंदोलन तसेच न्यायालययातील कायदेशीर लढाई केली जाईल.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@maharevenue@AUThackeray@RRPSpeaks@rajushetti@VijayWadettiwar
लातूर मधील तलाठी घोटाळा बाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. काही जिल्ह्यातील टॉपर मुले ज्यांना 200 प्लस मार्क आहेत ते एकाच गावचे आहे शिवाय ते लातूर मधील एका सेंटर चालक चे जवळचे नातेवाईक आहेत शिवाय हे टॉपर त्याच सेंटर वर वनरक्षक भरती पर्यंत कामाला होते. किती हा योगायोग आहे. यांचा आणि अभ्यासाचा काडी मात्र संबंध नाहीये. तरी यांना 200 प्लस मार्क आहेत आणि अभ्यास करणारे विद्यार्थी वेडे आहेत लायब्ररी मध्ये अभ्यास करत बसतात आणि वेडी आशा करतात की आम्हाला सरळसेवा मधून नौकरी मिळेल. असेच प्रकार प्रत्येक जिल्ह्यात झाले आहेत. हे फक्त उदाहरण आहेत. जर लातूर मधील सेंटर ची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी केली तर सर्व सत्य समोर येईल पण यात सर्व जण सहभागी आहेत अशी शंका आहे कारण बाकीचे बरेच जन ज्यांनी लातूर सेंटर वरून परीक्षा दिली आहे आणि मार्क जास्त आहेत त्यांचे घरचे उच्च स्तरीय सरकारी अधिकारी आहे. सब मिली भगत आहे. गरिबांच्या होतकरू मुलांनी फक्त अभ्यासच करायचा का? मायबाप सरकार डोळे उघडा आणि चौकशी करा सत्य समोर येईल. जे वनरक्षक पर्यंत त्याच सेंटर वर जॉब करत होते तिथेच तलाठी च सेंटर आला आणि त्यांना 200 प्लस मार्क किती भारी आहे ना हे.
लक्ष द्या @RVikhePatil@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@maharevenue @Dhananjay_AAP @RRPSpeaks@VijayWadettiwar@SVW790@abpmajhatv@KunalNitinRaut@LoksattaLive@Awhadspeaks@AAPMaharashtra@PatilKailasB@ShivSenaUBT_@TV9Marathi@VBAforIndia@zee24taasnews@ShivsenaUBTComm@AUThackeray@waglenikhil
फडणवीस साहेब तुम्ही तेव्हा अयोध्येला गेले होते किंवा नाही, याच्याशी आम्हाला काही एक सोयरेसुतक नाही. तेव्हढं तलाठी भरती बदल पण बोला, पुरावे रोज जाहीर करतो आहोत. तलाठी भरती रद्द करायला, सरकार ऐकायला तयार नसेल तर पुण्यातील अंतिम आंदोलन नक्कीच ऐतिहासिक करू.
@RVikhePatil@maharevenue .
तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाला आहे, पण कोणताही तपास न करता महसूल विभाग अंतिम निवड याद्या लावणार आहे, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. आम्ही केलेल्या आरोपांवर महसूल विभागाने अजून कोणताही खुलासा दिलेला नाही, घोटाळ्याच्या न्यायालयीन SIT चौकशी बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याने आता पदभरती रद्द करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आम्ही सरकारला अनेक निवेदने दिली, विनंत्या केल्या पण उलट सरकारकडून निवड याद्या लावण्याची भाषा केली जात आहे, आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे आम्हीही जशास-तसे उत्तर देण्यास सज्ज आहोत. महसूल विभागाने न्यायालयीन चौकशी न करता निवड याद्या प्रसिद्ध केल्यास, आम्ही पुण्यात तीव्र स्वरूपाचे अनिश्चितकालीन अंतिम आंदोलन करणार असल्याचे आज जाहीर करतो आहोत.
