परळीत��ल मयत तौहीद खान हत्या प्रकरणी आज औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून तौहीद खानच्या कुटुंबियांनी मागणी केल्याप्रमाणे यात आणखी कुणाचा समावेश आहे का, याबाबत सखोल तपास करण्याची मागणी केली.
तौहीद हा घरातील कर्ता असल्याने त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी सरकारने विशेष आर्थिक मदत करावी. तसेच या प्रकरणी नशेखोरी हे एक महत्त्वाचे कारण ठरले असून बीड जिल्ह्यातील नवतरुण मुलांमध्ये वाढत्या नशेखोरीबाबत कठोर कारवाई करण्यासाठी विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.
#JusticeForTauhidKhan
शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्या घामावर देश उभा आहे. आज तोच अन्नदाता संकटात असताना सरकारने संवेदनशीलतेने निर्णय घेणे अपेक्षित आहे.
पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनामागची भूमिका ही शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांची आहे. जाचक अटी ��द्द करून सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आणि प्रलंबित प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावे. अन्नदात्यासाथीच्या या संघर्षात मी आमदार रोहित पवार यांच्यासोबत ठामपणे उभा आहे!
@RRPSpeaks
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग
#सरसकट_कर्जमाफी
सरकारच्यावतीने उपजिल्हाधिकारी सचिन इथापे, अप���पर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, DySp प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाब��साहेब पाटील साहेब यांच्याही फोनवर संपर्क घडवून आणला. यावेळी पुढील दोन-तीन दिवसांत बैठक घेण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं आणि यासंदर्भात त्यांची मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाल्याचंही सांगितलं, परंतु राज्याच्या कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याने प्रसारमाध्यमांसमोर येऊन कर्जमाफीसाठीच्या जाचक अटी रद्द करण्याचं ठोस आश्वासन देण्याची मागणी यावेळी त्यांच्याकडं केली.
कर्जमाफीचा निर्णय घेताना टाकलेल्या या अटीशर्तींमुळं शेतकऱ्यांमध्ये किती संताप आहे याची जाणीव कदाचित सरकारला झालेली दिसत नाही. परंतु शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून या अटीशर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळं अटीशर्ती रद्द केल्याशिवाय किंवा तसं आश्वासन दिल्याशिवाय माघार नाही, हे त्यांना स्पष्ट शब्दांत परंतु नम्रपणे सांगितलं.
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग
#कर्जवसुली_नकोय_कर्जमाफी_हवीय
#विनाअट_��रसकट_कर्जमाफी
आज पुन्हा पोरका झालो...
माझे दादा मला पोरका करून गेले...
माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही.
संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्��ं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले...
दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते... त्यामुळे अजूनही असं वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, धनंजय वेळेवर ये बरका... त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये...
देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या ��ीड जिल्ह्याची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी...
#AjitPawar #Ajitdada
फलटणची ती महिला.. वैद्यकीय अधिकारी होती: वैद्यकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबावाचा निषेध करण्यासाठी डॉक्टरांचा मोर्चा नाही
'आपण बीडचे असल्यामुळे सर्टिफिकेट देत नाही' असं तिला हिणवले जात असल्याचे तिने लिहून ठेवले: तिच्यासाठी कुठले जातीय मोर्चे नाहीत ( कुठल्याच प्रकरणात जात बघू नये हा मुद्दा वेगळा.. पण इथे आरोपी त्या जातीचा असला की पीडिता वाऱ्यावर)
आपल्या जातीचा नेता अडचणीत आला की गडावरचे बाबा जाहीरपणे व्यथा बोलून दाखवतात: आपल्या जातीची सुशिक्षित डॉक्टर अशी आत्महत्��ा करतेय... तेव्हा ते गप्प आहेत
या प्रकरणात तरुणीचे बनकरला दीडशे कॉल्स अशा हेडलाईन दिल्या जातायत, बनकर च्या बहिणीचा इंटरव्यू घेण्यासाठी पळणाऱ्या मीडियाला मृत तरुणीच्या तक्रारीबाबत संबंधित अधिकारी/व्यक्ती मुलाखतीसाठी सापडत नाहीत का?
कॉल डिटेल रेकॉर्ड फक्त सिलेक्टिव्हली त्या मुलीचे आणि बनकर चे किंवा बदनेचे बाहेर काढू नका... या केसशी संबंधित प्रत्येकाचे आणि तिच्या तक्रारीपासूनचे काढा.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट..ती सज्ञान आहे. तिच्यासोबत काम करणाऱ्या अनेक लोकांनी ती कामात चोख होती असं म्हटल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत आहे.
