नवे मैत्रीपर्व, नव्या भारताची जागतिक भरारी! 🇮🇳 🇺🇿
उझबेकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओलिय दाराजाली दोस्तलिक’ हा माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांना प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पंतप्रधान मोदीजींना मिळालेला हा ३५वा आंतरराष्ट्रीय राज्य सन्मान म्हणजे भारताच्या प्रभावी परराष्ट्र धोरणाची आणि त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची जागतिक पातळीवरील पोचपावती आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगाच्या पटलावर स्वतःचे स्थान अधिक भक्कम केले असून, विविध राष्ट्रांशी विश्वास, सहकार्य आणि परस्पर सन्मानाचे संबंध दृढ होत आहेत.
भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक मैत्रीला अधिक व्यापक आणि मजबूत करण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. हा सन्मान केवळ एका नेत्याचा गौरव नसून, भारताच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचा आणि दोन्ही देशांच्या दृढ होत चाललेल्या मैत्रीचा गौरव आहे.
#India #Uzbekistan #PMModiInUzbekistan
@narendramodi
📍छत्रपती संभाजीनगर
🇮🇳 हर घर तिरंगा अभियान - तिरंगा रॅली 🇮🇳
छत्रपती संभाजीनगरच्या भूमीत आज देशभक्तीचा जोश आणि राष्ट्रप्रेमाची ऊर्जा अनुभवायला मिळाली. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली.
हातात तिरंगा आणि मनात देशाविषयी अभिमान घेऊन हजारो युवक या रॅलीत सहभागी झाले. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
युवा शक्तीचा हा उत्स्फूर्त सहभाग देशाच्या प्रगतीसाठी त्यांच्या सकारात्मक आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेची साक्ष देणारा आहे.
#TirangaRally #HarGharTiranga #Maharashtra #ChhatrapatiSambhajinagar #GirishMahajan
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
आज माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा २०२७ तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. ₹३४,७३२ कोटींच्या विकास आराखड्यातील सर्व कामे निर्धारित वेळेत, उच्च दर्जाची आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून तयारीला अधिक गती देण्यावर भर देण्यात आला.
१२ कोटींहून अधिक भाविकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता, डिजिटल व्यवस्था आणि सुरक्षा यांचे नियोजन प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भव्य, दिव्य आणि संस्मरणीय करण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण क्षमतेने कार्यरत आहोत.
या बैठकीस उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवाळ, आमदार श्री. राहुल ढिकले, आमदार सौ. सीमा हिरे, आमदार सौ. देवयानी फरांदे, आमदार सौ. सरोज आहिरे, आमदार श्री. हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त श्री. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त श्री. शेखर सिंह, महापौर सौ. हिमगौरी आडके, महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
#Maharashtra #KumbhMela2027 #Nashik #DevendraFadnavis
#GirishMahajan
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@Narhari_Zirwal@PharandeDevyani@MlaSeemaHiray@AdvRahulDhikale@SarojAhire113@khoskar@himgauriaher
📍 नाशिक
आज नाशिक येथे शहरातील पूरस्थिती तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा आढावा घेण्यासाठी नाशिक महानगरपालिकेत विशेष बैठक घेण्यात आली.
पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती, पाणी साचण्याची समस्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, संबंधित विभाग आणि प्रशासनाने सतर्क राहून नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना दिल्या.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात विविध विकासकामे आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, या कामांमुळे तसेच पावसामुळे रस्त्यांची झालेली अवस्था लक्षात घेता नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना कामांचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, खड्डे पडलेल्या मार्गांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले.
रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्री-कास्ट स्लॅब, पॉलिमर तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात यावी तसेच, पूरस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने व तत्परतेने कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आमदार सौ. देवयानी फरांदे, आमदार श्री. राहुल ढिकले, आमदार सौ. सीमा हिरे, महापौर सौ. हिमगौरी आडके-आहेर, मनपा आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
#Nashik #NashikRain #RoadDevelopment #NashikKumbhMela #GirishMahajan #नाशिक
@PharandeDevyani@AdvRahulDhikale@MlaSeemaHiray
E25 इंधनाचा निर्णय शास्त्रीय अभ्यासातूनच!
E25 इंधनाचा वापर व्यापक स्तरावर करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात येत आहे. वाहनांच्या इंजिनवर होणारा परिणाम, इंधन यंत्रणेची दीर्घकालीन कार्यक्षमता, प्रवासातील सुरक्षितता आणि विविध वाहन मॉडेल्समध्ये त्याचा वापर कितपत योग्य ठरेल, याची विविध स्तरांवर चाचणी सुरू आहे.
या सर्व प्रक्रियेतून मिळणाऱ्या निष्कर्षांचे तज्ज्ञांकडून विश्लेषण केल्यानंतरच भविष्यातील दिशा निश्चित केली जाईल. देशाचे इथेनॉलविषयक धोरण हे कोणत्याही घाईगडबडीवर नव्हे, तर वैज्ञानिक पुरावे, वस्तुनिष्ठ माहिती आणि तज्ज्ञांच्या निष्कर्षांवर आधारित असेल.
#E25
📍नाशिक
रस्ते अपघातात नाशिकचे रहिवासी श्री. निलेश प्रल्हाद कोतकर यांचे अकाली निधन झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे.
आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, आवश्यक त्या सर्व मदतीसाठी सदैव सोबत असल्याचे आश्वासित केले.
हा दुःखद आघात सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
#Nashik #नाशिक
📍नाशिक
आज नाशिक येथे भारतीय जनता पक्षाची उत्तर महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक राष्ट्रीय सहसंघटनमंत्री श्री. शिवप्रकाशजी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस आ. श्री. राहुल ढिकले, आ. सौ. सीमा हिरे, आ. सौ. देवयानी फरांदे, आ. श्री. मंगेश चव्हाण, आ. ॲड. माधवी नाईक यांच्यासह जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
#NorthMaharashtra #Nashik #BJP #भाजपा #GirishMahajan
@BJP4Maharashtra@shivprakashbjp
समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक पाऊल !
संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही समान नागरी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा महायुती सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती श्रीमती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे.
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026 #Uniform_Civil_Code
@Dev_Fadnavis
नामा म्हणे आम्ही कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगन्माजी ॥ 🚩
वेदकाळ ते आजचा आधुनिक काळ... आपल्या कीर्तन परंपरेचा हा थक्क करणारा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या.
#waari#waree#वारी#पंढरपूर#dindi#वारकरी_संप्रदाय