India at UN | Day 2
Participated in a meaningful discussion with Brazil’s Deputy Representative to the United Nations, Mr. Norberto Moretti, along with fellow Indian Members of Parliament.
We discussed the important role of the @UN in today’s uncertain world and the need to reform the United Nations Security Council (UNSC) to make it more inclusive and effective.
#IndiaAtUN #UnitedNations #India #GlobalEngagement #SanjayDinaPatil
डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने डोंबिवली येथील डीएनसी शाळेच्या मैदानात आयोजित शारदीय नवरात्र उत्सवाला मनसे नेते श्री. राजू पाटील, मनसे शहराध्यक्ष हर्षद पाटील, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांचे उत्सवात स्वागत करून त्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार राजेश मोरे, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#navratrotsav #Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra #Navratri
📍 #यवतमाळ |
#अमरावती शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी आज यवतमाळ येथे विराट प्रचारसभा पार पडली. याप्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांना किरण सरनाईक यांना प्रचंड बहुमताने निवडून आणत महायुतीचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
किरण सरनाईक यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, हा त्यांचा ध्यास असल्याचे याप्रसंगी नमूद केले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर २००५ संदर्भातील प्रश्न मार्गी लावणे, प्रचलित धोरण लागू करणे तसेच वेतन अनुदान १०० टक्के करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही याप्रसंगी दिली.
सरनाईक यांच्या कार्यपूर्ती अहवालाचे कौतुक करत त्यांनी टीईटीसह शिक्षकांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले. ५६ तालुक्यांतील कामाचा उल्लेख करत किरण सरनाईक यांच्या निधीचा प्रत्येक पैसा शाळा आणि शिक्षणावर खर्च करण्याच्या भूमिकेचेही यावेळी स्वागत केले.
महायुतीचे सरकार हे उमेदवार म्हणून किरण सरनाईक यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून शिक्षकांनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन याप्रसंगी केले. २३ तारखेला मतपत्रिकेवर पसंतीक्रमांक एक म्हणून किरण सरनाईक यांना मतदान करा आणि २७ तारखेला विजयाचा गुलाल उधळू असे आवाहन करून महायुतीच्या उमेदवाराच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
यवतमाळ येथील सभेनंतर स्थानिक नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन आई जगदंबेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, आमदार भावना गवळी, आमदार सतीश चतुर्वेदी, आमदार राजाभाऊ तोडसाम, माजी आमदार निलय नाईक, नामदेवराव ससाणे, संजय बोदकुलवार, संदीप दुर्वे तसेच #शिवसेना भाजप महायुतीचे आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #Amravati #Yawatmal #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc
📍 ठाणे |
"स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहता, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत!"
आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने भारताला संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात महासत्ता बनवणारे, तरुणांचे प्रेरणास्थान, ‘मिसाईल मॅन’ आणि भारताचे माजी राष्ट्रपती #भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.
आजचा दिवस हा संपूर्ण देशभरात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. डॉ. कलाम यांनी ज्ञानाची आणि वाचनाची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत ठेवली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि निरंतर शिकत राहणे हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल.
यावेळी आमदार सुहास कांदे, #शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेनेचे राज्य संघटनप्रमुख व माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
#APJAbdulKalam #Bharatratna #वाचन_प्रेरणा_दिन #Shivsena #EknathShinde #Maharashtra
कुडाळ तालुक्यातील 'नाईक टायर्स शोरूम' च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली.
यावेळी श्री. राहुल एस. नाईक आणि ॲड. श्रीनिवास व्ही. नाईक यांना नवीन व्यवसायाच्या शुभारंभानिमित्त शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
श्रीगोंद्यातील पोलीस भरतीच्या हजारो विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद!
श्रीगोंदा येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. यावेळी खासदार मा. श्रीकांतजी शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांसाठी ४०० मीटर ट्रॅकचे मैदान, एसटी प्रवासात सवलत, SRPF मध्ये महिलांना संधी, आरोग्य सुविधा आणि मैदानी चाचणीतील मूलभूत सोयी यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
'मिशन खाकी'च्या माध्यमातून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही यावेळी स्पष्ट केले.
@shivsenaofc
#missionkhaki #policebharti #shivsena #shrigonda #maharashtra
🗓 १५ ऑक्टोबर २०२६ | 📍घोडबंदर रोड
श्रद्धेचा गंध, गरब्याचा ताल आणि आई अंबेच्या भक्तीने भारलेले वातावरण!
प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि जी एम नवरात्री महोत्सवाच्या वतीने आयोजित ‘नवरात्री महोत्सव २०२६’ मध्ये उपस्थित राहून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई अंबेचे दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा केली.
प्रसिद्ध गायक दिव्य कुमार यांच्या सुरेल गीतांवर घोडबंदर रोडवरील नागरिकांसोबत पारंपरिक रास-गरब्याचा आनंद लुटला. भक्ती, उत्साह आणि एकोप्याने सजलेला हा सोहळा आपल्या समृद्ध संस्कृतीची आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाची सुंदर अनुभूती देणारा ठरला.
@mybmc
N. S road, साई मंदिर,मुलुंड ( प.)सागर बार समोरील गटार तुडुंब भरून वाहत आहे, त्यामुळे जवळपास असलेल्या नागरिकांना रोगाना सामोरे जाऊ लागत आहे,त्वरित हे चॉकअप झालेले गटार साफ करावे.
काल श्री. स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मुंबईतील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव ह्या उत्सवाच् औचित्य साधून ठाणे महानगर पालिकेच्या माजी महापौर, ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. मीनाक्षीताई शिंदे ह्यांनी बाप्पाच्या चरणी उपस्थिती दर्शवली व गणरायचं दर्शन घेतल.