छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले याबद्दल समकालीन माहिती पॉंडिचेरीचा संस्थापक व फ्रेंच गव्हर्नर फ्रँकोइस मार्टिन याच्या वैयक्तिक डायरीमधून उपलब्ध होते. फ्रँकोइस मार्टिनच्या ‘MEMOIRES DE FRANCOIS MARTIN : FONDATEUR DE PONDICHERY (1665-1694)’ या रोजनिशीच्या तिसऱ्या खंडातील पंचविसाव्या प्रकरणात पान क्रमांक ३३ आणि ३९ वर याबाबतच्या घटनांचा उल्लेख आहे. मूळ लिखाण फ्रेंचमध्ये आहे.
पान क्रमांक ३३ वरील (मार्च १६८९) मधील उल्लेख:
Inquiétudes causées dans le pays par la mort de Sommagy Raja.
J'ai remarqué dans cette relation la mort de Sommagy Raja. Dans un temps où ce prince était encore plein de vie, les bruits courants et des lettres de Surate m'ont fait prendre le change; outre qu'on a été longtemps sans parler de lui, ce ne fut que dans ce mois qu'on eut avis de sa prise par la trahi-son de ses principaux brahmes qui l'engagèrent dans une embuscade des troupes du Mogol dont le commandant était d'intelligence avec eux. Cette nouvelle mit l'alarme dans la province; les officiers cherchaient à se cantonner et à faire chacun ses affaires; cette confusion jointe au voisinage des roupes du Mogol furent les signaux des désordres qui y sont arrivés depuis.
पान क्रमांक ३९ वरील (एप्रिल-मे १६८९) मधील उल्लेख:
Ram Raja successeur de Sommagy Raja
Le gouverneur général de la province de Gingy eut avis de l'exaltation de Ram Raja, deuxième fils de Sivagy Raja, à la souveraineté des états de ce prince, au préjudice d'un fils de Sommagy Raja que ce prince avait laissé. Les brahmes dont il aurait été trahi portèrent leur parti à cette exaltation, de crainte que s'ils y élevaient le fils du défunt et [celui-ci] venant en âge, qu'il ne se vengeât sur eux de la mort de son père. Cependant ce jeune prince avait aussi un parti qui le portait; ce qui émut [souleva] une guerre cruelle dans l'État, qui causa la révolution que je marquerai dans la suite. Le gouverneur général de la province de Gingy et les autres officiers princi-paux, presque tous brahmes, portèrent le parti de Ram Raja et firent des réjouissances publiques de son exaltation.
वरील दोन्ही नोंदींचे स्वतः भाषांतर करून पहा. या दोन्ही नोंदीपैकी पहिल्या नोंदीतून हे स्पष्ट होते की छत्रपती संभाजी महाराजांना प्रमुख ब्राह्मण अधिकाऱ्यांनी मोगल सैन्याधिकाऱ्याशी संगनमत करून पकडून दिले. तर दुसऱ्या नोंदीतून हे स्पष्ट होते की छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा (थोरले शाहू) वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवतील या भीतीने सर्व ब्राह्मण अधिकाऱ्यांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवण्यासाठी पाठिंबा दिला आणि ते छत्रपती झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराजांना शेकडो वर्षे कथा, कादंबरी, चित्रपट, नाटके इत्यादी माध्यमातून बदफैली दाखवणारे लोक आता ‘छावा’ चित्रपटानंतर छात्या बडवून शिर्के कुटुंबाला व्हिलन म्हणून प्रोजेक्ट करू पाहत आहेत. पण इतिहासाची कागदपत्रे काही वेगळेच सांगत आहेत.
प्रशांत कोरटकर सारखे विशिष्ट समाजातील टिनपाट लोक वास्तव इतिहास समोर आणणाऱ्या इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमक्या देत आहेत. त्याहून गंभीर म्हणजे ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून गलिच्छ वक्तव्ये करत आहेत. २२-२३ वर्षांपूर्वी वाढलेले जेम्स लेनचे भूत आणि त्याची विकृती उकरून काढत आहेत. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन राजरोस धमक्या देत आहेत. अजूनही यांच्या पोटात छत्रपती कुटुंबाविषयी किती मळमळ आहे, याचे हे उदाहरण आहे. संभाजी ब्रिगेड अशाच प्रवृत्तींच्या विरोधात आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडबद्दल आदर वाटतो.
