“My son left the village to become an officer. He was supposed to return in a red-beacon car, but he returned in an ambulance.”
These words from Prathamesh’s mother should haunt all of us.
Across rural India, young people leave their villages and move to cities with one dream: to clear competitive exams, become officers and lift their families out of poverty.
But that dream comes at a huge cost. Rent, food, coaching and years of preparation already put enormous financial pressure on families with limited means. Add paper leaks, repeated delays and exam irregularities, and the system makes an already difficult journey unbearable.
For a rural student, every cancelled or compromised exam is not just another inconvenience. It means more months away from home, more money their family may not have, and another blow to a dream they have sacrificed so much for.
Prathamesh’s death is a failure of a government that could not give its youth even the hope to live.
#MPSC ची तयारी करणारा विद्यार्थी फक्त परीक्षा देत नसतो तर तो आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे, पैसा, वेळ आणि असंख्य स्वप्नं पणाला लावत असतो.
दिवस-रात्र अभ्यास करून, अनेक अडचणींवर मात करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मेहनत जर पेपरफुटी, गैरप्रकार आणि अनियमिततेमुळे धुळीस मिळत असेल, तर हा केवळ परीक्षेचा प्रश्न नाही. हा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे!
आज पुण्यात विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी आणि शिक्षक रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला आहे. त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत.
त्यांच्या मेहनतीला न्याय मिळालाच पाहिजे.
परीक्षा व्यवस्था पारदर्शक आणि विश्वासार्ह झालीच पाहिजे.
दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे!
विद्यार्थ्यांच्या या न्याय्य लढ्यात आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सरकारने आश्वासनांपलीकडे जाऊन तातडीने ठोस आणि वेळबद्ध निर्णय घ्यावा.
#pune
INDIA STUDENTS PROTEST COUNTRY....
MPSC students have flooded the streets of Pune, protesting against irregularities and corruption in the examination.
EDUCATION SYSTEM FAILED EVERYTHING...!!!
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तयारीला लागा…
सोमवारी तुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा….
आज रस्त्यावर उतरला नाही तर कायम रस्त्यावर रहावं लागेल आणि घोटाळे करणारे महत्त्वाच्या पदांवर जाऊन तुमच्या डोक्यावर बसतील.
म्हणूनच जिंकण्यासाठी हक्काचा लढा लढू आणि न्याय मिळवू…!
#विद्यार्थी_हक्काचा_लढा
@RahulAsks आपण एक उत्तम पत्रकार आणि आपल्या पत्रकारितेत आपण कधीही एक पत्रकार म्हणून " Judgemental" होत नाहीत, दोन्ही बाजू जनतेच्या समोर ठेवणे हाच एक पत्रकार म्हणून तुमचा वेगळा गुण आहे. सध्या #MPSC मधील पेपरफुटी बाबत आपण करत असलेले episode सर्वजण बघत आहेतच.
👉 परंतु आपणास एक विनंती आहे की मागील अनेक वर्षांपासून "ऑनलाईन" परीक्षेत म्हणजेच #TCS #IBPS मध्येही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेले आहेत, नुकत्याच झालेल्या पुणे मनपा आणि @MMRDAOfficial परीक्षेत देखील मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला आहे , सर्व अभियांत्रकी उमेदवारांच्या वतीने आपणास विनंती आहे की कृपया आपण याबाबत देखील एक स्वतंत्र बातमी द्यावी किंवा अभियांत्रिकी उमेदवारांची बाजू मांडवी.
पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेतील कथित घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे व इतर पदाधिकाऱ्यांसमवेत मनपा आवारात मैदानात उतरून आंदोलन केले आणि विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचा आवाज बुलंद केला.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रामाणिक विद्यार्थी पारदर्शकतेसाठी लढा देत असताना प्रशासन मात्र अजूनही पूर्णपणे ढिम्म आहे.
अहोरात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; पारदर्शकता हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे.
परीक्षेतील गैरव्यवहार व प्रश्न बाहेर आल्याचे उघड झाल्यावर केवळ तीन उमेदवारांवर थातुरमातूर कारवाई करून प्रशासनाला हात झटकता येणार नाहीत.
परीक्षा केंद्रातील सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे अपयशी ठरली आणि या गैरप्रकारामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, हे जनतेसमोर आलेच पाहिजे.
या संपूर्ण प्रकरणाचे तात्काळ डिजिटल ऑडिट करून सीबीआय (CBI) किंवा विशेष तपास पथकाद्वारे (SIT) निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे.
संशयाच्या सावटाखाली घाईघाईने नियुक्त्या करून हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न प्रशासनाने कदापि करू नये.
भरती प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी सदरील परीक्षा त्वरित रद्द करून अत्यंत पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेतलीच पाहिजे.
आम्हाला कोणाची भीक नको, तर स्वतःच्या कष्टाचा आणि गुणवत्तेचा हक्क हवा असून प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल.
#pmc #pmcje #punecity
#SPPU #PuneUniversity #AISA #StudentMovement #StudentRights #NehaBora #HigherEducation #Pune
#AdivasiStudentProtest #ManjariPune #TribalRights #StudentsMovement #PuneNews #pune #punenews
#chhatronkigoonj #rahulgandhi #Pune #maharashtra #cockroach #cockroachjantaparty #upsc #Aisa #mpscpune #mpsc #Mpsc #MPSC #maharashtra #neet #jnu #sppu
#MPSC पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आणि नाराजीची भावना आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अनेक विद्यार्थी, सर्व क्लासचालक आणि अभ्यासिका चालक यांना धमकावल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांना विशेषतः पोलीस आयुक्तांना एकच सांगणं आहे, धमक्या द्यायच्या असतील तर कोयता गँगला द्या, बनावट दारू विक्रेत्यांना द्या!
आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाद करू नका, अन्यथा ही बाब महागात पडेल. हे सर्व स्वाभिमानी मराठी विद्यार्थी आहेत आणि आम्हीही त्यांच्यासोबत आहोत, हे पोलीस प्रशासनाने विसरू नये!
@Dev_Fadnavis@CPPuneCity
#MPSC_विद्यार्थी #पुणे_पोलीस
#MMRDA#MPSC#PMC
पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांचा शासनाच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केवळ समित्या नेमून चालणार नाही. निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी CBIमार्फत किंवा मा. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, ही विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे.
केंद्राचा पेपरफुटीविरोधी कायदा महाराष्ट्रात केव्हा लागू होणार? याचे शासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी बोलणारे मंत्री, आमदार व खासदार या गंभीर प्रकरणात किती ठोस पाठपुरावा करतात, हे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी पाहत आहेत.
आश्वासनांपेक्षा आता विद्यार्थ्यांना कृती, पारदर्शकता आणि न्याय हवा आहे!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra@Shivsenaofc@INCMaharashtra@NCPspeaks@ShivSenaUBT_@VBAforIndia
मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे येत असून कुंपणच शेती खात असल्याचं स्पष्ट झालं आहे. जसजशी नवीन माहिती समोर येत आहे तसतसा विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास उडत चालला आहे, त्यामुळे आपण आता मैत्री बाजूला ठेवून बघ्याची भूमिका न घेता तत्काळ अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून चांगल्या व्यक्ती त्या जागी नेमण्यात याव्यात. पोलीस करत असलेला तपास समाधानकारक असला तरी केवळ एक दोन नावापुरता तपास मर्यादित न ठेवता आम्ही जी शेकडो नावे दिली आहेत त्यांचा देखील सखोल तपास होणे गरजेचे आहे, तरच खरे सूत्रधार असलेले मोठे मासे जाळ्यात अडकतील.
(अध्यक्षांचा राजीनामा झाल्याशिवाय आमचा हा लढा थांबणार नाही.)
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी
कनिष्ठ अभियंता पदभरतीतील गैरप्रकाराविरोधात विद्यार्थ्यांचे पुणे महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन; शिवसेनेचा आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा..!!
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परीक्षा देणारे विद्यार्थी आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर समोर आंदोलन केले. गुणवत्तेच्या आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांनीच भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे पुरावे पुणे महानगरपालिका प्रशासनासमोर मांडले. या पुराव्यांच्या आधारे पुणे महानगरपालिकेने तीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर केवळ तीनच विद्यार्थी दोषी असल्याचे प्रशासन कोणत्या अधिकृत तपासाच्या आधारे सांगत आहे, हा गंभीर प्रश्न आहे.
एकीकडे गैरप्रकाराचे पुरावे समोर येऊन गुन्हे दाखल झाले असताना दुसरीकडे उर्वरित परीक्षार्थींना सेवेत रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. प्रश्नपत्रिका नेमकी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली किंवा किती जणांना त्याचा फायदा झाला नाही, याबाबत पुणे महानगरपालिकेकडे अधिकृत आणि अंतिम स्वरूपाचा स्पष्ट निष्कर्ष नसताना संपूर्ण भरती प्रक्रिया पुढे रेटली जात असेल, तर या भरतीची पारदर्शकता आणि विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात येते. प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरचा वाटोळा करण्याचा अधिकार पुणे महानगरपालिका प्रशासनाला नाही.
या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने यापूर्वीच आवाज उठवला असून, या संपूर्ण प्रकरणाची माहिती माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असून, कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेण्यात यावी, ही शिवसेनेची स्पष्ट मागणी आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या हक्कासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असून, प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास अधिक तीव्र अंदोलन करू.
@PMCPune@navalMH
#punecity #shivsena #PMC #students #peparleak
PMC JE भरतीतील गैरप्रकार चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहेत, तरीही नियुक्त्यांची घाई का? चौकशीपूर्वी नियुक्त्या म्हणजे पुरावे, प्रक्रिया आणि हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्यायाशी तडजोड!
परीक्षा रद्द करा, स्वतंत्र व सखोल चौकशी करा आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्या. ही केवळ परीक्षा नाही, हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील. ✊
@RahulGandhi@INCMaharashtra@INCIndia
#PMC_JE_Scam #PMCJE #StudentsJustice #RojgarNyay
A delegation of Maharashtra Youth Congress met students protesting PMC Junior Engineer exam paper leak in Pune.
Their hard work cannot be sacrificed to a broken examination system.
Cancel the compromised exam, investigate the leak and punish those responsible, no cover-up, no excuses.
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता भरतीतील गैरप्रकार सिद्ध झाल्यावरही घाईघाईने नियुक्त्या का?
या घोटाळ्याची सखोल चौकशी करून परीक्षा रद्द करा, अन्यथा विद्यार्थ्यांचा हा लढा अधिक तीव्र होईल.
प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत आमचा पूर्ण पाठिंबा!
#पुणे_महापालिका#भरती_प्रक्रिया
परीक्षा तुमची,यंत्रणा तुमची,सुरक्षा तुमची आणि देखरेखही तुमची—मग PMC JE भरतीतील गैरप्रकाराची जबाबदारी कोणाची?
विद्यार्थी आज PMCसमोर आंदोलनाला बसले आहेत.तरीही प्रशासनाची शांतता संतापजनक आहे
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याची किंमत प्रशासनालाही मोजावी लागेल
@navalMH@prajytnair
The fraudulent #PMC_JE_Scam should be cancelled
To uphold transparency, fairness, & public trust in the recruitment system, it is imperative that the examination be cancelled & a fresh, fair examination be conducted through a transparent process
-@Dhananjay4INC@INCMaharashtra