त्यामुळे चारित्र्यहनन संबंधांवर आणि तेही तुमच्या नजरेतून ठरू शकत नाही.
व्यवस्थेचा बळी वैयक्तिक संबंधात लपवू नका.
आज ठाणे येथे आयोजित वंजारी समाज अधिवेशन, विचार म���थन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून संबोधित केले.
#DMUpdates
Details in the link 🔗
https://t.co/qxLXn5h3QF
माझी #लाडकी_बहीण
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताईस जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य, यश आणि कीर्ती लाभो, ही प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना.
@Pankajamunde
अंजलीताई दमानिया यांनी आज पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून काही जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे सातत्याने खोटे आरोप करत आहेत.
शासनाच्या कार्य नियमावलीनुसार (रुल्स ऑफ बिजनेस) जीआर अर्थात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीची एक पद्धत आहे, त्यासाठी प्रक्रिया आखून देण्यात आलेली आहे .
विभागातील कक्ष अधिकाऱ्याने त्या प्रकरणाची फाईल सादर केल्यानंतर ती उपसचिव, विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांचे मार्फत मंत्र्यांच्या समोर मान्यते��्तव येत असते, मंत्र्यांची मान्यता होण्यापूर्वी व झाल्या नंतर सुद्धा अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे आय �� एस अधिकारी स्वतः ती फाईल तपासतात आणि त्या नंतरच तो शासन निर्णय निर्गमित होत असतो. त्यामुळे खोटे बोलून जीआर काढला वगैरे असे म्हणणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद, मीडिया ट्रायल करणे आणि आपल्या अर्धवट माहितीचे प्रदर्शन करणे असे आहे.
या ताईनी गेल्या पंधरा वर्षात ज्या काही मीडिया ट्रायल रन केल्या, ज्या कोणाविरुद्ध आरोप केले त्यातील एकही आरोप अद्याप कोणत्याही मा. न्यायालयात अथवा इतरत्र कुठेह��� सिद्ध होऊ शकलेला नाही.
मंत्रिमंडळाचा निर्णय झाला किंवा नाही असे भासवून निर्णय होत नाही, एखादी नसलेली गोष्ट भासवून सिद्ध करण्यासाठी ती कथित प्रेस कॉन्फरन्स आहे का?
एखाद्या विषयास मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेअंती मान्यता झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्यानंतर राज्यातील सर्वोच्च आयएएस अधिकारी असलेल्या माननीय मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केले जातात. मात्र दमानिया यांनी या प्रक्रियेची माहिती घेतली असती त��� असे निराधार आणि धादांत खोटे विधान कदापि केले नसते.
ऑफिस ऑफ प्रॉफिट पासून ते काहीही तथ्य नसलेल्या आभासी घोटाळ्यांचे कोणते तरी अर्धवट कागद समोर दाखवून त्याला पुरावा म्हणणे आणि मिडिया ट्रायल रन करणे एवढाच सपाटा सुरू आहे, त्यासंदर्भात त्यांच्याकडे कॉंक्रीट कागदपत्रे असल्यास त्यांनी न्यायालयात जावे, आता न्यायालयामध्ये आम्ही देखील याविरुद्ध योग्य लढा उभा करून दाद मागू.
फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर हा केंद्र शासनाचा कायदा आहे, त्यानुसार विशिष्ट प्रमाणपत्र धारण केल्याशिवाय व खत निर्माता कंपनीने प्राधिकृत केल्याशिवाय कोणालाही खतांची विक्री करता येत नाही. यासंदर्भात IFFCO ने संबंधित कंपन्यांना 2022 व 2023 मध्ये सुद्धा नोटीस दिलेल्या आहेत. याबाबत मी आधीही स्पष्टपणे बोललो आहे.
पण आपल्या सोयीचे तेवढे बोलायचे आणि अर्धवट ज्ञान प्रदर्शन करणे हे धोरण फक्त माझ्या बदन���मीसाठी आहे.
सदर कंपन्या या आमची उत्पादित खते विकण्यास प्राधिकृत नाहीत, फर्टीलायझर कंट्रोल ऑर्डर मधील तरतुदींप्रमाणे ओ प्रमाणपत्र असल्याशिवाय अशी खते विकता येत नाहीत, अशा प्रकारची प्रेस रिलीज स्वतः इफकोने याआधीच काढलेली आहे, तसेच ती आजही IFFCO च्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्यांना देखील ही बाब समजत असावी, मात्र तरीही खोटे बोल पण रेटून बोल, असा उद्योग त्यांनी चालवला आहे.
माझ्या डोळ्यावर आज मुंबई येथे पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने सर यांच्या खाजगी रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी पुढील चार ते पाच दिवस काळजी व विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कृपया मला भेटता येणार ��ाही. सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल.