नव्या दमाच्या इतिहास अभ्यासकांनी वास्तव इतिहास समोर आणण्यासाठी कार्यरत रहावे.एक ना एक दिवस खोट्या इतिहासाचां आणि त्याच्या समर्थकांचा घडा भरणार आहे या सगळ्या प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.
@Jindagidotcom
सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. अरुण नाईक सांगत आहेत ते काळजीपूर्वक ऐका, पहा आणि मग अंमलात आणा.
मेंदूचं विस्मरण आणि अन्य व्याधींना दूर ठेवण्यासाठी, Vertigo, Tinnitus, Dizziness, Headache Or Brain Fog पासून आराम मिळवा. फक्त तीन मिनिटांचा व्यायाम सकाळी उठल्याबरोबर आणि झोपण्यापूर्वी किंवा लंच ब्रेकमध्ये देखील करा.
संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशन वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात सहभागी झालो व उपस्थितांशी संवाद साधला.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, भारताच्या लोकसभेचे सन्माननीय सभासद छत्रपती शाहू महाराज, ज्यांचा आपण विश्वभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला ते श्रीयुत राजेंद्र पवार, विनोद शिंदे, सतीश मगर. हा सन्मान सोहळा आयोजित करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि संभाजी ब्रिगेड या संस्थेची स्थापना करून गेली सत्तावीस वर्ष इतिहास, सांस्कृतिक, सामाजिक या सगळ्या क्षेत्राच्या बरोबर अर्थकारणाचा विचार हा जनमानसामध्ये रुजवण्याबद्दलची काळजी ज्यांनी घेतली ते प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले निरंजन टकले, चंद्रकांत झटाले अन्य सगळे मान्यवर निमंत्रित आणि सहकारी बंधू भगिनींनो.
आज दिवसभर राज्यस्तरीय अधिवेशन आपण या ठिकाणी आयोजित केलं. विविध प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत त्यातून मार्ग काढून आत्मविश्वासाने उभी झालेली ही पिढी तयार करणं यासंबंधी अत्यंत मोलाची कामगिरी संभाजी ब्रिगेडच्यावतीने गेली अनेक वर्षे केली जाते. आज याठिकाणी अनेकांची भाषणं आपण सकाळपासून ऐकली. ज्ञानेश महाराव या ठिकाणी बसलेत त्यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं. अनेक प्रकारची आव्हानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. नेहमीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्या आव्हानांवर मात करण्याच्या संबंधीची हिंमत ही दाखवण्याची आज अत्यंत गरज आहे.
आपण काही क्षेत्रामध्ये काम करतो, शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करतो, आपल्यातले काही सहकारी व्यवसायामध्ये गुंतलेत आणि त्याशिवाय अनेक क्षेत्रांमध्ये जाण्याची आवश्यकता तुम्हा लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या वतीने सतत केला जातो. हा देश शेतीप्रधान आहे. आपण याठिकाणी सन्मान करत असताना शिंदेंचा सत्कार केला. त्यांनी कंपनी काढली जिचं नाव सह्याद्री आणि आज सह्याद्री कंपनी, माझी अगदी आग्रहाची सूचना तुम्हाला आहे. कधी नाशिकला गेलात तर सह्याद्रीवर चक्कर जरूर टाका. काही शेतकरी एकत्र येतात आणि शून्यातून एक कंपनी तयार करतात. शेती उत्पादन वाढवतात त्या उत्पादनावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था करतात आणि देशातील नव्हे तर जगाच्या बाजारपेठेमध्ये आपण काही करू शकतो या प्रकारचा इतिहास घडवतात. हा इतिहास घडवल्यानंतर, कर्तुत्वदृष्टी ज्यांनी दाखवली ते तुम्हा सगळ्यांच्यापैकीच एक होते. त्यांची पार्श्वभूमी काही टाटा बिर्लाच्या घरातली नव्हती. पण शेतीच्या क्षेत्रामध्ये आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन आपण काही वेगळं करू शकतो या प्रकारचा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला आणि तो अंमलात आणला. आपण नेहमी सांगतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतेय आणि देशातील शेती कमी व्हायला लागली. आपण विकासाचे अनेक प्रकल्प हातामध्ये घेतो,धरणं बांधतो, औद्योगिक वसाहती करतो, नागरीकरण वाढतं आणि या सगळ्याला शेतीची जमीन जात असते.
अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये महामार्ग तयार करण्याची भूमिका सरकारने स्वीकारली आणि त्या महामार्गात सुद्धा शेवटी जमीन जाते ती शेतीची जमीन जाते. याचा अर्थ शेतीची जमीन कमी होते आणि दुसऱ्या बाजूनं शेतीवरचा बोजा हा वाढत चाललेला आहे. ज्यावेळेला 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वातंत्र्य झालो त्यावेळेला देशाची लोकसंख्या 30 ते 32 कोटी होती. आज ती तिप्पट चौपट वाढलीये. ऐवढा प्रचंड बोजा शेतीवरती पडला. हे क्षेत्र कमी झालं आणि मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याची भूमिका ही करण्याची स्थिती आपल्या सगळ्यांवरती आली. यात यश मिळवायचं असेल तर आधुनिकत्येला दुर्लक्षित करून चालणार नाही. शेतीच्या क्षेत्रामध्ये बी बियाणं असेल आणि या पद्धती असतील याच्यात प्रचंड बदल होतायत, संशोधन होतंय आणि त्या संशोधनाचा आधार घेऊन आपण शेतीची उत्पादकता वाढवणं आणि शेती करत असताना त्याला जोडधंद्याची जोड देणं या गोष्टी केल्याशिवाय शेतीचं अर्थकारण हे खऱ्या अर्थाने व्यवहारी होणार नाही.
आत्महत्या हा शेती आणि शेती व्यवसायाला लागलेला एक गंभीर रोग आहे. ही आत्महत्येची स्थिती बदलायची असेल तर उत्पादकता वाढवली पाहिजे, विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे, तयार झालेल्या मालावर प्रक्रिया करण्याचा विचार हा करायला पाहिजे आणि हे सगळं करत असताना जगाची बाजारपेठ कशी प्राप्त करायची याच्यामध्ये सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यादृष्टीने एक प्रकारची विचारी नवी पिढी ही तयार कशी करता येईल आणि ती तुम्ही केली तर तुमच्यापासून तिचा बोध घेऊन तुमचा शेजारी, तुमचा मित्र तोही त्या रस्त्याने कसा जाईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तरच हे चित्र बदलणार आहे.
आज या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा तुम्ही सन्मान केला शेतीच्या क्षेत्राच्या योगदानाच्याबद्दल माझ्या मते ही फार चांगली गोष्ट तुम्ही केली. सह्याद्रीचा उल्लेख मी केला. सतीश मगर याठिकाणी आहेत. त्यांनी पूर्ण माहिती सांगितली नाही. आज मगरपट्टा हा देशाच्या समोर एक उदाहरण झालंय. आज मगरपट्टा, एकेकाळी उसाची शेती करणारा हा सगळा परिसर. मला आठवतंय की आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला आम्हा लोकांच्यापुढे राजकारणाचे धडे देण्याच्यासाठी आणि साथ देण्याच्यासाठी जे अनेक वरिष्ठ आणि वडीलधारी आमचे सहकारी होते त्याच्यामध्ये आज सतीश मगर आहेत त्यांचे कुटुंबीय सुद्धा अण्णासाहेब मगर हे आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक होते. पण उत्तम शेती करून नंतरच्या काळामध्ये पुणे शहर वाढायला लागलं. शहर वाढतंय तशी शेती करण अवघड होतय. काम करण्यासाठी लोक मिळत नाहीत, उत्पादन खर्च वाढतो, आणि शेती ही दिवसेंदिवस संकटात नेण्याचं काम करतेय. आता हे नागरिकरण आहे याची नोंद घेऊन आपण बदल केला पाहिजे हा विचार त्या ठिकाणी सतीश मगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यात आला. स्वतः बाहेरून शिक्षण घेऊन आले आणि आल्यानंतर जमिनीचे तुकडे करायचे आणि ती जमीन विकायची आणि त्यातून आलेल्या पैशाने आयुष्य जगायचं या प्रकारची सरंजामी पद्धती शहरांच्या जवळच्या अनेक शेतकऱ्यांच्या मध्ये असते पण सतीश मगरांनी वेगळा दृष्टिकोन ठेवला. त्यांनी एक नवीन शहर निर्माण करू शकतो का? या दृष्टिकोनातून पावले टाकली आणि जेवढे शेतकरी त्या भागातले होते त्या सगळ्यांची एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या मार्फत आधुनिकतेचा आधार घेऊन त्या जमिनीचं नियोजन योग्य करून एक नवीन औद्योगिक नगरी ही उभी केली. ती औद्योगिक नगरी ही वेगळी नगरी आहे. आताच जग हे आयटीचे जग आहे आणि त्या आयटीसाठी उत्तम प्रकारची सुविधा देणारं एक काम या नगरीच्या मार्फत करू शकतो हा दृष्टिकोन त्यांनी घेतला आणि त्याची उभारणी केली. आज हजारो लोकांना त्या ठिकाणी काम मिळतं. मला आनंद आहे की महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्याबाहेरचे सुद्धा तरुण आज त्याठिकाणी येतात, कष्ट करतात आणि देशाच्या संपत्तीत भर टाकतात. आणि ते जे शेतकरी जमीन विकून थोडेबहुत पैसे मिळाले असते त्याऐवजी त्या संस्थेचे ते संचालक सभासद झाल्यामुळे आज दरवर्षाला त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न आज त्या शेतीच्या या संस्थेच्या पद्धतीतून मिळत.
