Heartiest birthday greetings to Hon. CM of Gujarat, Shri Bhupendra Patel ji!
Wishing you a long life and good health!
गुजरात के मुख्यमंत्री मा. श्री. भूपेंद्र पटेल जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
@Bhupendrapbjp@CMOGuj#birthdaywishes#cmofgujarat#bhupendrapatel #maharashtra #snehadubepandit
सांगली जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद; मतदार नोंदणीचे आवाहन
आज सांगली जिल्ह्यातील पेठ येथे श्री व्यंकटेश्वर शिक्षण संस्था संचालित वनश्री नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षकांशी संवाद साधला. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिक्षकांशी सविस्तर चर्चा करत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्रता असूनही मतदार नोंदणी अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र पदवीधर आणि शिक्षकाने वेळेत मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे पदवीधर निवडणुकीचे सहप्रमुख शेखर इनामदार, एकनाथतात्या जाधव, शरद लाड, विलास काळेबाग, संस्थेचे सचिव राहुल महाडिक, प्रा. महेश जोशी यांच्यासह संस्थेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
📍१५ जुलै २०२६ | सांगली
#पुणे_पदवीधर #शिक्षक_मतदारसंघ #मतदार_नोंदणी #Sangli #सांगली #BJPMaharashtra
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
📍 महाराष्ट्र पोलीस महासंचालक (DGP) सन्माननीय श्री.सदानंद दाते सर यांची सदिच्छा भेट
वसई परिसरासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालयाच्या मागणीला बळ! 🚔
वसई-विरार परिसराची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेऊन मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालयांतर्गत वसई विभागासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालय उभारण्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सन्माननीय श्री.सदानंद दाते सर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.
या भेटीत वसईतील नागरिकांना अधिक सक्षम, जलद आणि प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध व्हाव्यात, तसेच पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढावी यासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालयाच्या आवश्यकतेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सुरक्षित, सक्षम आणि सुजाण वसईसाठी सातत्याने प्रयत्न सुरूच! 🚔
@DGPMaharashtra
कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आयुष्याची संध्याकाळ मनसोक्त आणि आनंदाने जगता यावी, हा माझा नेहमीच आग्रह असतो. त्यासाठी सुरू केलेल्या ‘निसर्ग छाया’ उपक्रमाला कोथरुडमधील ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून प्रतिसाद आणि आशीर्वाद दिले.
मात्र, हा आनंद क्षणिक न राहता कायमस्वरूपी असावा, या भावनेतूनच ‘निसर्ग छाया सिनियर सिटिझन क्लब’ ही संकल्पना पुढे आली. कोथरुडमधील महात्मा सोसायटीत हा पहिला क्लब अत्यंत उत्साहात सुरू आहे. येथील सर्व ज्येष्ठ नागरिक रोज संध्याकाळी एकत्र जमतात आणि गप्पा मारत आपापली सुख-दुःखे वाटून घेतात.
याच सुंदर उपक्रमावर आधारित एक छोटी फिल्म तयार केली आहे. असाच सिनियर सिटिझन क्लब जर तुम्हालाही तुमच्या सोसायटीत सुरू करायचा असेल, तर आजच संपर्क साधा!
📞 संपर्क क्रमांक: संचालिका अमृता देवगावकर- 83789 97110 / 93566 83542
#Kothrud #NisargChhaya #SeniorCitizenClub #BJPMaharashtra #वृद्धांचा_सन्मान #निसर्गछाया #कोथरुड #ज्येष्ठनागरिक
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
📍 मंत्रालय,मुंबई
🗓️ दिनांक १५ जुलै २०२६
महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचे सकारात्मक निर्णय.
वसईतील नायगाव , मालोंडे , रानगाव , पाचूबंदर , इत्यादी कोळीवाड्यातील घरांचे सिमांकन आणि सर्व्हेषण करून , घराखालील जमिन घर मालकाच्या नावावर करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यासोबत मंत्रालयात एक महत्वाची बैठक पार पडली.
