महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
Sunday Wisdom!राज्यात निवडणूक पर्वाचा उद्या शेवटचा टप्पा.जनहिताच्या मुुळ प्रश्नांऐवजी अनावश्यक,भावनिक,काल्पनिक व लक्ष भटकवणारे मुद्देच दोन्ही बाजुने प्रचारात आणले गेल्याने मतदारांमधील निरुत्सहामुळे मतदानाच्या टक्केवारीत घट दिसून आली. सुदृढ,निकोप व प्रगल्भ लोकशाहीसाठी हे चिंताजनक!
इंटरनेट बंद करून काय होणार? दडपशाही मार्गाने मराठ्यांचा आवाज बंद होणार नाही.
सरकारने बाजारचाळे बंद करावे.
सरकारने वाचळांना आवर घालावा, मी दोन दिवस टिका करणार नाही.
बीड मध्ये कोतवाल भरतीत हायटेक कॉपी करताना उमेदवार पकडला.
पेपर फुटीवर कडक कायदा केल्याशिवाय हे थांबणार नाही.
पण असा कायदा करण्यास सरकार का तयार नाही ?
हे एक मोठं कोडेच आहे.
महसूल विभागाने उपजिल्हाधिकारी संवर्गाची पदोन्नती आणि सेवा ज्येष्ठता यादी जाहीर केल्यास,
२०२४ मधील राज्यसेवा परीक्षेत फक्त महसुलमधील २५०+ जागा येतील
त्यात उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्या शेकडो जागांचा समावेश असेल
सरकारने तातडीने विषय मार्गी लावावा
@Dev_Fadnavis
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !
#कोश्यारी_हटाओ
Mahagencoमध्ये तब्बल ६वर्षांनी Assistant Engineer च्या जागा आल्या पण या महाराष्ट्र सरकारच्या भरतीमध्ये परप्रांतीय लोकांना संधी मिळून आमचा हक्क दुभागला जातोय विनंती आहे सर काहीतरी करा आता Mahagencoच्या भरतीसाठीDomicileअनिवार्य करा @CMOMaharashtra#MH_Domicile_compulsory_For_Genco
#AMVI_RTO_2022
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाच्या जाहिरात खूप वेळातून एकदा येते, तरी अजून जागा रिक्त असताना सुधा त्याचे मागणीपत्र अजून प्राप्त झाले नाही. माझी नम्र विनंती आहे की मागणीपत्र पाठवून जाहिरात प्रसिद्ध करावी, आभार 🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना न अडकवता ६-७ वर्षांपूर्वीच्या अबकारी कराइतकी कपात केल्यास देशातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे.
2020-2021 झालेल्या परीक्षांमध्ये रद्द प्रश्न संख्या...
राज्यसेवा पूर्व 2020 - 4
राज्यसेवा पूर्व 2021 - 8
राज्यसेवा मुख्य 2020 - 23
संयुक्त गट ब पूर्व 2020 - 5
संयुक्त गट ब पूर्व 2021 - 8
AMVI मुख्य 2020 - 5
स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य - 7
🔹 आयोगाचा प्रश्न थेट रद्द करण्याकडे कल
उमेदवारांच्या आक्षेपानंतर रद्द होणारे प्रश्न आणि बदलणारी उत्तरे ,दोन उत्तरतालिकां मधिल कालावधी, अंतिम निकालास होणारा विलंब,वस्तुस्थितीदर्शक प्रश्नांची वारंवारता व दर्जा यावर सर्वंकषआढावा घेऊन जाणीवपूर्वक प्रयत्नाअंती आयोगाकडून कायस्वरूपी तोडगा हाच उमेदवारांच्या उद्वेगावर ठोस उपाय