रितू जी,
किशोरी ताईना सल्ले देण्यापेक्षा तुम्ही तुमची कार्यचौकट काय आहे ते समजून घ्या.
महापौर झाल्यावर वॉटर-मीटर-गटर चे प्रश्न न सोडवता गृहखात्यात लुडबुड करण्यात तुमचा वेळ गेला आहे ते आधी बघा.
@TawdeRitu@kishoripednkar
भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका..
शेतकरी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ हौसेने घेत नाही. गरज असल्यामुळे तो अर्ज करतो. कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाखो शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने अर्ज केले. मात्र ज्या दिवशी लाभार्थ्यांची लॉटरी जाहीर झाली, त्याच दिवशी त्रुटी पूर्तीसाठी आवश्यक असलेली वेबसाईट बंद होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करता आली नाहीत..
वेबसाईट उपलब्ध नसताना त्रुटीची पूर्तता करायची कशी? प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का? अखेर याच कारणावरून तब्बल ९४ टक्के अर्ज रद्द करण्यात आले. हा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय असून सरकारने स्वतःची चूक शेतकऱ्यांच्या माथी मारली आहे..
सरकार मोठमोठ्या घोषणा करते, जाहिरातींमध्ये योजनांचा गाजावाजा करते; पण प्रत्यक्ष लाभ देण्याची वेळ आली की नियम, अटी आणि तांत्रिक अडचणींच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडते..
सरकारने लाखो शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्याऐवजी त्यांना पुन्हा संधी द्यावी, त्रुटी पूर्तीसाठी वेबसाईट सुरू करावी आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने कृषी यंत्रांचा लाभ द्यावा, अशी सरकारकडे मागणी केली..
#पावसाळी_अधिवेशन #विधानभवन #VidhanBhavan
#monsoonsession2026
पुणे–पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणात 22 जणांचा मृत्यू झाला, मात्र पोस्टमॉर्टेम झालेल्या केवळ 9 मृतांच्या कुटुंबांनाच मदत मिळाली असून उर्वरित कुटुंबांना आर्थिक मदत कधी मिळणार?स्थानिक नगरसेवकांनी 10 वेळा तक्रारी करूनही पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुर्लक्ष केले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हातभट्टीचे अड्डे सुरू होते.
215 किलो मिथेनॉल जप्त झाले असून भिवंडी पर्यंत याचे कनेक्शन आहे. बोगस आधार कार्डच्या माध्यमातून मिथेनॉल मिळविण्याचे गंभीर रॅकेट उघड झाले आहे.
या प्रकरणात सामील असलेल्या वरिष्ठ पोलीस व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, तसेच सर्व मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आज विधान परिषद सभागृहात केली.
“Serious questions over the missing 4 kg silver brick donated by Shiv Sena for the Ram Mandir construction in Ayodhya.
Uddhav Thackeray ji had generously contributed ₹1 crore + this sacred silver brick in the presence of thousands of Shiv Sainiks & saints. Yet, years later, no receipt or update from the Trust.
Where has it gone? Time for full investigation & accountability!
#RamMandir #ShivSena”
तालिका सभापतींनी एका आयएएस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा निर्णय दिला. मात्र त्यांनी दिलेला निर्णय पाळला गेला नाही. देवेंद्र फडणवीस ह्यांनी मुख्यमंत्री म्हणून जे वक्तव्य केलं ते पाहता म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतोय. ह्याविषयीच रुलिंग आता द्यायचं नसेल तर ते राखून ठेवा. पण ह्याचे रुलिंग व्हायला हवे.
- भास्कर जाधव, आमदार
@_BhaskarJadhav
लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्या भेटीनंतर दिल्ली येथे खासदार अरविंद सावंत यांच्यासह मी पत्रकारांशी संवाद साधला.
"खासदार मशाल चिन्हावरच निवडून आले होते." संविधानाच्या चौकटीतच न्यायनिवाडा व्हावा; अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे मांडल्याची माहिती पत्रकारांना दिली.
#ShivSenaUBT #Mashal #Delhi #LokSabha #LokSabhaSpeaker #MaharashtraPolitics #Democracy #Constitution #AnilDesai
कृष्णा डोंनगावकर व देवयानी डोनगावकर (छत्रपती संभाजी नगर)यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे,
पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे,
Big win for Mumbai!
Impact of our Press Conference and appeal!
After our press conference yesterday the Improvement Committee of the BMC has referred back all the proposals of:
🚨 Privatising the @mybmc ’s blood banks (always have been free and with BMC)
🚨 Converting the Recreation Grounds to Residential plots - one for an exhibition centre, one for an industrialist’s house and one for a builder.
We opposed this last week and we opposed this today.