@RVikhePatil@maharevenue@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@RRPSpeaks@rautsanjay61@Awhadspeaks@NANA_PATOLE@iambadasdanve@PatilKailasB@rajushetti@Prksh_Ambedkar
गुन्हा दाखल करायचाच म्हटल्यावर कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. गुन्हा नोंद झाल्याची प्रत आता प्राप्त झाली आहे, अगदी क्षुल्लक कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी नेत्यांच्या सभांमध्ये एखाद्या चौकात स्टॉप घेऊन ०५-१० मिनिटांचे आतापर्यंत कितीतरी भाषणे झाली असतील पण कितींवर गुन्हे दाखल करण्यात आले? तुमचा आवाज म्हणून आम्ही काम करतोय, टार्गेट करून आमचाच आवाज बंद करण्याचे कारस्थान रचण्यात आलं आहे.
राज्यात कोणाचीही बेबंदशाही आणि मोघलाई चालणार नाही, घोटाळे करून नोकरीवर लागऱ्यांना पायघड्या अंथरूण नोकऱ्यांचे नियुक्ती पत्रे वाटण्यात येतील आणि इथं घोटाळे बाहेर काढणाऱ्या आमच्या सारख्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे.
फडणवीस आणि विखे-पाटलांना आम्ही आज इशारा देतोय, भ्रष्ट तलाठी भरती रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास संविधनिक मार्गातील आंदोलनाने राज्यभर रान पेटवून देऊ.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@CMOMaharashtra@RRPSpeaks@VijayWadettiwar@AAPMaharashtra@abpmajhatv@Awhadspeaks @Dhananjay_AAP @LoksattaLive@KunalNitinRaut@ShivSenaUBT_@TV9Marathi@zee24taasnews
अपडेट फीचर : अपडेट फीचर व्दारे उमेदवारांनी सोडविलेल्या प्रश्नाचे रिस्पॉन्स ॲडमीन व्दारे बदलले जाऊ शकत होते. म्हणजे एखाद्या उमेदवाराला उत्तीर्ण करून दिले जाऊ शकत होते.
#घोटाळेबाज_फडणवीस#फसवे_फडणवीस
तलाठी भरतीतील घोटाळे बाहेर काढणाऱ्या बेरोजगार तरुणांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असाच प्रकार सरकार करत आहे.
यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट निर्माण होत आहे. सरकारने जबाबदारीचे भान राखावे, गैरप्रकारांचे जे जे पुरावे आले समोर आहेत, त्याची चौकशी करावी. गुन्हेगारांना पाठीशी घालू नये. सरकारच बेजबाबदारपणे वागणार असेल तर उमेदवारांनी न्याय कोणाकडे मागायचा.
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@RVikhePatil
तलाठी पदभरतीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देऊन ही, सरकार कारवाई करत नाही...दुसरीकडे राज्यातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.
आतापर्यंत राजकीय विरोधकांवर दडपशाही करणाऱ्या महायुती सरकारने या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली होती.
आता पुढे जाऊन गुन्हे दाखल करण्यापर्यंत या सरकारची मजल गेली आहे, इतका मुजोरपणा?
परीक्षार्थींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, त्यांच्यावर कारवाई करू नये
♦️स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल.
तलाठी भरती रद्द करण्यासाठी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने रीतसर पोलीस परवानगी काढून मोर्चा आयोजित केला होता. पण रोड ब्लॉक केल्याचे कारण देत पोलिसानी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष- राहुल कवठेकर यांच्यावर पोलीस ठाण्यात नेऊन, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शेवटी विखे पाटलांचा शब्द खरा ठरला, गुन्हे दाखल झालेच.
कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडणार नाही, आम्ही सत्य बाहेर काढूच. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती दाखल करण्यात येणाऱ्या गुन्हाचा तीव्र निषेध करते. याच्या निषेधार्थ आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडू. तलाठी भरती रद्द साठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही भरती रेटून नेऊ देणार नाही. 👊✊✌️
@Dev_Fadnavis@RVikhePatil@maharevenue@RRPSpeaks@Awhadspeaks @Dhananjay_AAP @VijayWadettiwar@KunalNitinRaut@girishkuber@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi@saamTVnews