हे इथेच थांबलेलं नाही. शेतकऱ्यांच्या घरातील मुली त्या दुसरा काही व्यवसाय करू शकतील का? हजार लोकांना काम मिळाल्याच्यानंतर त्या हजारो लोकांचा चहापान अन्न हा खर्च हा दिवसेंदिवस वाढतच असतो मग त्याच्यासाठी कोणीतरी बाहेरून येण्याच्याऐवजी आपल्याच कुटुंबाच्या मुली या क्षेत्रामध्ये उतरल्या आणि काही व्यवसाय करू शकल्या तर त्यावर प्रोत्साहन दिल. त्यात त्या यशस्वी झाल्या. नवीन पिढी ही आणखीन काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असते पण त्याच्यासाठी जिथं हजारो लोक काम करतात त्या हजारो लोकांना वाहनाची व्यवस्था लागते आणि म्हणून गाड्या एकत्र करून व्हेईकलची किंवा प्रवासाची सुविधा ही देण्याच्यासाठी काही करता येईल का त्या दृष्टिकोनातून ट्रान्सपोर्टची व्यवस्था त्यांनी केली आणि आज मगरपट्टा हे अतिशय उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी करतंय आणि नव्या पिढीला एक प्रकारचं आत्मविश्वासानं आपण हे करू शकतो हे चित्र त्यांनी निर्माण केलं.
राजेंद्र पवारांनी आज कृषीच्या क्षेत्रामध्ये काम केलंय. बारामती ॲग्रो नावाची कंपनी काढली गेली आणि त्या कंपनीच्या मार्फत अनेक गोष्टी हातामध्ये घेतल्या. त्यामधून शेती आणि शेतीवर आधारित अन्य काही व्यवसाय असतील. आज दुधाचा धंदा वाढत असल्याच्यानंतर त्या जनावरांच्या साठी खाद्याच्या साठी निर्मितीची गरज असेल अशा अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टीची निर्मिती करून आपण कारखानदारी काढू शकतो या प्रकारचा आदर्श त्यांनी केला. यातून नव्या पिढीला एक प्रकारचं प्रोत्साहित करण्याचं काम त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी हे सांगितलं एवढ्यासाठी की आपण थोडीशी चाकोरी बदलली पाहिजे. नेहमीचा आपला जो व्यवसाय आहे तो करूया पण सगळ्यांना तिथे गुंतवायचं का? सगळ्यांची शक्ती त्या ठिकाणी लावायची का? याबद्दल फेरविचार करण्याची वेळ आली आहे.
