What an unforgettable evening !
कल रात, भारत जोडो न्याय यात्रा समाप्ती के बाद कॅम्प मे राहुल गांधीजी के साथ. ❤️💪🏻
My leader ❤️
Thank you @RahulGandhi ji for your kind words.
Beautiful Morning at Gate way of India 😊
Good morning is not merely the arrival of light, it is the quiet reminder that the universe has granted you another chance to begin again, unburdened by yesterday’s unfinished stories.
सावरकरांनी दहावेळा माफीनामे दिल्याचे सावरकरांचे पणतू सात्यकी यांनीच पुणे न्यायालयात स्पष्ट केले, सावरकर यांची खरी लोकांकडूनच करण्यात अवहेलना उजव्या विचारधारेच्या आली आहे.
मा. श्री. सचिन सावंत
सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी
@sachin_inc
Hon'ble Congress President Shri @kharge has appointed/ reassigned the following party functionaries as AICC Secretaries, attached to their respective States, Union Territories and functional responsibilities with immediate effect.
यह जाहिल लोग सोनिया जी की किताब फाड़ने के लिए इतने उत्साहित थे कि बालासाहेब की ही फोटो फाड़ डाली
हमारी संस्कृति में किताबों में सरस्वती का वास है
जाहिलों की जमात हैं भाजपाई और उनके साथी
वैसे फाड़ने के लिए ख़रीदी तो होगी किताब - उसका शुक्रिया 😂🤣
ऑनलाइन झूम बैठकीच्या माध्यमातून आज AICC चे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिव्हेल्ला प्रसादजी यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले निरीक्षक, जिल्हा प्रभारी तसेच BLA-1 प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राज्यभरात ‘संविधान रक्षा मार्च’, ‘वोट बचाओ, देश बचाओ’ आणि ‘वोट रक्षक अभियान’ प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. या अभियानांचे नियोजन, अंमलबजावणी आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
देशाचे संविधान, लोकशाही मूल्ये आणि प्रत्येक मतदाराचा मतदानाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचून व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित केली. या लढाईत काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग नोंदवत संघटितपणे काम करावे, असे आवाहन केले. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी ही लढाई अधिक ताकदीने व एकजुटीने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
नेमकं काय घडलं ?
चौकशी का केली जात नाही ?
चौकशीला विरोध का केला जातोय ?
चौकशी शब्द जरी उच्चारला तरी भाजप भक्त तुटून का पडत आहेत ?
सामान्य माणूस जागा होतोय ….
धन्यवाद रोहित दादा. @RRPSpeaks
महाराष्ट्र काँग्रेसचे माजी सहप्रभारी आणि मार्गदर्शक, श्री. बी. एम. संदीप जी @BMSandeepAICC यांची तेलंगणा राज्याच्या AICC प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
आपल्या अनुभवी नेतृत्वाने व संघटनात्मक कौशल्याने तेलंगणामध्ये पक्षाची बळकटी आणखी वाढो आणि आपल्या राजकीय वाटचालीत अखंड यश मिळो, हीच सदिच्छा. 💐
सोबत महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदादा जोशी.
#BMSandeep #AICC #TelanganaCongress #MaharashtraCongress #INC
तेलंगणा सरकार आयोजित ‘भारत समिट’ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
जगभरातील ७० पेक्षा जास्त देशांतील पुरोगामी पक्ष, संघटना आणि विचारवंत या अधिवेशनात एकत्र आले होते. लोकशाही, सामाजिक न्याय, आर्थिक समानता, हवामान न्याय आणि शांततेच्या मूल्यांवर आधारित चर्चा झाल्या.
हैदराबादमध्ये झालेल्या या समिटने हे दाखवून दिले की, भारताच्या पुरोगामी परंपरेला (न्याय, सत्य आणि वसुधैव कुटुंबकम) जागतिक स्तरावर आजही महत्त्व आहे.
