अभियंता पदासाठी डिग्री ची ॲलर्जी...
महाराष्ट्राचा प्रवास विरुद्ध दिशेला..
भारताला विश्र्वगुरू बनविण्याचे @narendramodi जी चे स्वप्न कसे पूर्ण होणार ?
पदविका घ्या,नोकरी मिळवा
पदवी घ्या,बेरोजगार रहा.
चीड येते अश्या एज्युकेशन सिस्टीम ची.
#PWD_JE@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (गट-ब) आणि अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) पदभरत्यांसाठी शैक्षणिक पात्रतेची नवीन नियमावली पुढे आणली आहे. विभागाच्या या नियमलावली नुसार कनिष्ठ अभियंता (गट ब) पदासाठी पदविका धारक पात्र आहेत परंतु पदवीधर अपात्र आहेत तसेच अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदासाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र आहेत.
एकीकडे गट-ब आणि गट-क पदांसाठी जाहिरात काढायची आणि गट-ब साठी पदविका धारक पात्र धरायचे परंतु पदवीधर अपात्र ठरवायचे तसेच गट क पदांसाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र ठरवायचे हा नवीन शोध सार्वजनिक बांधकाम विभागाने लावल्याने संपूर्ण पदभरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@RaviDadaChavan .
आज जवळपास लाखाहून अधिक डिग्री होल्डर अभियंते फॉर्म भरू शकत नाहीत. नियमावली अद्यावत करा, इथे सगळं डिजिटल होत चाललंय आणि तुम्ही कुठले 19व्या शतकातल्या नियमावर जाहिराती काढता, काळानुसार अपडेट व्हा मायबाप सरकार, नाही तर विद्यार्थ्यांचा रोष फुकट ओढवून घ्याल..@RaviDadaChavan@bolbhidu
बारावी करून पदवी प्राप्त केलेल्या अभियंत्याच्या #PWD_JE संदर्भातील मागणीबाबत आवाज उठविला त्याबद्दल धन्यवाद ..🙏
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
https://t.co/tSKUQ3DNKg
करू नका,त्यांना ९ सप्टेंबर २०२१ रोजी च्या आदर्श सेवाप्रवेश नियमाच्या शासन निर्णयानुसार परीक्षेला पात्र करा.पुन्हा ४-५ वर्ष भरती होणार नसल्याने कृपया विचार करा व अन्याय थांबवा.विनंती 🙏 (२/२)
#PWD_JE#Allow_BE_For_PWD_JE@RaviDadaChavan
मा.रवींद्र चव्हाण साहेब, आम्ही आपली खूप वेळा भेट घेतली,आपल्याला निवेदने दिली, #PWD विभागाला हजारो मेल करून आमचा मुद्दा मांडला,सर्वकाही प्रयत्न करून झाले.आता पुन्हा आम्ही आपणास विनंती करतो की बारावी करून पदवी केलेल्या ५-६ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय (१/२)
#PWD_JE@RaviDadaChavan
सरकार जर बारावी करून पदवी प्राप्त केलेल्या अभियंत्यांचा अंतच बघत असेल व #PWD_JE साठी पात्र करत नसेल तर आम्हाला सुद्धा मार्ग निवडावा लागेल.
परंतु लक्षात ठेवा 5-6 लाख कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप आपण करत आहात.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@RRPSpeaks
#WRD_PWD_JE केस साठी सरकार ला मा.तुषार मेहता (SGI) यांना पाचारण करावे लागले व आता पुढील सुनावणी ७/११ ला असताना #PWD_JE साठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ६/११ ठेऊन खेळ खेळलाय.
यावरून @CMOMaharashtra ची पदवी धारक विरुद्ध असलेली मानसिकता दिसून येते
@Dev_Fadnavis@NANA_PATOLE
मा.जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेब यांनी आज नेर ग्रामीण येथे #WCD_WCO_670 जागेच्या पदभरती संदर्भात भेटीसाठी वेळ दिला व विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन संबधीत जाहिराती संदर्भात इत्यंभूत माहिती दिली याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व धन्यवाद 💐🙏
#जलसंधारण_अधिकारी@SanjayDRathods
हातावर तुरी दिल्याचं तुम्ही !
उच्च शिक्षितांना भिकेला लावण्याची @CMOMaharashtra ची पॉलिसी आहे.
उच्च शिक्षण घेणे आज गुन्हा ठरलाय .
5-6 लाख अभियंत्यांना संधी नाकारून त्यांचे आयुष्य उद्धवस्त करण्याचे पाप हे या सरकार चे आहे.
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@RaviDadaChavan
अजब सरकार चा गजब कारभार !
पदवीधारक अभियंत्यांची वाट लावायची हेच ठरवले आहे का @Dev_Fadnavis साहेब?