#EyeSurgery
#DMUpdates
वारकरी सं���्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समाजातील अज्ञान दूर करून अनिष्ट रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी कीर्तन-प्रबोधनाच्या माध्यमातून दूरगामी विचार पेरणारे ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाबांच्या चरणी वंदन...
#SantBhagwanbaba
आले आले आगलावे... आले आग विझवाया...
@DGPMaharashtra यांना विनंती या जागतिक वैचारिक विच���रवंताच्या चॅटिंग बाबत सत्यता महाराष्ट्रासमोर आणावी. हे जे चॅटिंग समोर आलंय ते भयंकर आहे.
आमदार सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्याने घ्यावं. महागात पडेल म्हणजे काय ?यावरून यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते. गृह विभाग व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन धस यांचेवर योग्य ती कारवाई करावी .
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra
देशाच्या आर्थिक उदारीकरणाचे जनक मा.पंतप्रधान, आदरणीय मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन..! त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि प्रगती केली. त्यांच्या कार्याची गोड आठवण सदैव राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली!
#मनमोहनसिंग#श्रद्धांजली
कालच्या माझ्या भाषणानंतर जे काही मला फोन आले; त्यातील ९९% फोन हे माझे समर्थन करणारे होते. पण, महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती किती प्रबळपणे उभारल्या गेल्यात हे प्रत्येक फोनमधून ध्वनित होत होते. यातील एक वाक्य मला खूपच खटकले, "साहेब, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात." मी माझ्या भाषणातच सांगितले होते की, ' मी वंजारी आहे. मी वाल्मिक कराडच्या विरोधात बोलतोय. तो पण वंजारीच आहे.' यामध्ये श��व, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आहे. जिथे अन्याय- अत्याचार ��ोतो; त्याविरोधात उभे ठाकलेच पाहिजे.अन्याय करणाऱ्याला जात नसते आणि ज्याच्यावर अन्याय होतो, त्यालाही जात नसते आणि अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यानेही जात तपासू नये.
मी भुसावळच्या प्रकरणात मणियार चाचाची बाजू घेतली. तेव्हा अनेकांनी माझे कौतूक केले आणि अनेकांनी माझ्यावर टीकाही केली. पण त्यावेळेस मी माझी भूमिका स्पष्ट केली की, जर मणियार चाचाच्या जागी माझा बाप असता तर मी काय केले असते किंवा तुम्���ी काय केले असते? तिथे धर्म आड आला. अनेकवेळा मी दीन-दलित, शोषित- पीडितांची बाजू घेत असतो. तेव्हाही जातीपातीचे राजकारण आड येत असते. वर्षानुवर्ष ज्या समाजावर अन्याय होत असतो; त्या समाजासाठी आपण बोललेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही भूमिका शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतूनच येते.
शोषक हा वेगळा आणि शोषित हा वेगळा समाज आहे. आपण कुठल्याही समाजाचे असू पण शोषितांच्या बाजूने उभे राहिले पा���िजे, हेच महाराष्ट्राची माती कायम शिकवत आली आहे अन् ही शिकवण मी तरी कधी विसरणार नाही. ��ी जे काल बोलायला विसरलो ते खाली लिहितोय...
* वाल्मिक कराड चप्पल का घालत नाही? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राने जरूर विचारावे.
* २०० च्या वर एफआयआर नोंदवणारा वाल्मिक कराड हा एफआयआर नोंदवायला पोलीस स्टेशनला किती वाजता जातो की पोलीस त्याच्या घरी येऊन सह्या घेतात? याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे.
* प्राजक्ता धस या भगिनीवर अन्याय होतो. न्याय मिळविण्यासाठी त्या वेगवेगळे दरवाजे ठोठा���तात.आजही त्या प्राजक्ता धस यांना न्याय मिळत नाही. त्यांना न्याय कोण देणार?
आणखी खूप प्रश्न आहेत. बीडमधील खुनांची मालिका ही एखाद्या सिरियल किलरने केलेल्या खुनांप्रमाणे आहे. एखाद्या पुस्तकात जे आपण वाचले असते की, एकाने ४० खून केले; ५० खून केले, नंतर ते उघडकीस आले. असाच एक सिरियल किलर आपणाला ठेचायचा आहे अन् त्या सिरियल किलरचे नाव आहे, वाल्मिक कराड!
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेत अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने देवेन भाऊंच्या नव्या इनिंगला शुभेच्छा दिल्या...
@Dev_Fadnavis
६ डिसेंबर
महामानव क्रांतीसुर्य,परम पूज्य,विश्वरत्न, संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम...!!!
#चैत्यभूमी#महापरिनिर्वाण