📍 #ठाणे |
उबाठा गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासह गुलाबचंद दुबे, सुनील चौबे, ब्रिजेश मौर्य, दशरथ प्रजापती, प्रवीण दुबे, धनंजय गुप्ता यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. तर उबाठा युवा सेनेचे इम्रान शेख, सलाउद्दीन, इरफान शेख, शिरान शेख, अलीम शेख यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
दुबे यांनी आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांवर वाटचाल करणाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आपल्यासाठी 'राष्ट्र प्रथम' असल्याचे नमूद करत तोच विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता खऱ्या शिवसेनेचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दुबे यांनी काम करावे अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
यावेळी युवासेना सरचिटणीस राहुल कनाल हेदेखील उपस्थित होते.
#Shivsena #Mumbai #Thane #EknathShinde #Maharashtra
Shivsena - शिवसेना
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज सुरु आहे. मतदारांना मनापासून सांगावसं वाटतंय, तुमचं प्रत्येक मत महत्वाचं आहे.... देशात लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार हे ठरवणारं आहे! विचारपूर्वक मतदान करा!
गद्दारांची बाळासाहेबांच्या पवित्र स्थळाला स्पर्श करण्याची लायकी नाही 😡😡
नरेश म्हस्के ठाकरे कुटुंबाबद्दल बोलताना लायकीत राहून बोला.
शिवतीर्थावरून तुम्हाला आमच्या शिवसैनिकांनी पळवून लावले ते योग्यच केले.
@AUThackeray@SardesaiVarun@OfficeofUT@rautsanjay61@shivsena
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली!
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे.
आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे.
निषेध !
सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी - २) या पदाची सरळसेवा भरती...
संपूर्ण माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://t.co/vGzkyVa6aO या संकेतस्थळावर भेट द्या...
#BMC#bmcupdates#recruitment