पश्चिम रेल्वेकडून मुंबई विभागातील सर्व परवानाधारक कॅटरिंग स्टॉल व युनिटमधील कर्मचाऱ्यांसाठी १० सप्टेंबर २०२६ पासून एकसमान ड्रेसकोड अनिवार्य करण्यात आला आहे. लाल पोलो टी-शर्ट, काळी पँट, एप्रन आणि काळे पादत्राणे यांसोबत ड्युटीच्या वेळी डिस्पोजेबल हातमोजे व हेअरनेट वापरणेही बंधनकारक असेल. स्वच्छता, शिस्त आणि खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
#WRUpdates
Dear Piyush Ji, Tremendous effort you were putting in throughout the Japan visit. Speaking to each entrepreneur individually and giving each of them so much of time is an extremely demanding task, you made in your speeches at each conference were different and relevant to the audience. At every place, you brought in some local context, which made your remarks even more engaging. Your references to the Panasonic story and Toyota’s motto were particularly well-placed and presented very effectively. Congratulations to you for all your efforts. @PiyushGoyal@BJP4India@lokmat@LokmatMumbai
पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी एस्केलेटरचा डाउनटाइम कमी करण्यासाठी नवीन यंत्रणा राबविण्यात येत आहे. आपत्कालीन स्टॉप बटण दाबल्यानंतर एस्केलेटर पुन्हा सुरू होण्यासाठी लागणारा वेळ सुमारे २० मिनिटांवरून आता केवळ २ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे बिघाडाच्या वेळी प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
या सुविधेमुळे प्रवाशांना सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
#WRUpdates
म्हणजे पालिकेने झोपेच सोंग घेतलं आहे की खरोखर झोपला आहे हेच समजत नाही. १५ ऑगस्ट ला बातमी आणि ट्विट करून जर आज तीच परिस्थिती असेल तर कसली मोहीम राबवत आहे.
@mybmc@AshwiniBhide मॅडम
देश स्वतंत्र होऊन ८० वर्षे झाली पण पालिका पुथपथ स्वतंत्र करण्यात अद्यापही अक्षम आहे. चालायला जागा कुठे आहे तुम्हीच सांगा. पालिका नेमकी करते तरी काय, लक्ष आहे तरी कुठे.
@mybmc@mumbaimatterz@mybmcWardGS
सीएसएमटीच्या घुमटाखाली आजही ‘टिक-टिक’; १५० किलोच्या पेंडुलमवर धावते ऐतिहासिक घड्याळ. सीएसएमटीच्या वास्तूला लाभलेली ही जुनी यंत्रणा आजही मुंबईच्या रेल्वे इतिहासाची ‘टिक-टिक’ जिवंत ठेवत आहे.
#railways#heritage
पश्चिम रेल्वेने स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विरार, बोरीवली, दादर, अंधेरी आणि चर्चगेटसह विविध स्थानकांवर थुंकणे, कचरा टाकणे आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
प्रवाशांनी स्वतः स्वच्छता राखत इतरांनाही स्वच्छ रेल्वे परिसरासाठी प्रोत्साहित करावे-कारण स्वच्छ स्थानक ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
@drmbct | @RailMinIndia