CEA सारख्या निम्न दर्जाच्या पदासाठी diploma/BE/ME सर्व पात्र केलेत व JE सारख्या उच्च पोस्ट साठी फक्त diploma ही पात्रता.शेवटी उच्च शिक्षित पदवीधर अभियंत्यांच्या (१/२)
#PWD_JE
♦️रोहित दादा पवार यांनी आयोजित केलेल्या युवा संघर्ष यात्रेला जाहीर पाठिंबा.
रोहित दादा पवार यांनी २४ ऑक्टोंबर ते ६ डिसेंबर, पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सक्रिय जाहीर पाठिंबा आहे. आमच्या संघटनेच्या शाखा २१ जिल्ह्यात असून, यात्रा जाणाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकारी यात्रेत सामील होण्यासाठी प्रयत्न करतील.
पेपरफुटी कायदा, घोटाळ्यांचा SIT तपास, कंत्राटी नोकर भरती, अवाजवी परीक्षा शुल्क, रखडलेल्या परीक्षा, शिक्षक,पोलीस, प्राध्यापक, सिव्हिल भरती, MPSC राज्यसेवा, कंबाइन आणि इतर परिक्षांमधील विविध प्रश्नांबाबत ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
कुठलाही पक्ष, संघटना विरहित युवा चळवळ उभारणार असल्याने आम्ही पाठिंबा दिला आहे, म्हणून यात्रा आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर आपण सर्व विद्यार्थांनी किमान काही तास यात्रेत सहभागी व्हावे अशी विनंती.
युवा संघर्ष यात्रेला सक्रिय पाठिंब्याचे पत्र स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे सचिव - निलेश गायकवाड आणि इतर पदाधिकाऱ्यांनी रोहित दादा यांना दिले, यावेळी युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष रविकांत दादा वरपे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
@RRPSpeaks@ravikantvarpe@NCPspeaks@Jayant_R_Patil@supriya_sule@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray
नियोजित वेळापत्रकानुसार Dec-2022 मध्ये येणाऱ्या मृदा व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित ह्या पदाच्या जाहिरातीसाठी 10 महिने उलटूनही अद्याप #WCD ला मुहूर्त सापडला नाही. ऑगस्ट - 2023 मध्ये @MahaDGIPR व @SanjayDRathods यांनी भरती संदर्भात सूतोवाच (१/२)
#WCD_WCO
समस्त महाराष्ट्रातील विद्यार्थांच्या मनातील काही प्रश्न :
👉सरकारी नोकर भरतीची वाट कोणाची सत्ता आल्यापासून लागली?
👉महाराष्ट्रात सर्वात मोठे नोकर भरती घोटाळे कोणाच्या कालखंडात झाले?
👉बेरोजगारांना सर्वात जास्त मनस्ताप कोणत्या नेत्याची सत्ता असताना झाला?
@dev
#MahaGenco/महानिर्मितीचा पेपर आता जाहीर करत आहोत.
हा पेपर ज्युनिअर सीक्युरिटी ऑफिसर पदाच्या सेकंड स्टेज मधील साइकोमेट्री टेस्टचा आहे. हा पेपर ऑफलाईन होता आणि विभागाकडून सबमिट करून घेण्यात आला होता, म्हणजे पेपरचा फोटो बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता. पण अत्याधुनिक हाय-टेक कॅमेरा वापरून सदर पेपर फोडून परीक्षा केंद्राबाहेर पाठविण्यात आला आहे.
पेपरचा एकच भाग क्रॉप करून जाहीर करत आहोत कारण पूर्ण फोटो जाहीर केल्यास, तो पूर्ण फोटो नक्की कोणता आहे आणि कुणी पाठविला, हे घोटाळेबाजांना समजेल आणि ज्या व्यक्तीने आम्हाला हा फोटो पाठविला आहे त्याच्या जीवितास धोका निर्माण होईल.
महानिर्मितीचे नक्की किती पेपर फुटले आहेत, किती घोटाळेबाज याप्रकारे उत्तीर्ण झाले आहेत? या घोटाळ्यामध्ये नक्की कोण-कोण सामील आहेत. या सर्वांसाठी महानिर्मितीच्या संपूर्ण भरती प्रक्रियेची मा. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली #SIT चौकशी करण्यात यावी. स्टेज-१ मधील पण पेपर फुटल्याची शक्यता आहे त्यामुळे महानिर्मितीने याप्रकरणाची रीतसर FIR दाखल करावी आणि सरकारने SIT स्थापन करण्याची तत्काळ घोषणा करावी.
8668378583 हा आमचा क्रमांक आणि [email protected] ई-मेल आहे, पोलीस विभागाने अथवा महानिर्मितीने आम्हाला संपर्क करावा त्यांना आम्ही पेपरचा पूर्ण फोटो आणि इतर पुरावे सादर करू.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra@TejaswiSatpute@VijayWadettiwar@RRPSpeaks@Awhadspeaks@CMOMaharashtra@connectMSPGCL@MSEDCL