@LegalAdvisour Lack of Education and Human morals with all present politicians.... Very few are there who really cares about the country and the responsibilities they have given by we citizens.
@LegalAdvisour मत बताओ उन��ो, चूनाव मे ही अगर व्यस्त रहेंगे तोही अच्छा हैं middle class वालोंके लिये, जब वो चुनाव से बाहर निकलेंगे तो फुरसत से पेट्रोल डिझेल औंर अन्य चिझो के दाम बढणे वाले हैं...
टीप - सदरील कथा ही अत्यंत राजकीय असून जर वास्तवाशी त्याचा संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा..!
ती स्त्री अवंतिका देसाई.पुण्यातल्या साध्याशा कुटुंबात जन्म. पण देहयष्टी मात्र दैवी. एवढी सुंदर, की तिच्याकडे बघताना नजर ठरावी. उंची, गोरेपणा, डोळ्यांतला ठसका - सगळंच जणू राजकारणासाठी घडवून आणलं होतं.
सुरुवात होती महाविद्यालयातील गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदापासून. मग तारुण्य. हळूहळू तिने राजकारणात पाऊल ठेवलं. नेते तिच्या सौंदर्याला भूलले. एक नव्हे, दोन नव्हे, थेट पुणे शहराध्यक्षपद. मग प्रदेशाध्यक्षा. आणि एके दिवशी ती बसली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी.
पण पदाला शोभेल अशी बैठक तिच्या मनाची नव्हती. वैचारिकतेचा लवलेश नाही, अभ्यास नाही, समज नाही. फक्त होती ती पक्षनिष्ठा आणि वरिष्ठ नेत्यांशी जुळवून घेण्याची हातोटी.
राज्यात महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले. काही गावात तर युवतींच्या सक्तीच्या वेश्याव्यवसायात विक्रीचे प्रकार समोर आले. एका लहानशा खेड्यात सामूहिक बलात्कार झाला. पीडितेची प्रकृती गंभीर. माध्यमांनी ती कथा उचलून धरली.
अवंतिका यांच्याकडे पत्रकारांनी प्रश्न केला. ती म्हणाली, "ही दुर्दैवी घटना आहे. आयोग याची दखल घेईल." पण आयो��ाने दखल घेतली नाही. कारण त्या गावचा सरपंच, जो मुख्य आरोपी होता, तो अवंतिका यांच्याच पक्षाचा होता. एवढंच नव्हे, तर त्याने अवंतिका यांच्या एका खासगी कार्यक्रमासाठी मोठा निधी देखील दिला होता.
दुसरीकडे, अवंतिका यांचा एक फेसबुक पोस्टवरून वाद झाला. एका तरुण पत्रकाराने त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा लेख लिहिला. दुसऱ्याच दिवशी त्या तरुणावर बनावट गुन्हा दाखल झाला. 'महिला आयोगाच्या अध्यक्षांची बदनामी' हे कारण होतं.
एकीकडे ती संविधानाच्या प्रती प्रतिज्ञा करत असे. लोकशाहीचे पाठ रटत असे. पण दुसरीकडे, ती एका भोंदू बाबाच्या दर्शनाला जात असे. तो बाबा, ज्याच्यावर अनेक महिलांना बळी पाडल्याचे आरोप होते, ज्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त केली होती, त्याला ती आपल्या पदाचा वापर करून पोलिसी संरक्षण पुरवत होती. त्याच्या आश्रमाला महिला आयोगाच्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व देत होती.
एकदा आयोगाच्या एका अधिकाऱ्याने हळूच विरोध केला. "बाबांच्या आश्रमात अनेक महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आहेत. आपण त्यांना संरक्षण देतोय, हे योग्य नाही."
अवंतिका हसल्या. "त्या तक्रारी खोट्या आहेत. बाबा फार मोठे संत आहेत. त्यांच्यामुळे लाखो महिलांना मार्ग मिळतोय. तू उगीच वादात पडू नकोस."