बैठकीत पुढील प्रमुख मुद्दे मांडले –
(१)वसई - नायगाव - विरार मधील सर्व कोळीवाड्यांचे तातडीने सर्व्हेषण करून सीमांकन करण्यात यावे.
(२)या सिमांकनानुसार सध्याच्या घराखालील जागा संबंधित घर मालकांच्या नावे करण्यात यावी.
(३.)यावेळी जिल्हाधिकारी , पालघर यांनी वरील प्रमाणे कार्यवाहीसाठी येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींची माहिती देऊन याबाबत शासनाकडून काही मुद्यावर मार्गदर्शन आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित झालेल्या विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मा.महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी पुढील प्रमाणे आदेश दिले :
(१)वसई तालुक्यातील ज्या ठिकाणी गावठणे घोषित करण्याची आवश्यकता आहे त्याबाबत जिल्हाधिकारी , पालघर यांनी तातडीने कार्यवाही पूर्ण करावी. यासाठी जिल्हाधिकारी यांना आवश्यक ते मार्गदर्शन महसूल विभागाने तात्काळ द्यावे.
(२)दि. ०१/०१/ २०११ ही बेस लाईन विचारात घेऊन त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या घरांखालील जागा , घरमालकांच्या नावे करण्याची कार्यवाही करावी.
(३)सदर कार्यवाही करताना ५०० चौ. फूट ते १५०० चौ. फूट या मर्यादेतील घरे विचारात घेण्यात यावीत.
(४) सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत ही कार्यवाही करण्यात यावी.
यावेळी माझ्यासह पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखर,पालघर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री.नरेंद्र पाटील तसेच भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री.बिजेंद्र कुमार, बोईसर विधानसभा प्रमुख श्री.महेंद्र पाटील, श्री.देवदत्त मेहेर, श्री.अविनाश चावंडे व महसूल विभागाचे संबंधित अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@cbawankule@highlight
#chandrashekharbawankule #revenueminister #revenue #vasai #snehadubepandit #development #Progress #palghardistrict
आज पुणे येथे पुणे भाजपा जिल्हा ग्रामीण (उत्तर)चे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे अभिष्टचिंतन केले.
सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील त्यांचे कार्य असेच निरंतर वृद्धिंगत होत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
📍८ मे २०२६ | पुणे
#PradeepKand #BirthdayWishes #PuneBJP #भाजपा
@BJP4Maharashtra@BJP4PuneCity
भावपूर्ण श्रद्धांजली..!
पुण्यातील आयटी क्षेत्रातील दिग्गज आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे (KPIT Technologies) अध्यक्ष रवी पंडित यांचे निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत मानाचे स्थान मिळवणारे रवी पंडित हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर अनेक तरुणांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनाने पुणे आणि देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
ॐ शांति!
#भावपूर्ण_श्रद्धांजली #RIP #RaviPandit #KPIT
A year ago, our armed forces displayed unparalleled courage, precision and resolve during #OperationSindoor. They gave a fitting response to those who dared to attack innocent Indians at Pahalgam. The entire nation salutes our forces for their valour.
इतिहासातील महापराक्रमी वीर, उदयपूर मेवाडच्या शिसोदिया राजवंशाचे राजे महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
#MaharanaPratap#महाराणा_प्रताप
📍 आदित्य बँक्वेट हॉल, वसई पूर्व
🗓️ दिनांक ०७ मे २०२६
भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच आगामी कार्ययोजना व विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच SIR संदर्भात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी माझ्यासह पालघर लोकसभेचे खासदार व भाजपा वसई विरार शहर जिल्हा प्रभारी डॉ. हेमंत विष्णू सवरा जी, नालासोपारा विधानसभेचे आमदार श्री. राजन नाईक जी , भाजपा वसई विरार शहर जिल्हा अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. प्रज्ञा पाटील, बोईसर विधानसभा प्रमुख श्री. महेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री. जोगेंद्र प्रसाद चौबे, श्री. बिजेंद्र कुमार, श्री. मनोज बरोट, श्री. कपिल म्हात्रे तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, प्रकोष्ठ आघाडी पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.
