#हिंगोली विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण 466 मतदारांपैकी 465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे मतदानाची टक्केवारी 99.79 टक्के इतकी नोंदविण्यात आली.
मतमोजणी दि. २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे होणार आहे.
@MahaDGIPR
#परभणी
विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण 466 मतदारांपैकी 465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी 99.79 टक्के इतकी नोंदविण्यात आली.
मतमोजणी दि. २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
@MahaDGIPR
अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्री तटकरे यांनी स्वतः पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी केली.
बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव वी. आर. ठाकूर, अवर सचिव सुनील सरदार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@iAditiTatkare
#पोषणआहार
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ‘एल निनोचा कोकणातील शेतीवर होणारा प्रभाव आणि उपाययोजना’ या विषयावर ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, २० जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत ‘न्यूज ऑन एआयआर’ (News On AIR) या मोबाईल ॲपवरही उपलब्ध होणार आहे. निलेश पवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेत शाश्वत शेती करण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती या मुलाखतीतून मिळणार आहे.
#जलसंधारण म्हणजे फक्त पाणी अडवणे नाही, तर जलसंधारण म्हणजे पर्यावरण संवर्धन, भूजल पुनर्भरण, शेतकऱ्यांना उत्पन्नाची सुरक्षा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करणे. जलसंधारणाच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. त्यासाठी शासनासह स्वयंसेवी संस्था व सामान्य नागरिक यांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. राज्यातील मृद व जलसंधारणाच्या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. चला पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
@SanjayDRathods
#जलसमृद्धमहाराष्ट्र
#पर्यावरणसंवर्धन
#भूजलपुनर्भरण
📍हॉटेल ताजमहल पॅलेस, कुलाबा, मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'आरबीएल बँक-एमिरेट्स एनबीडी' ऐतिहासिक भागिदारीनिमित्त कार्यक्रम
#LIVE https://t.co/sQdfuFCLZk
#इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन; तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. पाणी साठवणीची क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी शहराच्या #पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे विविध पर्याय तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या अभ्यासानंतर तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा आढावा घेऊन शासनाकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, इचलकरंजीचे महापौर, उपमहापौर; तसेच जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
📍हॉटेल ताजलँड्स एन्ड, वांद्रे, मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रमोशन' रोड शो...
#LIVE
https://t.co/Ylyfh8vNgT
राज्यातील #खनिकर्म व #ऊर्जा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या समवेत बैठक झाली.
महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य #खनिज महामंडळाला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली. या खाणी राज्य शासनाला मिळाल्यास दोन वर्षात कार्यान्वित करून २०३० पर्यंत उत्पादन सुरू करून पुढील काळात स्टील उत्पादन निर्यातदार म्हणून भारताला पुढे आणू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीमधील लोहखनिज देशातील सर्वाधिक दर्जेदार खनिजांपैकी एक आहे. त्यामुळे #गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल.यातून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल आणि लाखो रोजगार निर्माण होतील. गडचिरोलीमध्ये मोठ्याप्रमाणात लोहखनिज साठे असून चुनखडीसह पोलाद उद्योगासाठी आवश्यक इतर खनिजेही उपलब्ध आहेत. याशिवाय जवळपास कोळसा खाणी, मुबलक जलस्रोत आणि आवश्यक पायाभूत सुविधा असल्याने पोलाद उद्योगासाठी हा परिसर अत्यंत अनुकूल आहे.
महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक पोलाद परिसंस्थेमुळे चीनपेक्षाही कमी उत्पादन खर्चात पोलाद निर्मिती करणे शक्य होईल. अनेक मोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पोलाद उत्पादक कंपन्यांनी गडचिरोली परिसरात गुंतवणुकीत रस दाखविला असून हजारो एकर जमीनही संपादित करण्यात आली आहे. देशभरात सुमारे ५०० खाणींचा लिलाव झाला असला तरी त्यापैकी केवळ ५० खाणी कार्यरत आहेत. खाणींच्या लिलाव प्रक्रियेत आकारल्या जाणाऱ्या अत्यंत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत. त्यामुळे राज्य महामंडळामार्फत खाणी चालवल्यास खनिज उत्पादन वेगाने सुरू होऊ शकेल आणि स्टील उद्योगांना पारदर्शक पद्धतीने खनिज उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या खाणी राज्य महामंडळाला देण्यात आल्यास राज्य सरकार पारदर्शक पद्धतीने खनिजांचे वितरण पोलाद उत्पादकांना करू शकेल. यामुळे खाणी दोन वर्षांत कार्यान्वित करता येतील आणि देशातील पोलाद उत्पादनाला गती मिळेल. ओडिशा राज्य महामंडळाला देण्यात आलेल्या बॉक्साइट खाण क्षेत्राच्या धर्तीवर महाराष्ट्राने मागितलेले सुमारे १,३०० हेक्टर क्षेत्र मंजूर केल्यास राज्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी सकारात्मकता दाखविली; तसेच राज्यातील वीज निर्मिती कंपन्यांना कोळशाच्या गुणवत्तेबाबत होणारे वाद व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी स्वयंचलित (ऑटोमेटेड) नमुना तपासणी प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले.