⚠️ Today that these proposals have been sent back, they have to be scrapped and the BMC must ensure that public spaces and services have to remain public.
⛔️ As the opposition, we will keep opposing EVERY such move of the BMC to privatise open spaces, public schools and services.
I’m thankful to all those who supported this view of ours for Mumbaikars!
रक्तदान म्हणजे पुण्याचं कर्म आपण समजतो, ह्याच पुण्याच्या कामाची किंमत मिंधे-भाजप करायला निघाले आहेत.
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी सामान्य मुंबईकरांना केलेले हे आवाहन!
@AUThackeray
🚩 सिद्धिविनायक मंदिर येथील नर्दुल्ला टॅंक मैदानावर प्रस्तावित कॉरिडॉर पार्किंगला विरोध! 🚩
प्रिय नागरिक बांधवांनो,
सिद्धिविनायक मंदिर परिसरातील नर्दुल्ला टॅंक मैदानावर कॉरिडॉर पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. हे मैदान परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी एक महत्त्वाचे खुले खेळाचे व विरंगुळ्याचे ठिकाण आहे.जर या ठिकाणी पार्किंग प्रकल्प उभारला गेला, तर:मुलांसाठीचे खेळाचे मैदान नष्ट होईल.
परिसरातील मोकळी जागा कमी होईल.नागरिकांना व्यायाम, फिरणे व सामाजिक उपक्रमांसाठी उपलब्ध असलेली जागा गमवावी लागेल.या मैदानाच्या संरक्षणासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी होऊन आवाज बुलंद करण्यात आला.
पीकविमा कंपनीचा शेतकरीविरोधी डाव..
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२५ चा पीकविमा मिळू नये, यासाठी पीकविमा कंपनीकडून आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. आधीच नैसर्गिक संकटे, अवकाळी पाऊस आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना, आता विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीवर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे..
सध्या पीकविमा कंपनीने भरपाईचा विषय केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे नेला असून, त्यामुळे आणखी महसूल मंडळे पीकविम्यापासून वगळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत मिळण्याची शक्यता असून, हा प्रकार अन्यायकारक आणि संतापजनक आहे..
राज्य सरकारने कंपनीधार्जिणे नियम तयार करून विमा कंपन्यांना मोकळे रान दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. लाखो रुपये हप्त्याच्या स्वरूपात भरूनही वेळ आली की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मदतीपासून वंचित ठेवले जात आहे..
याबाबत मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण दि. २५ एप्रिल २०२५ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली होती की, पीकविमा मंजुरीसाठी लावण्यात आलेला तांत्रिक उत्पादनाचा निकष तात्काळ रद्द करावा आणि केवळ प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच नुकसानभरपाई निश्चित करावी..
परंतु राज्य सरकारने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नसल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून, हजारो नुकसानग्रस्त शेतकरी त्यांच्या हक्काच्या पीकविम्यापासून वंचित राहत आहेत. सरकारच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे..
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पीकविम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणतीही लढाई मागे हटून लढली जाणार नाही..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray@OmRajenimbalkr@ShivsenaUBTComm
#पीकविमा #cropinsurance #शेतकरी #gamers #dharashiv #धाराशिव
पक्षफुटी असो की पेपरफुटी... सगळीकडे नाव महाराष्ट्राचे आहे!
लाज वाटू द्या जरा...
प्रल्हाद कुलकर्णी , मनिषा मांढरे हे प्राध्यापक कुणाच्या आशीर्वादाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी मध्ये पोहोचले? याचे उत्तर मिळालं पाहिजे
त्या मोटेगावकर चे व्हिडिओ तर आज पहिल्यांदा पाहिले.. मला तर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या डॉक्टरांचीच भीती वाटायला लागलीय.
किती उथळ.. पोखरून टाकली आहे सगळी शिक्षण व्यवस्था!!!
📍पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालय, वरळी
पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालय, वरळी येथील अपुऱ्या सुविधा, रखडलेली दुरुस्तीची कामे तसेच अन्य गैरव्यवस्थेबाबत शिवसेना नेते व आमदार @AUThackeray जी यांच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार आज रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देत विविध विभागांची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. तसेच उपचारार्थ दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.
यावेळी रुग्णालय प्रशासनासोबत चर्चा करून रुग्णांना दर्जेदार व योग्य आरोग्यसेवा मिळावी, प्रलंबित दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत तसेच आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
'मर्मभेदी बाळासाहेब' विषयावर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'वसंत व्याख्यानमाला, नाशिक' द्वारे आयोजित विशेष व्याख्यानमालेतील व्याख्यान...
नक्की ऐका, आणि आपल्या प्रतिक्रिया देखील द्या.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
@OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm