माझा पक्ष 'धाराशिव'!🚄🚄🌱🌱
झेंड्यामागून धावणारी मी अंध कबाड नाही,
पक्ष आणि नेत्यांची मला आता चाड नाही.
जो माझ्या मातीचा, माझ्या माणसांचा विचार करील,
माझा कौल त्यालाच, जो धाराशिवचे पाऊल पुढे धरील!
भुलथापांच्या घोषणांचे आम्हाला कौतुक नाही,
नेत्यांच्या त्या गाड्यांवर आमचे भविष्य सुखात नाही.
तरुणांच्या रिकाम्या हाताला जो हक्काचे काम देईल,
सुजलाम्-सुफलाम् करून या भूमीला, जो हक्काचे पाणी देईल...
गोरगरिबांचे अश्रू पुसून जो विकासाची पहाट आणेल,
राजकारणाच्या पलीकडची, जी हक्काची माणसे जाणेल.
जो जातीच्या भिंती पाडून फक्त प्रगतीचा मंत्र जपेले,
धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी जो अहोरात्र खपेल...
त्याच्याच गळ्यात पडेल मानाची ही माळ माझी,
नेत्याच्या सत्तेपेक्षा, जिल्ह्याची प्रतिष्ठा मोठी माझ्यासाठी आजची.
पक्ष गेला खड्ड्यात, अन नेता गेला चुलीत,
माझा सुवर्ण 'धाराशिव' दिसेल, फक्त त्याच्याच सावलीत!
टीप: June 21, 2026 रोजी झालेल्या खोकेबाजीपणानंतर झालेल्या साक्षात्करानंतर......!!!
@ranajagjitsinh1@OmRajenimbalkr@PatilKailasB@rahulmmote@Dr_Pratapsinhp@TanajiSawant4MH@archanaRpatil@RaviSir_MP
सर्व पदवीधर मतदारांचे मनःपूर्वक आभार..!
संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन आपला अमूल्य वेळ दिलेल्या सर्व पदवीधर मतदारांचे मनःपूर्वक आभार!
आपण दाखवलेला विश्वास, दिलेला प्रतिसाद आणि लोकशाही प्रक्रियेतील आपला सहभाग माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. पदवीधरांचे प्रश्न, त्यांचे हक्क, रोजगार, शिक्षण आणि भविष्य यांसाठी आपला आवाज सातत्याने बुलंद राहिला पाहिजे.
निवडणूक ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसते, तर ती पदवीधरांच्या अपेक्षा आणि प्रश्नांप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची सुरुवात असते.
आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार..! 🙏
— डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील
संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ
#पदवीधरमतदारसंघ
🎓 पदवीधर बांधवांनो, मतदानाचा हक्क बजावा; पण ₹500 किंवा काही हजारांसाठी आपला स्वाभिमान विकू नका!
मत तुमचं, मूल्य तुमचं, निर्णयही तुमचाच! ✊
स्वाभिमानी बना, स्वाभिमानी राहा!
#पदवीधर#मताधिकार#स्वाभिमान
📍मुंबई
विजयादशमीच्या शुभदिनी नेस्को सेंटर, गोरेगाव येथे शिवसेनेचा हिरक महोत्सवी दसरा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी संबोधित केले. भगवा खांद्यावर घेऊन प्रत्येक शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला मदत करेल असे मा. एकनाथजी शिंदे यांनी नमूद केले.
आम्ही भाषण देणारे नाही तर शेतकऱ्यांची चूल पेटवणारे, रेशन देणारे आहोत. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही मा. एकनाथजी शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.
याप्रसंगी शिवसेनेचे सर्व मंत्री, नेते, उपनेते, खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ते तसेच पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #DasaraMelava2026 #DasaraMelava #Maharashtra
राजेंद्र राऊत यांची राजकीय लायकी काय आहे, हे बार्शी तालुक्याला चांगलेच माहिती आहे! रोहितदादांवर टीका करण्याआधी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा. ज्यांची सुरुवातच गावठी दारूच्या व्यवसायातून झाली आहे,त्यांनी रोहितदादांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखेच! 🫡
@RRPSpeaks
सहामाही परीक्षा आली तरी अद्याप राज्यातील ६ वीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकं मिळालेली नाहीत, ही अतिशय गंभीर आणि संतापजनक गोष्ट आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या सरकारचा आणि शिक्षणाचा ३६ चा आकडा का आहे, हे कळत नाही. यांनी शिक्षणाचा अक्षरशः बट्ट्याबोळ करुन ठेवलाय. खुर्च्या टिकवण्याच्या नादात देशाच्या भविष्याचा गळा घोटणं तरी सरकारने थांबवावं. देशाच्या भविष्याची अजून किती वाट लावणार?
@Dev_Fadnavis@dadajibhuse