संघटन बळकट करत जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
#BJP #vasaivirar #वसईविरार #vasai #snehadubepandit
📍 उमेळमान, वसई पश्चिम
🗓️ दिनांक ०६ मे २०२६
श्री. नरेश पाटील व सौ. नेहा पाटील यांच्या चि. प्रलय व चि. यश यांच्या हळदी सोहळ्यास उपस्थित राहून आनंदमय वातावरणाचा अनुभव घेतला. पारंपरिक रितीरिवाज, उत्साह आणि आपुलकीने भरलेला हा सोहळा अत्यंत मंगलमय ठरला.
यावेळी श्री. विवेक पाटील, श्री. भरत भोईर, श्री. दयानंद भोईर, श्री. अमोल पाटील, श्री. हरिहर पाटील, श्री. मॅथ्यू कोलासो, श्री. जनार्दन म्हात्रे व सौ. चारुशीला घरत यांचीही उपस्थिती लाभली.
नवदांपत्यास सुख, समृद्धी व आनंदमय आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
#HaldiCelebration #IndianWedding #MLA #SNEHADUBEPANDIT #VASAI #HappyMoments #Togetherness
#हळदीसोहळा
आज कोथरूड येथे माझ्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या, हौशी आणि नवोदित कलाकारांसाठी समर्पित ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’ या संस्थेचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कला, संस्कृती आणि रंगभूमीविषयी असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करणारा हा क्षण होता.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते नाट्यतीर्थ फाउंडेशनच्या कलाकारांनी सादर केलेले ‘रंगपूजा’ हे नाटक. रंगमंचावरील कलाकारांची ऊर्जा, संवादांमधून व्यक्त होणारी संवेदनशीलता आणि त्यांच्या अभिनयातील आत्मविश्वास पाहून मन भारावून गेले.
माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की, कला आणि कलाकारांना लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयाचीही गरज असते. कोथरूडमधील हौशी आणि नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना स्वतःची कला सादर करण्याची संधी मिळाली.
आता या कलाकारांना नाटकाचे तंत्रशुद्ध शिक्षण, मार्गदर्शन आणि अधिक व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’चा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘नाट्यतीर्थ फाउंडेशन’ हे केवळ संस्थेचे नाव नसून, प्रत्येक कलाकाराच्या स्वप्नांना आकार देणारी कर्मभूमी ठरेल, असा मला विश्वास आहे.
📍८ मे २०२६ | कोथरूड
#नाट्यतीर्थ_फाउंडेशन #रंगभूमी #कोथरूड #नवोदित_कलाकार #कला_संस्कृती #Rangpooja #Theatre #Kothrud
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
आज कोथरूड येथे विद्यार्थी परिषदेच्या काळापासूनचे माझे जिवलग स्नेही अनिल कुलकर्णी अर्थात एपीके यांच्या घरी जाऊन त्यांचा सुपुत्र तथा भाजपाचा समर्पित कार्यकर्ता नचिकेत कुलकर्णी याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
नचिकेतचे अकाली जाणे अत्यंत वेदनादायी असून, ही हानी केवळ कुलकर्णी कुटुंबियांची नाही तर कोथरूडमधील भाजपाच्या संपूर्ण युवा कार्यकर्त्यांची आहे. त्याच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
या कठीण प्रसंगी कुलकर्णी कुटुंबियांच्या दुःखात मी व भाजपा परिवार पूर्णतः सहभागी आहोत. नचिकेतच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना.
📍८ मे २०२६ | कोथरूड
#Kothrud #भाजपा #भावपूर्ण_श्रद्धांजली
@BJP4Maharashtra