आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा-२०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा
महामहीम #राष्ट्रपती_श्रीमती_द्रौपदी_मुर्मू यांच्या शुभहस्ते शेगांव जि. बुलढाणा ( महाराष्ट्र) येथे होत आहे. #Live#थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लिंक...
युट्यूब :
https://t.co/xzsPx1a6BA
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्रातील एसटी बसचा अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
एसटी आणि जळगाव जिल्हा प्रशासन सुरत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
#म्यानमार चे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी लोकभवन येथे भेट दिली. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांच्या समवेत आलेल्या शिष्टमंडळात राष्ट्रपती कार्यालयाचे केंद्रीय मंत्री खिन माउंग यी, परराष्ट्र व्यवहार मंत्री टिन माउंग स्वे, वित्त आणि महसूल मंत्री डॉ. कान झॉ, कृषी मंत्री मिन नाउंग, उद्योग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विकास मंत्री डॉ. चार्टी थान, म्यानमारच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर डॉ. खिन नाइंग ऊ, संरक्षण दलातील लेफ्टनंट जनरल मो म्यिंट स्वे, राष्ट्रीय नियोजन, गुंतवणूक आणि परकीय आर्थिक संबंध मंत्री यू थंत सिन ल्विन, स्थलांतर आणि लोकसंख्या मंत्री डॉ. खाइंग खाइंग सो, वाणिज्य मंत्री मिन मिन आणि म्यानमारमधील भारताचे राजदूत झॉ ऊ यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, भारताचे म्यानमारमधील राजदूत अभय ठाकूर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मरिटाईम एअर ऑपरेशन्सचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर व्हाइस मार्शल प्रशांत शरद वडोदकर आदी उपस्थित होते.
@Jishnu_Devvarma@Dev_Fadnavis@Prof_RamShinde@SunetraA_Pawar@JaykumarRawal@MPLodha
जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली. भारत-जपान संबंध अधिक मजबूत करण्याची गरज असून भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टासाठी जपानसारख्या देशांशी आर्थिक, तांत्रिक व सामरिक सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सभापती प्रा. शिंदे यांनी केले.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी जपानच्या विकासाचा आणि द्वितीय महायुद्धानंतरच्या पुनर्निर्माणाचा उल्लेख करत जपानच्या प्रगतीचे कौतुक केले. महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद करत त्यांनी राज्यात गुंतवणूक, उद्योग आणि रोजगारवाढीसाठी जपानी सहकार्याचे स्वागत केले. तसेच भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आगामी काळात आणखी बळकट होतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासचे उप-वाणिज्यदूत निशिओ र्यो, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी (आयएफएस) स्वप्नील थोरात, विधिमंडळ सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (२) मेघना तळेकर, सचिव (४) शिवदर्शन साठ्ये आणि सभापती यांचे सचिव पंडित खेडकर उपस्थित होते.
@Prof_RamShinde
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्यावर टीका केल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.
#FactCheck#DGIPRFactCheck
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये त्यांच्या वक्तव्याची मोडतोड करून प्रसिद्ध केल्याचे दिसत असून मूळ पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याचे कौतुक केले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ₹१० आणि ₹२० च्या पॉलिमर नोटांसाठी संभाव्य पायलट प्रोजेक्टबाबत केवळ प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. महात्मा गांधी यांचा फोटो हटवून RBI ने नवीन प्लास्टिक नोटा जारी केल्याचा दावा खोटा आहे.
RBI ने असा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. व्हायरल झालेला फोटो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केला आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
#RBI
#PlasticNotes #PolymerNotes #IndianCurrency
महाराष्ट्रात ऑनलाइन ॲप आधारित ॲग्रीगेटर सहकारी #टॅक्सी सेवेबाबत परिवहन विभागामार्फत तातडीने नियमावली तयार करून या सेवेस परवानगी देण्यात येईल. ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सीमुळे लाखो चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार टॅक्सी को. ऑपरेटिव्ह लिमिटेडची (भारत टॅक्सी) सेवा सुरु करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत व्यक्त केला.
बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रणधीर सावरकर, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, भारत टॅक्सीचे कर्नल हिमांशू, अदानी एअरपोर्ट चे कार्यकारी संचालक जीत अदानी, मुख्य अधिकारी बी व्ही.सी. के. शर्मा, एस. टी.सी.एल. संचालक अर्चना सिंग, वाहतूक संस्थेचे रुपेश धुमाळ आणि विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सध्या या ॲग्रिगेटर आधारित टॅक्सी सेवांमध्ये चालकांना सामाजिक सुरक्षेच्या अभावासारख्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच नागरिक व प्रवाशांनादेखील विविध अडचणी व समस्या येतात. या पार्श्वभूमीवर चालकांना कामगारांमधून मालकांमध्ये रूपांतरित करण्याचे आणि त्यांना सहकाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय आहे. राज्य परिवहन महामंडळ देखील ‘छावा’ या नावाने ॲप विकसित करीत असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सहकार भारत टॅक्सी को. ऑपरेटिव्ह लिमिटेडचे कर्नल हिमांशू यांनी सादरीकरणाद्वारे भारत टॅक्सी सेवेबाबत माहिती दिली. मुंबई येथे भारत टॅक्सीची सुरुवात केली जाणार असून या पाठोपाठ पुणे आणि नागपूर येथे देखील ही सेवा पोहोचवली जाणार आहे.
@Dev_Fadnavis@PratapSarnaik@madhurimisal@msrtcofficial
#BharatTaxi
सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांपासून ते आंतरराष्ट्रीय पर्वतरांगांपर्यंत आपल्या जिद्दीची पताका फडकावणाऱ्या ११ वर्षीय बाल #गिर्यारोहक ग्रिहीथा विचारे हिने अल्पवयातच शंभरहून अधिक गड-किल्ले आणि पर्वतशिखरे सर करून राज्यातील मुलींसमोर प्रेरणेचा नवा आदर्श उभा केला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात तिचा सत्कार करून गौरव केला.
विविध राज्यांतील गड-दुर्ग सर करताना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे ग्रिहीथाने यावेळी सांगितले.
@iAditiTatkare
Pashu Arogya Mitra Bringing Veterinary Care to Every Doorstep
Mobile animal healthcare services are benefiting 3,000+ farmers across 26 villages, while AI-powered advisory and training programs are empowering 5,000 farmers and creating new opportunities for rural women.
Together, we're building a healthier, stronger, and more sustainable dairy sector.
#PashuArogyaMitra #FarmerEmpowerment #DairyDevelopment #AnimalHealthcare #WomenEmpowerment #AIForFarmers #RuralDevelopment #DigitalAgriculture #Maharashtra
📌 अहिल्यानगरमधील ‘एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमा’चे उद्घाटन
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून राज्यातील पशुपालन व्यवसायाला भरभराटी आणण्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन
#पशूसखी#पशूआरोग्यमित्र#फार्मरचॅट
#कृत्रिमबुद्धिमत्ता
#PashuSakhi
#AI