यावेळी केंद्रीय खनिकर्म राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे, राज्याचे खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, केंद्रीय अतिरिक्त सचिव वीणा कुमारी, कोळसा मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव भूपिंदर ब्रार, राज्याच्या पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ डवले, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाळ, उपाध्यक्ष रविश कुमार सिंह यांच्यासह कोल इंडिया, वेस्टर्न कोलफिल्डचे अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@kishanreddybjp@satishdubeyy@DRPANKAJBHOYAR
देशात सात राज्यांमध्ये ज्ञान भागीदार म्हणून योजक संस्थेच्या सहयोगाने संसदीय संकुल विकास परियोजना राबवण्यात येते. जनजातीय आणि दुर्गम भागांतील सर्वांगीण विकासामध्ये संसदीय संकुल उपक्रमाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या परियोजनेचा विस्तार विधानसभा क्षेत्रापर्यत वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परियोजनेच्या महाराष्ट्रातील स्थिती संदर्भात आढावा बैठकीत सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसह शेती, सिंचन, रोजगार निर्मिती कौशल्य विकास आणि जीवनमान उंचावणाऱ्या विविध योजनांचा लाभ या भागांतील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील १० ते २० गावांचा समावेश करून त्याचा समूह तयार करावा. महिलांचे सक्षमीकरण, दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी वृक्षलागवड, जलसंधारण आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, युवकांसाठी बाजारपेठ व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या उपक्रमासाठी विविध विभागांच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येईल असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. हेमंत सावरा, माजी खासदार हिना गावीत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी,आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, ग्रामविकास विभाग सचिव डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, सेवावर्धिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश देगावकर, डॉ.गजानन डांगे, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding Mining and Energy generation in the presence of Union Minister G. Kishan Reddy.
Union MoS Satish Chandra Dubey, MoS Dr. Pankaj Bhoyar and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत खनिकर्म व ऊर्जा निर्मितीबाबत आढावा बैठक.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में एवं केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी इनकी प्रमुख उपस्थिति में खनन एवं ऊर्जा निर्मिति के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕛 12.05pm | 18-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.०५ वा. | १८-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis@kishanreddybjp@satishdubeyy@DRPANKAJBHOYAR@CoalMinistry
#Maharashtra #DevendraFadnavis #EnergySector
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the Sansadiya Sankul Vikas Pariyojana.
MP Dr. Hemant Savara, Founder and President of 'YOJAK Center for Research and Strategic Planning for Sustainable Development', Dr. Gajanan Dange, former MoS Bharati Pawar, former MP Heena Gavit and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय संकुल विकास परियोजनेसंदर्भात बैठक.
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, 'योजक सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट'चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. गजानन डांगे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी खासदार हिना गावीत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में संसदीय संकुल विकास परियोजना के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर सांसद डॉ. हेमंत सवरा, 'योजक सेंटर फॉर रिसर्च एंड स्ट्रैटेजिक प्लानिंग फॉर सस्टेनेबल डेवलपमेंट' के संस्थापक एवं अध्यक्ष डॉ. गजानन डांगे, पूर्व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पूर्व सांसद हिना गावीत एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
18-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | १८-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis@drhemantsavara@DrBharatippawar@DrHeena_Gavit
#Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment
#हिंगोली महाराष्ट्र विधान परिषद परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक निरीक्षक रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रास भेट दिली.
@CEO_Maharashtra@rahulg_ias@InfoParbhani