@PushparajVD
#BharatSummit #ProgressivePolitics #Telangana #JusticeForAll #GlobalSolidarity
मोदींचे मित्र अदानी यांचा आणखी एक घोटाळा उघडकीस! 👇
अदानी ग्रीन एनर्जीला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जलविद्युत प्रकल्पाचे काम मिळाले आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकल्प 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या क्षेत्रात येतो.
वनविभागाच्या नियमानुसार, अशा क्षेत्रात प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीला प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ४ टक्के रक्कम वन्यजीव संवर्धनासाठी जमा करणे बंधनकारक आहे.
अदानीने सुरुवातीला या जलविद्युत प्रकल्पाची किंमत ५,६७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले होते.
या हिशोबानुसार, अदानीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या खात्यात २२७ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते.
मात्र, इथेच अदानीने मोठा खेळ केला!
प्रकल्पाच्या खर्चात एका दशांश चिन्हाचा (.) वापर करून कोट्यवधी रुपयांचा घोळ घातल्याचा आरोप आहे.
अदानीच्या कंपनीने वनविभागाला सांगितले की, प्रकल्पाची किंमत ५,६७५ कोटी रुपये नसून केवळ ५६.७५ कोटी रुपये आहे.
त्यामुळे ५६.७५ कोटी रुपयांच्या ४ टक्क्यांनुसार वन्यजीव संवर्धनासाठी द्यावी लागणारी रक्कम केवळ २.२७ कोटी रुपये झाली.
आश्चर्याची बाब म्हणजे, वनविभागानेही हा दावा मान्य केला आणि सरकारी कागदपत्रांमध्ये प्रकल्पाची किंमत ५६.७५ कोटी रुपये नोंदवण्यात आली.
जगात अदानी हे एकमेव उद्योगपती असतील, जे अवघ्या ५६.७५ कोटी रुपयांत जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा दावा करत आहेत!
प्रकल्पाच्या खर्चात फेरफार करून अदानीने जवळपास २२५ कोटी रुपयांची रक्कम वाचवल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात वनविभागाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, मोदी सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांना देशाची संपत्ती लुटण्याची मोकळीक दिली आहे आणि अदानी त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.
आरशात स्वतःला पाहताना मोदींना किंचित तरी लाज वाटत असेल का ?
महाराष्ट्र के कोल्हापुर में दूध उत्पादक BJP सरकार के खिलाफ सड़कों पर उतरे हैं.
पूरा मामला यहां समझें 👇
दूध उत्पादक BJP सरकार से इसलिए नाराज हैं, क्योंकि वो साजिशन गोकुल दूध संघ पर कब्जा करना चाहते हैं.
दरअसल, गोकुल दूध संघ में बोर्ड की 25 सीटों पर चुनाव हुए थे. इसमें कांग्रेस वाले गुट ने 13 सीटें जीतीं और BJP वाला गुट 12 सीट जीत पाया.
बहुमत के हिसाब से कांग्रेस वाले का गुट का अध्यक्ष बनना चाहिए.
लेकिन जब 29 अक्टूबर को अध्यक्ष चुनने के लिए बैठक बुलाई गई तो उसमें BJP वाले गुट के 12 लोग शामिल नहीं हुए.
गोकुल के नियम के अनुसार, बैठक के लिए कम से कम 14 निदेशकों का कोरम जरूरी है, लेकिन BJP वाले गुट के 12 लोग नहीं आने से कोरम पूरा नहीं हुआ.
कांग्रेस गुट समझ गया - BJP गुट वाले कुछ साजिश में लगे हैं.
इसलिए उसी दिन कांग्रेस के बहुमत वाले गुट के 13 लोगों ने शशिकांत पाटिल चुयेकर को गोकुल दूध संघ का अध्यक्ष घोषित कर दिया.
फिर महाराष्ट्र की BJP सरकार ने 30 अक्टूबर को इस फैसले को अवैध घोषित कर दिया.