आज जगातील अनेक देशांमध्ये भारतीय बघायला मिळतात. प्रामुख्याने शीख समाज बघा, तमिळनाडू मधील मद्रासी घटक बघा, गुजरात मधील गुजराती बघा. अमेरिकेमध्ये तुम्ही गेलात तर रस्त्याने जात असताना जेवढे पेट्रोलचे पंप असतील आणि छोटे रेस्टॉरंट असतील त्याच्यात जास्तीत जास्त मालकी ही भारतातून आलेल्या लोकांची आहे. हे सगळे लोक प्रामुख्याने गुजरात या राज्यातून त्या ठिकाणी गेले आहेत. ब्राझीलमध्ये आपण गेलात तर उत्तम शेती करणारे शेतकरी भारतीय त्या ठिकाणी मिळतात. विशेषतः तामिळनाडू आणि पंजाब, हरियाणा या भागातून ते आलेले असतात. याचा अर्थ एकच आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवणे आणि कसलाही प्रकारचा उद्योग आम्ही कष्टाने करू शकतो, यशस्वी होऊ शकतो त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ही जर तुम्ही ठेवली तर शंभर टक्के यशस्वी होता, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
संभाजी ब्रिगेड यांचे प्रामुख्याने अलीकडचे काम त्यांच्या पुण्याच्या एका बैठकीमध्ये मी गेलो होतो. अर्थकारण या विषयावर त्यांचे आता लक्ष जास्त आहे. नव्या पिढीने अर्थकारणाला महत्त्व द्यायला हवे. उद्योग किंवा व्यवसाय काही ना काहीतरी करणे आणि त्यातून पुढे जाणे व ते करत असताना आपल्यासारखे जे अनेक नवे तरुण जे येऊ इच्छितात त्यांना प्रोत्साहन करणं वेळेप्रसंगी मदत करणं हा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर ही सगळी तरुण पिढी जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक हातांना काम देण्याची त्यांची तयारी राहिली पाहिजे. आम्हाला काम देणारे तयार करायचे आहेत आणि ते काम देणाऱ्यांची पिढी तयार करण्यासाठी एक दृष्टिकोन, विचारधारा ही बदल्याची आवश्यकता आहे. मला समाधान एका गोष्टीचे आहे की, प्रवीण दादा आणि त्यांचे सहकारी गेले काही वर्ष या कामात अधिक लक्ष द्यायला लागले आहेत. काम देणारा तरुण कसा तयार होईल? यामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ही भूमिका घेत असताना तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करणं. ते काम करतात तसेच काम आपापल्या भागामध्ये वाढेल कसं व इतरांना आपण प्रोत्साहित कसे करू? त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवू? या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतली पाहिजे. ते काम तुम्ही करावं एवढीच माझी अपेक्षा आहे.
आज शिवछत्रपतींच्या नावाने आपण अनेक गोष्टी सांगतो. शिवछत्रपतींनी समाजातील अठरापगड जातींना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी हे राज्य उभे करताना दृष्टिकोन ठेवलं. मी अनेकदा सांगतो रयतेचे राज्य उभी करण्याची त्यांनी भूमिका घेतली. रयतेच्या हातामध्ये हे राज्य जर चालवायचे असेल तर अठरापगड जातींना बरोबर घेणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना दृष्टी देणे व त्यांच्यामार्फत राज्य उभे करणे हे काम शिवाजी महाराजांनी केले. हे सगळं करताना समाजातील ज्या दृष्ट प्रवृत्ती आहेत याचा किंचितही संबंध असता कामा नये. संभाजी ब्रिगेड यासाठी अत्यंत मोलाची कामगिरी करेल याचा मला विश्वास आहे, त्यासाठी मी त्यांना अंतःकरणापासून शुभेच्छा देतो व त्यांचे अभिनंदन करतो.
मंडई जवळच असलेल्या प्यासा हॉटेल जवळ रात्रीच्या वेळी पोलिसांची लबाडी सुरू आहे.
चिरीमिरी खाण्यापेक्षा @PuneCityTraffic ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांवर कारवाई करणार का??
व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रकरण निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण पुण्यात असे सर्रास प्रकार सुरू आहेत. #Pune
पवारसाहेब, वसंतदादा व
कांदाभजी !
— विश्वास पाटील
पवार साहेबांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला का, या मुद्द्याची चर्चा करण्यापूर्वी त्या काळचे नाशिकराव तिरपुडे नावाच्या काँग्रेसविरांचे व्यक्तिमत्व तपासणे आवश्यक आहे. तेव्हा नाशिकरावांचे थेट दिल्लीशी म्हणजे गांधी घराण्याची संबंध असल्यामुळे ते महाराष्ट्र #काँग्रेस मधील सर्वानाच फाट्यावर मारायचे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री असूनही मुख्यमंत्री वसंतदादानाही जुमानयचे नाहीत. त्यांच्या मुजोरीमुळेच तेव्हा इथली काँग्रेस खदखदत होती. त्याला पवार साहेबांच्या बंडाने वाट मोकळी करून दिली होती.
त्या बंडाला त्यावेळी म. टा. चे संपादक गोविंद तळवळकर व माधव गडकरी यांच्यासारख्या पत्रकारांनीही इंधन पुरवले होते. त्या काळातला एक अत्यंत गमतीदार व बोलका किस्सा मला आठवतो. महाराष्ट्राची 1985 ची विधानसभा निवडणूक प्रचंड गाजली होती. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री #वसंतदादा होते. तर त्यांच्या विरोधात पुरोगामी लोकशाही दलामार्फत #शरद_पवार साहेबांनी खूप कडवे आव्हान उभे केले होते.
त्या निवडणुकीपूर्वी दीड- दोन वर्षे तर पवार साहेबांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या दरम्यान दादा उघडपणे बोलायचे की, “शरदराव महाराष्ट्रभर अक्षरशः पायाला पाने बांधून हिंडतायेत.”
पवारांच्या समाजवादी काँग्रेस सोबतच जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट असे सगळे एक झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण इतके ढवळून निघाले होते की, निवडणुकीचा नेमका निकाल काय लागतोय याची सर्वत्र प्रचंड उत्सुकता होती.
मतमोजणी दिवशी तर दादांनी मंत्रालयात न जाता वर्षा निवासस्थानी बसूनच निकाल ऐकावेत असे त्यांच्या निकटवर्तीनी दादांना सुचवले होते. पण मैदानातून मागे न हटण्याची दादांची वृत्ती. त्यामुळे निकाला दिवशी स्वच्छ पांढरे कळीदार धोतर व सदरा घालून दादा नेहमीपेक्षा आधीच मंत्रालयात सहाव्या मजल्यावर दाखल झाले होते.
तेव्हा मंत्रालयामध्ये जाण्यासाठी पासाची गरज नसायची. एखाद्या मंदिरासारखे मंत्रालय सर्वांना एक मुक्तद्वार असायचे. सकाळी साडे अकराच्या दरम्यान निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले. पण सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि पुलोदमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली. कधी हे पुढे तर ते मागे अशी दिवसभर आकड्यांची शर्यत सुरू होती. तेव्हा विशेषतः महाराष्ट्रातील मध्यमवर्गीयांमध्ये पवार साहेबांची इमेज ही एखाद्या हिरो पेक्षा अधिक उंच व जबरदस्त होती.
प्रसारित निकालाच्या आकड्या मधून पुलोद जेव्हा काँग्रेसला घाम फोडू लागली. तेव्हा मंत्रालयात मोठे आश्चर्य घडले. मंत्रालयातील कर्मचारी आपापल्या मजल्यावर बाहेरच्या बाल्कनीत येऊन उघडपणे “शरद पवार जिंदाबाद”, “शरद पवार जिंदाबाद” अशा घोषणा देऊ लागले. त्यामुळे तर वातावरण अधिकच गरम झाले.
पण दादांचा अनुभव, आवाका आणि सहनशीलतेची ताकद प्रचंड होती. त्यामुळे मंत्रालइयीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एखादी ॲक्शन घ्यावी वगैरे असे कोणतेच पोरकट पाऊल त्यांनी टाकले नाही. ते निमुटपणे आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या दालनात बसून होते. त्यादिवशी त्यांच्यासोबत दिवसभर नाशिकचे विनायकदादा पाटील गंभीरपणे हजर होते.
सायंकाळचे सात वाजले. दोन्ही गटांमध्ये तोवर 60 ते 65 आमदारांचे जे बलाबल होते, त्यामध्ये अंतर पडत गेले. काँग्रेसचा रथ वेगाने विजयाकडे दवडू लागला. या निवडणुकीत काँग्रेसला 161तर पवारांच्या समाजवादी काँग्रेसला 54 व पुलोदला एकूण 104 जागावर समाधान मानावे लागले.
सायंकाळच्या त्या विजयी वाऱ्यात वसंतदादा विनायकराव पाटलांना म्हणाले “चल विनायक, आता आपण कांदाभजी खाऊया.” दादांचे सहाय्यक मंत्रालय कॅन्टीनकडे जाण्याची धावाधाव करू लागले. तेव्हा दादांनी सर्वांना मला मोकळ्या हवेत खुशीने कांदाभजी खायची आहेत असे सांगून टाकले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा मंत्रालयातून मॅजेस्टिक आमदार निवासाच्या आजूबाजूला आला. तिथेच फुटपाथवर काही खुर्च्या टाकल्या गेल्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी बाजूने उभे होते. पण दादा नावाचा मातीतला मराठमोळा माणूस मोठ्या आनंदाने फुटपाथवर बसून आपल्या आवडत्या कांदा भज्यांचा आस्वाद घेत होता.
