अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
खूप विचार केल्यावर समजत काँग्रेसने काय केल ?
जेव्हा तुमच्याकडे बैलगाडी होती, जेव्हा तुमच्या गावात स्कूलबस येत नव्हती,
तेव्हा काँग्रेसने highway वर पैसा ओतण्यापेक्षा गावा गावात प्राथमिक शाळा उभा करून तुम्हाला साक्षर केल.
विकास हा काळाच्या गरजेनुसार केला जातो,
दिखावा म्हणून नाही
इतिहासाच्या साक्षीने हि सोनेरी सुरवात.. हे असणार गाण.. अजय अतुल यांनी दिलेल संगीत.. याचा नक्किच चित्रपटात चित्रपटगृहात प्रत्येकाला अभिमान वाटेल..❤️
#राजा_शिवाजी..🙏🚩
मी कुणाला कळलोच नाही…
पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायम राहिलो
हा शब्द नाही, ही भावना आहे…
पक्षप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची साधी, पण मनाला भिडणारी ओळ.
संघर्ष, संयम आणि निष्ठेचा प्रवास करताना स्वतःची जाहिरात न करता जनतेसाठी काम करणारा नेता म्हणजे उद्धवसाहेब.
त्यांची शैली शांत असली तरी विचार ठाम आहेत, आणि हाच खरा नेतृत्वाचा बाणा आहे.
#उद्धवठाकरे
#शिवसेना
#महाराष्ट्रराजकारण
#जनतेचानेता
#साहेब
#मराठी
#महाराष्ट्र
#नेतृत्व
#जयमहाराष्ट्र
सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले..
-:श्री बुधभूषणम्
स्वराज्यसंकल्पक , महापराक्रमी , शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन ! 🙏
#महाराजसाहेब 👑🚩
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !
असो . . .
मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो !
भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.
दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे.
ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?
संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.
आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.
या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !
राज ठाकरे ।
जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात.
मग,
रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे?
खते, बियाणे,
निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे?
आणि
आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?
2 भावांच्या सोबत येण्याने जर कुणा बड्या पक्षाला अश्व लागणार असेल आणि महाराष्ट्राची अस्मिता जर जोपासली जाणार असेल तर मी ह्या दोन्ही भावांसोबत.!
Quote if you agree.
#महाराष्ट्र#अस्मिता
देशाचे पहिले कृषीमंत्री डॅा.पंजाबराव देशमुख यांचे नाव अमरावती विमानतळाला द्यायला हवे. त्यांचे मूळगाव पापळ हेदेखील बेलोरा विमानतळाजवळच आहे. त्यामुळे स्थानिक सामाजिक-राजकीय हेवेदावे बाजूला सारून डॅा.पंजाबराव देशमुखांसारख्या निष्काम कर्मयोगी लोकनेत्याचं नाव अमरावती(बेलोरा) विमानतळाला देणे सयुक्तिक ठरेल!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Thank you so much
@RohanMagdum7 दादा...
for lifetime free access to LinkedIn Learning...!! 😊
खूप खूप धन्यवाद! तुमचं काम खरोखरच उत्तम आहे, मनापासून आभार! ❤🙏
नमस्कार..!
आपल्यापैकी कोणाला LinkedIn Learning चा ऍक्सेस आवश्यक असेल, तर कृपया मला DM करा.
टीप: हे मी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देत आहे. तुम्ही LinkedIn Learning वरील कोणताही कोर्स शिकण्यासाठी हे वापरू शकता.
एकूण ५ व्हाउचर उपलब्ध आहेत, त्यामुळे ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांनी लवकर संपर्क साधा.
धन्यवाद..!