कांग्रेस वाला गुट कोर्ट चला गया. कोर्ट ने कहा कि मौजूदा व्यवस्था के तहत मीटिंग की जाए और अध्यक्ष को चुना जाए.
कोर्ट के आदेश के अनुसार BJP गुट को मजबूरन अध्यक्ष पद के लिए बुलाई गई बैठक में शामिल होना होता.
ऐसे में महाराष्ट्र की BJP सरकार ने नियम ही बदल दिए. कैबिनेट ने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 (धारा 73AAA) में संशोधन करने का फैसला लिया.
इसके तहत 500 करोड़ से ज्यादा टर्नओवर वाली सहकारी संस्थाओं में सरकार 5 निदेशक नामित करेगी, जिनमें से 4 को वोटिंग का अधिकार होगा.
गोकुल पर ये नियम लागू हुआ तो BJP वाले गुट का आंकड़ा 12 से बढ़कर 16 हो जाएगा, जिससे बहुमत पलट जायेगा.
ये वो साजिश है, जिसके खिलाफ दूध उत्पादक सड़क पर उतरे हैं.
कोल्हापूरच्या जनतेने बंटी पाटलांना १३ नाही, लाखों मतांचा कौल दिलाय!
ही गर्दी बघितली की सत्ताधाऱ्यांची लायकी कळेल..
बंटी पाटलांच्या मोर्चात एवढे फक्त न्यूज मीडिया वाले होते..
गोचीडही लाजले असेल ..!
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेणाऱ्या फडणवीसांकडे मंत्रालयातील एका खिडकीला पडदा बसवण्यासाठी मात्र तब्बल १० हजार रुपये आहेत!
महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मंत्रालयातील दालनातील २५ खिडक्यांना प्रत्येकी १० हजार रुपये खर्चून पडदे बसवण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
एकीकडे दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना, देवेंद्र फडणवीसांकडून मदतीसाठी अभ्यास, निकष आणि तज्ज्ञ समित्यांची कारणे पुढे केली जातात. मात्र, मंत्रालयातील पडद्यांसाठी तातडीने निधी उपलब्ध होतो. फडणवीसांचा हा दुटप्पीपणा नेमका कशासाठी?
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अडचणीत असताना, जनतेच्या पैशातून पडद्यांवर होणारी ही उधळपट्टी म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.
गोचीड तरी फक्त रक्त पिते; पण फडणवीस सरकार गोचिडीलाही लाजवेल अशा पद्धतीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शोषत आहे.
चोराच्या मनात चांदणे !
देवेंद्र फडणवीस सरकारला गोकुळची (सहकारा) एवढी चिंता होती ? तर, सत्तेच्या दलालांच्या (मंत्र्यांच्या) सोयीचा निर्णय घ्यायला नको हवा होता, की !
प्रशासक नको म्हणून मागच्या दरवाजाने चार संचालक घुसवण्या ऐवजी कालच्या कॅबिनेटमध्ये सभेचा "कोरम साध्या बहुमताचा असावा" असा निर्णय घेता आला असता.
गावाच गोकुळ होऊ द्यायचं, मथुरेला (अमूल) दूध नाही जाऊ द्यायचं ✊
@satejp@INCMaharashtra
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यासंदर्भातील ईडी प्रकरणात आज ईडीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि ईडी न्यायालयानेही तो तात्काळ स्वीकारला.
मुश्रीफ साहेबांचे अभिनंदन! स्वाभिमानी कोल्हापुरकरांचं गोकुळ अमुलच्या घश्यात घालण्याची त्यांची मेहनत फळाला आली, असंच म्हणावं लागेल.
हसन मुश्रीफ यांच्या विरोधातल्या ईडी केस मध्ये आज ईडीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि ईडी कोर्टाने तो स्वीकारला.
मुश्रीफ साहेबांचे अभिनंदन. त्यांची मेहनत फळाला आली.