माझा पक्ष 'धाराशिव'!🚄🚄🌱🌱
झेंड्यामागून धावणारी मी अंध कबाड नाही,
पक्ष आणि नेत्यांची मला आता चाड नाही.
जो माझ्या मातीचा, माझ्या माणसांचा विचार करील,
माझा कौल त्यालाच, जो धाराशिवचे पाऊल पुढे धरील!
भुलथापांच्या घोषणांचे आम्हाला कौतुक नाही,
नेत्यांच्या त्या गाड्यांवर आमचे भविष्य सुखात नाही.
तरुणांच्या रिकाम्या हाताला जो हक्काचे काम देईल,
सुजलाम्-सुफलाम् करून या भूमीला, जो हक्काचे पाणी देईल...
गोरगरिबांचे अश्रू पुसून जो विकासाची पहाट आणेल,
राजकारणाच्या पलीकडची, जी हक्काची माणसे जाणेल.
जो जातीच्या भिंती पाडून फक्त प्रगतीचा मंत्र जपेले,
धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी जो अहोरात्र खपेल...
त्याच्याच गळ्यात पडेल मानाची ही माळ माझी,
नेत्याच्या सत्तेपेक्षा, जिल्ह्याची प्रतिष्ठा मोठी माझ्यासाठी आजची.
पक्ष गेला खड्ड्यात, अन नेता गेला चुलीत,
माझा सुवर्ण 'धाराशिव' दिसेल, फक्त त्याच्याच सावलीत!
टीप: June 21, 2026 रोजी झालेल्या खोकेबाजीपणानंतर झालेल्या साक्षात्करानंतर......!!!
@ranajagjitsinh1@OmRajenimbalkr@PatilKailasB@rahulmmote@Dr_Pratapsinhp@TanajiSawant4MH@archanaRpatil@RaviSir_MP
खासदार साहेब 'वचन' या शब्द तुम्हाला शोभत नाही. किती दिवस स्वतःच्या कार्यालयात दरबार घेऊन लोकांचं रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले काढायचं. जनता दरबार नावाचा कार्यक्रम इतर तालुक्यात भरवा म्हणजे लोकांच्या समस्या तरी समजतील.
जिल्ह्यात अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी होऊन नुकसान झालं आहे तरी तुटपुंज्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिकविमा भेटलात. तिकडं कधी लक्ष देणार.
बाणगंगा, भैरवनाथ कारखान्याकडे शेतकरी , ऊस वाहतुकदार सहा महिन्यांपासून चपला झिजवत आहेत. त्याची बिल अजुन पण भेटली नाहीत.
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे भरपुर पाझर तलाव, पुल , रस्ते खचलेत अजुन दुरूस्ती तर नाहीच पण शेतकर्यांची खरडुन गेलेल्या जमिनीची नुकसानभरपाई पण काही शेतकऱ्यांना भेटली नाही .
#जिल्हा_जळतंय_अन_खासदार_आपल्याच_जगात_मग्न
#शेतकरी
#पिकविमा
शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी धाराशिव येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार पार पडला.
संकटातून मार्ग काढण्यासाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जनतेच्या हक्कासाठीच हा जनता दरबार आहे.
जनता दरबारात आलेल्या प्रत्येक तक्रारीकडे आणि प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने व संवेदनशीलतेने पाहिले. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून अनेक प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
आपण माझ्यावर ठेवलेला प्रेम, विश्वास आणि दिलेला पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. या विश्वासाला खंबीरपणे न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहीन, हेच माझे वचन!
#Dharashiv #जनता_दरबार #लोकसेवा #धाराशिवच्या_सेवेत
#OmrajeNimbalkar
अस्सल लोहपुरुष म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील🔥🔥
“नाना पाटील नाही एकला । त्याच्या दिमतीला आज उभा ठेला ।
पोलादी संघटना लोकात ।शेकड्याने शस्त्रसिद्धी हातात ॥
पकडील कोण नानाला। आमच्या नेत्यालाबातमी जो देईल नीच इंग्रजारास ।
दिवा नाही ठेवणार त्याच्या वंशास ॥
लाथेने उडवा पाटीलकी । झेलु नका थुंकी । सोडून लायकी ।तुम्ही राजे देशाचे ।
हक्क मिळताच स्वराज्याचे । तुम्ही आमचे नि आम्ही तुमचे ॥
हाकलून देऊ गोऱ्याला । हरामखोराला । नीच राज्याला ।घेऊया परत राज्य आपुले ।
कायद्याचे भय आता कसले । प्रतिसरकार सुरू झाले ॥
कोण पकडील क्रांतिवीराला । नाना पाटलाला । आमच्या नेत्याला ।
पकडील कोण पळत्या वाऱ्याला ।
धरील कोण जळत्या अग्नीला । गवसणी कोण घालील आभाळाला ॥
#लोहपुरूष #क्रांतिसिंह #प्रतिसरकार
"हातात खिळे ठोक
छातीत भाल्याचे भोक
पायांना बुलेट घुसून आलेले पोक
आणि तरीही या शवयात्रेत झोक
असा की
खांदा देणारे मेलेत
आणि हाच फक्त जिवंत आहे"
#नामदेवढसाळ
धाराशिवच्या आमचीच लाल संघटनेत अजुन एकाचा समावेश
तुळजापूर आमदार: धाराशिव -तुळजापुर रेल्वे माझ्यामुळे आली.