एक दिवस अचानक एक केस आयोगासमोर आली. एक तरुणी बेपत्ता झाली होती. तिची आई रडत आली होती. तिच्या हातात एक फोटो होता. तो बाबांच्या आश्रमातला होता. त्या फोटोत ती तरुणी होती, आणि तिच्या शेजारी हसत हसत छत्री धरून उभ्या होत्या - अवंतिकाताई.
"ताई, माझी मुलगी बेपत्ता झाली. तिला शेवटचं बाबांच्या आश्रमात पाहिलं होतं. तुम्हीच तर त्यांचं संरक्षण करता. तुम्हीच माझ्या मुलीचा शोध घ्या."
अवंतिका यांचा चेहरा पडला. त्यांनी त्या केसला "पुराव्यांअभावी" बंद केलं. पण ही बातमी माध्यमांपर्यंत पोहोचली. प्रश्न उठू लागले.
एका वर्तमानपत्राने मोठी बातमी छापली. शीर्षक होतं - "संरक्षक की संरक्षित? महिला आयोगाध्यक्षा आणि बेपत्ता महिलांचे रहस्य."
आता राज्यात वादळ उठलं. समाजमाध्यमांवर टीकेचा भडका उडाला. पक्षातूनही कुजबुज सुरू झाली. पण अवंतिका निर्विकार होत्या. त्यांना विश्वास होता, त्यांचं सौंदर्��� आणि जवळीक त्यांना वाचवेल.
... आणि इथेच ही कथा थांबते. कारण आता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे.
ज्या महिला आयोगाचे काम महिलांचे हक्क रक्षण करणे, त्यांच्यावरील अत्याचार थांबवणे, त्यांना न्याय मिळवून देणे, त्या आयोगाची अध्यक्षाच स्वतः राजकारणाच्या चषकात बसून, गुन्हेगारांना वाचवत असेल, तर अशा व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का?
जी स्त्री संविधानाच्या नावाखाली धर्मांधांना संरक्षण देते, जी आपल्या पदाचा वापर करून टीकाकारांना गप्प बसवते, ती खरोखरच महिलांची 'ताई' असू शकते का?
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अशा ढोंगी, धूर्त, असमर्थ व्यक्तीकडे आपण आपल्या बहिणी, मैत्रिणी, मुलींची सुरक्षा सोपवायला तयार आहोत का?
की अशा व्यक्तींना सत्तेवरून उतरवण्याची ताकद आपल्यात, आपल्या लोकशाहीत, आपल्या आवाजात आहे?
या प्रश्नांचं उत्तर फक्त तुम्ही देऊ शकता. कारण कथेचा शेवट तुमच्या हातात आहे. तुमच्या विचारा���, तुमच्या निर्णयात, तुमच्या आवाजात.
ही कथा इथे संपत नाही, तर अनेक गंभीर प्रश्नासह सुरू होते.
@RKTweetsIn@mnsreport9 याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मावळ तालुका. पूर्वी इथे जी स���्ता होती त्या काळात सध्याच्या आमदाराने खूप कामं केली आणि कामं करायला भाग पडली. आणि त्यामुळे जनमानसात ती व्यक्ती पोहचली गेली. त्याचे फळ त्यांना मागच्या 2 टर्म्स मध्ये मिळाले आहेत.
@RKTweetsIn@mnsreport9 मुळात यांना एक साधी गोष्ट समजतं नसावी की एखाद्या मतदारसंघात किमान एक व्यक्ती नेमावी जो सत्तेत नसताना सुध्दा त्या भागात चांगले काम करण्यास मदत आणि कामे करऊन घेईल आणि मग लोकांनी ती व्यक्ती जेव्हां उचित उमेदवार आहे असे वाटेल तेंव्हा ते लोक पाठिंबा देतील.
@RKTweetsIn@mnsreport9 हल्ली दर वेळेस कोणी नवीन नवीन चेहरे उमेदवार म्हणून उभे करणार तर लोक पाठिंबा देत नाहीत, कारण त्यांचे त्या मतदारसंघासाठी कर्तृत्व काहीच नसते.