१ ऑगस्टपासून 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' आवश्यक!
शासनाच्या प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.
आजच जवळच्या एसटी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करा.
@msrtcofficial
#NCMCSmartCard
#MSRTC
#MaharashtraTransport
#MahaDGIPR
विकसित भारत २०४७ साठी विकसित महाराष्ट्राचा संकल्प..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथील नीती आयोगाच्या बैठकीत सादर केला राज्याच्या सर्वांगीण प्रगतीची दिशा निश्चित करणारा ‘विकसित महाराष्ट्र - २०४७’ रोडमॅप. #विकसितमहाराष्ट्र२०४७#ViksitMaharashtra2047
नवी मुंबईत देशातील पहिले जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा, संशोधन व वैद्यकीय पर्यटन केंद्र साकारणार!
✅ महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात 'नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी' (NMIMC) साठी सामंजस्य करार नुकताच झाला आहे.
#Healthcare
नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित ‘नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिल’च्या 11व्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देणारा सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप सादर केला.
‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख क्षेत्रांवर राज्य शासन विशेष भर देत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 'विकसित महाराष्ट्र-2047' अंतर्गत 2030 पर्यंत $1 ट्रिलियन, 2035 पर्यंत $2 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था उभी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) ची प्रभावी अंमलबजावणी, एआय, रोबोटिक्स, डेटा सायन्स आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात समावेश, नवी मुंबई येथे जागतिक दर्जाची ‘एज्युसिटी’, तसेच कौशल्य विकास, स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी धोरणे राबविण्यात येत आहेत. तसेच, आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार, नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि मेडिसिटीसारख्या संकल्पना राबविण्यात येत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे.
कृषी, उद्योग, पर्यटन, डिजिटल प्रशासन आणि एआयसारख्या क्षेत्रातील उपक्रमांमुळे राज्याच्या प्रगतीला नवी गती मिळत आहे, तसेच महाराष्ट्र देशाच्या विकासात अग्रणी भूमिका बजावत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
@narendramodi@Dev_Fadnavis@NITIAayog
#ViksitBharat2047 #GoverningCouncil #ViksitMaharashtra2047 #DevendraFadnavis
गेल्या दशकातील भारतीय कृषी क्षेत्राची कहाणी ही केवळ वाढलेल्या आकडेवारीची नाही. ती अधिक सक्षम शेतकरी, वाढलेले उत्पन्न, संकटांना तोंड देण्याची वाढलेली क्षमता आणि भविष्यासंदर्भातील अधिक दृढ आत्मविश्वास यांची कहाणी आहे.
#12YearsOfKisanSamriddhi
पंतप्रधान @narendramodi हे भारताचे सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान बनत असताना, हा टप्पा केवळ एक विक्रम नसून सातत्यपूर्ण नेतृत्व आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे देशात प्रत्यक्ष परिवर्तन कसे घडू शकते, याचीही साक्ष आहे.
#LongestServingElectedPMModi
अतुलनीय नेतृत्वाचा प्रवास!
४,३९९ दिवसांची समर्पित सेवा आणि ती अजूनही सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सर्वाधिक काळ सलग लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान म्हणून इतिहास रचला आहे.
#LongestServingElectedPMModi
पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाने जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणेला दिले आहेत.
राज्यातील #इयत्ताअकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीत ९ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवून प्रवेश अर्ज लॉक करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यभरातील ६ लाख ८० हजार ७८६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवून प्रवेश अर्ज लॉक केले असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आली आहे. राज्यातील एकूण ९,५६९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
पसंतीक्रम नोंदवून अर्ज लॉक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी १३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी (अलॉटमेंट) जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.