त्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांची कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही. त्या दरम्यान दादा मंत्रालयासमोरच्या बैठ्या बंगल्यात B 4 मध्ये राहत असत. पुढे पवार साहेब सुद्धा काँग्रेसमध्ये आले. तेव्हा रामकृष्ण मोरेंसह मदन बाफना, वल्लभ बेनके असे अनेकजण दादांना भेटायचे. पक्षातील दादांच्या वारसदारा बद्दल चर्चा व्हायच्या. परंतु दादांचे मन इतके विशाल होते की, त्यांच्या मनातली पवार साहेबांच्या बद्दलची कटूता केव्हाच कमी झाली होती. “काँग्रेसचे भावी नेतृत्व शरदरावच करू शकतात” असे दादा आपल्या सहकाऱ्यांना उघड सांगायचे.
दादांच्याच मंत्रिमंडळात पहिल्यांदा शिवाजीराव देशमुख व #विलासराव_देशमुख हे दोघेही एकावेळी गृहराज्यमंत्री झाले होते. असे अनेक पाणीदार नेते दादांनी घडविले.
दुर्दैवाने दादा घराण्याचे छुपे व कातिल दुश्मन हे सांगली जिल्ह्यातीलच असून ते दादासाहेबांच्या काळापासूनच खूप अक्टिव्ह आहेत. ते गंजलेल्या खिळ्यासारखे ऐनवेळी त्या घराण्याच्या टाचेत घुसण्याचा आसुरी आनंद लुटत असतात.
दादांचे पुतणे व सहकारातील एक उमदे नेतृत्व विष्णूअण्णा पाटील यांच्यावर दादांचे विशेष प्रेम होते. विष्णूअण्णा अतिशय कर्तबगार पण सर्वांना सोबत घेऊन जाणारे निगर्वी व्यक्तिमत्व होते. परंतु दादा हयात असतानाच आपल्या जिल्ह्यातीलच मंडळींनी “माझ्या विष्णू सारख्या देवगुणाच्या पोराचा विधानसभेला ठरवून दगाफटका करावा आणि झडग्यांनी डाव साधावा, याचे मला पोरा खूप वाईट वाटते,” अशा गावरान शब्दात दादांचे दुःख मी ऐकले आहे.
अण्णांचा पराभव हा दादांना स्वतःचाच पराभव वाटला होता. दादा घराण्याच्या भूमीगत शत्रूंनी विष्णूअण्णांची मानखंडना केली नसती, तर वसंतदादा आणखी काही वर्षे नक्कीच जगले असते, असे मला मनापासून वाटते..
25 -30 वर्षा मागे पवार साहेबांच्या आजूबाजूने फिरणारी व स्वतःचा अजिबात चेहरा नसणारी अनेक फाटकी माणसेही पुढे बलाढ्य झाली. गबरू बनली.. पुढे पुढे करत गोड गोड बोलणाऱ्या अनेक बोलघेवड्याना पवारांनी लिफ्ट दिली. त्यासाठी बहुजन समाजातील अनेक गुणीजनांवर एक प्रकारे अन्याय घडला. पण ही गोडबोली आणि चमको मंडळीही सहज बिडी फुकावी तशी साहेबांना सोडून निघून गेली.
कालाय तस्मै नमः
—#विश्वास_पाटील
@PawarSpeaks@NCPspeaks @News18lokmat @saamTVnews@ABPNews@zee24taasnews@LokshahiMarathi
#vishwaspatil #authorcommunity #SharadPawarNCP #SharadPawar #Vasantdadapatil #politicalhistory #MaharashtraPolitics
३ बँक अकाऊंट असले म्हणजे नियोजन व्यवस्थित होतं असं मला वाटतं👇
मी सध्या तरी हे असं 👇 करतोय
१) Incoming अकाऊंट
( SBI च ) -
फक्त पगार यावा ह्यासाठी आहे..ह्यातून कोणताही खर्च करायचा नाही.
६ महिन्याचा पगारा इतक्या..ह्याचं अकाउंटला २ एफडी केल्यात.
(इमर्जन्सी फंड)
सहसा ही एफडी कधी मोडायचीच नाही.. तात्पुरती गरज असेल तर ही तारण ठेऊन लगेच ऑनलाइन ॲप वरूनच कर्ज मिळतं ते घेऊन टाकायचं..!
एफडीच जे व्याज असतं त्यावर १% जास्त इतकं व्याज द्यावं लागतं अश्या लोनला आणि जेव्हढे दिवस वापरू तितक्या दिवसांचच व्याज द्यावं लागतं..!