धाराशिव खासदार: धाराशिव -तुळजापुर रेल्वे माझ्यामुळे आली.
आता
परांडा माजी विधानपरिषद आमदार: रेल्वे माझ्यामुळे आली.
#धाराशिवचा_ईकास_आणी_धाराशिवच_गजकरण
मराठवाड्यातील डॉ. बालाजी आगलावे ह्यांनी अमेरिकेत जाऊन आंबा ,कडीपत्ता, केळी,संत्री, टोमॅटो ह्यावर संशोधन करून अनेक पेटंट मिळवली. स्वतः १८०० एकर जमिनीवर हे काम अविरत चालू आहे.अमेरिकेत त्यांचे नाव एका रस्त्याला दिले.मूळच्या वारकरी, शाकाहारी, निर्व्यसनी ह्यांनी अनेक मराठी तरुणांना
स्वातंत्र्याची ७५+ वर्षे झाली तरी केंद्राकडून बिमारू राज्यांना मागासलेपणाच्या निकषावर भरघोस निधी मिळतो, पण विकास शून्य. महाराष्ट्रासारख्या राज्याला केंद्राच्या १.०९ लाख कोटींच्या बूस्टर डोसमधून केवळ ७,०२२ कोटी मिळतात (उ.प्र. १९,२०८ कोटी).
केंद्राचे हे निकष जर मागासलेपणावर चालत असतील, तर मग हेच सूत्र आपल्या राज्यातील मराठवाडा व विदर्भाला लागू करून त्यांचा अनुशेष का दूर केला जात नाही?
देशपातळीवर मागास राज्यांच्या नावाखाली निधी लाटायची आणि राज्यातील मागास भागांच्या तोंडाला पाने पुसायची ही दुटप्पी भूमिका आता बंद झाली पाहिजे. मराठवाडा-विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे.
विजय केळकर समिती अहवाल अंमलबजावणी झाली पाहिजे.
#मराठवाडा #FiscalFederalism #अनुषेश #केळकरसमितीअहवाल

पदोन्नतीच्या नावाखाली MPSC ची गळचेपी थांबवा!
पूर्वी 67% जागा सरळ सेवेतून भरल्या जात होत्या. आता नव्या नियमांनुसार त्या फक्त 40% राहणार, आणि नायब तहसीलदार पदासाठी तर केवळ 20% जागाच सरळ सेवेतून भरल्या जाणार!
स्पर्धा परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या संधी कोणाच्या फायद्यासाठी कमी केल्या जात आहेत?
हा फक्त नियम बदल नाही, तर गुणवत्तेला आणि मेहनतीला दिलेला मोठा धक्का आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे निर्णय तात्काळ मागे घ्या!
#MPSC
सर्वत मोठा लढा मराठा आरक्षण..🚩🚩🚩
प्रस्थापित भामट्याच्या विरोधात उपोषणाचे शस्त्र घेऊन पळता भुई करणाऱ्या मराठा क्रांतीसूर्य मनोज दादा जरांगे पाटील दादा आपणास जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....❤️🚩🎂
@Ni3kale@SakalMarathaP@Phanase_Patil
अस्सल लोहपुरुष म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील🔥🔥
“नाना पाटील नाही एकला । त्याच्या दिमतीला आज उभा ठेला ।
पोलादी संघटना लोकात ।शेकड्याने शस्त्रसिद्धी हातात ॥
पकडील कोण नानाला। आमच्या नेत्यालाबातमी जो देईल नीच इंग्रजारास ।
दिवा नाही ठेवणार त्याच्या वंशास ॥
लाथेने उडवा पाटीलकी । झेलु नका थुंकी । सोडून लायकी ।तुम्ही राजे देशाचे ।
हक्क मिळताच स्वराज्याचे । तुम्ही आमचे नि आम्ही तुमचे ॥
हाकलून देऊ गोऱ्याला । हरामखोराला । नीच राज्याला ।घेऊया परत राज्य आपुले ।
कायद्याचे भय आता कसले । प्रतिसरकार सुरू झाले ॥
कोण पकडील क्रांतिवीराला । नाना पाटलाला । आमच्या नेत्याला ।
पकडील कोण पळत्या वाऱ्याला ।
धरील कोण जळत्या अग्नीला । गवसणी कोण घालील आभाळाला ॥
#लोहपुरूष #क्रांतिसिंह #प्रतिसरकार
धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी चार वर्षांपासून गणित आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक नसल्याने थेट शाळेलाच कुलूप ठोकून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. Gen-Alpha च्या या दणक्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाची नियुक्ती केली, पण एकीकडं शिक्षक भरतीसाठी हजारो पात्र उमेदवार उपलब्ध असूनही भरती केली जात नाही तर दुसरीकडं चार-चार वर्षे विज्ञान आणि गणितासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षक नाहीत, ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे इथले आमदार तानाजी सावंत हे स्वतः मोठे शिक्षण सम्राट आहेत, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी याच महाशयांनी दीडशे बैठका घेतल्या होत्या म्हणे…! मग आपल्याच मतदारसंघातील सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी एकही बैठक का घेतली नाही, हा प्रश्नच आहे.
सरकारलाही विनंती आहे की, जंतरमंतरवरुन काहीतरी धडा घ्या आणि विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष करायचं बंद करा..!
@Dev_Fadnavis@dadajibhuse
#GenAlpha #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या #शिक्षण_वाचवा #धाराशिव #StudentProtest