अगदीच गरज असेल आणि माझ्यासारखं क्रेडिट कार्ड नसेल तर हा👆 पर्याय वापरता येतो..!
२) Outgoing अकाऊंट -
सगळी बिलं..सगळा खर्च ह्यातून करायचा.
ह्यात पगाराच्या २०% पेक्षा जास्त रक्कम कधीही ठेवायचीच नाही.
UPI ला आणि इकडे तिकडे चोहीकडे कोणीही फोन नंबर जरी मागितला तरी ह्या अकाउंटला जोडला आहे तोच द्यायचा..!
ह्या अकाउंटला जोडलेल्या e mail च पण तेच..बाहेर ह्याला त्याला द्यायला ह्या अकाउंटला जोडलेलाच e mail ID द्यायचा.
आता कोणी फसवयाला जरी आलं तरी ह्याचं नंबरवर कॉल येणार..कारण हा सगळीकडे गेलाय..आणि समजा अनवधानाने चूक झालीच काही तर जास्तीत जास्त २०% पैसे जातील.(स्टॉपलॉस 😅)
(हे मी axis च वापरतो.. त्यांचं ॲप..UPI च ॲप आणि वेबसाईट तिन्ही मला तरी भारी वाटल्या म्हणून..!)
३) गुंतवणुकीचा अकाऊंट -
Incoming अकाउंटला पगार आला रे आला की ह्या अकाऊंटवर आधी ठरवलेले % पैसे पाठवून द्यायचे..आणि राहिलेल्या पैशात महिना काढायचा..!
ह्याला मी तरी म्हणेन - २ डिमॅट जोडलेले असावे..!
१) गुंतवणुकीचा डिमॅट -
ह्यात घेतलेले शेअर्स हे सहसा मार्केट पार उतरलेलं असेल तेव्हा किंवा एखादा शेअरच खूप उतरलेला असेल तेव्हा वर्ष २वर्ष घेत राहावे..! (उदा ३०₹ चा टाटा पॉवर किंवा ३-४०० ला इन्फोसिस etc अशा संधी साठी )हे अकाउंट फक्त शेअर्स घेण्यासाठी..ह्यातले शेअर्स सहसा विकू नयेच..! Ideally हे अकाउंट बँक backed ब्रोकर कडे असावं.
२) ट्रेडिंगच डिमॅट - हे जो कोणी स्वस्त किंवा चांगली ऑफर देणारा ब्रोकर आहे त्याच्याकडे असावं..!
(माझं तरी गुंतवणुकीचा अकाउंट Kotak मध्ये आहे !)
आणि हां..शेवटचं..
जमतं असेल तर..खर्चाचं अकाउंट सोडून बाकीचे सगळे ॲप एखाद्या फोल्डर मध्ये पासवर्ड देऊन बंद करून ठेवायचे !
( Btw हे मी तरी करत नाही..पण माझे काही मित्र करतात ज्याना sales etc साठी रात्री बित्री एकट्याने ट्रॅव्हल करावं लागतं )
हे माझं सध्याचं नियोजन आहे..तुमचं कसं काय planning असतं ?!
तुम्ही काही वेगळं किंवा कोणती युक्ती वापरत असाल तर शेअर करा ना..✌️
#StockMarketअभ्यास
#मराठी
#म
90 टक्के लोकं क्षमता असुनही यशस्वी होण्यापासुन वंचित राहतात कारण ते प्रक्रियेपासुन अनभिज्ञ असतात. साधी सोपी सरळ प्रक्रिया खालीलप्रमाणे
1) आपल्याला काय करायचे आहे हे निश्चित करा आणि मग त्यासाठीचा नित्यक्रम निर्माण करा, म्हणजे केव्हा उठायचं, काय करायचं, कसं करायचं वगैरे समजा तुम्हाला अमुक किलोपर्यंत वजन कमी करायचे असेल तर झोपण्या उठण्याच्या वेळा, व्यायामाच्या वेळा आणि प्रकार, आहार आणि तो कधी आणि किती याचे प्रमाण याचा नित्यक्रम ठरवून आचरणात आणावा लागेल.
3.25 cr Viewers, ~50000 Cr of media rights, 14 Editions, and an 11 billion $ Valuation!
Let’s look at some mind-Boggling numbers associated with the Indian Premier League (IPL)
A thread, Do retweet :)