राखीचे पवित्र बंधन बहीण-भावाचे नाते दृढ करते. नात्यातील हा ओलावा, प्रेम कायम ठेवते. प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी म्हणून हा दिवस खास आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
'हेचि दान देगा देवा,तुझा विसर ना व्हावा| '
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा...!
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील, यांची जी मराठा आरक्षणाची मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी हीच पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना.🙏
अन्यायाचा कडेलोट झाला! सत्याचा विजय झाला.
आपण जिंकलो, बीडचा प्रत्येक मावळा खासदार झाला. सामान्यातला सामान्य बीडकर संसदेत पोहोचला. कष्टाचे सोने झाले. शेवटचा श्वासदेखील माझ्या बीडसाठी, बीडच्या शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवांच्या, महिला-युवतींच्या कल्याणासाठी अर्पण करीन.
मागासवर्ग आयोगाने दिलेल्या मराठा समाजाच्या अहवालाबाबत माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.
"प्रथमदर्शनी हा अहवाल सकारात्मक असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. परंतु मागील अहवालात मराठा समाज मागासलेला वाटत नाही, हे मागील केस मध्ये जे कोर्टाने सांगितले, त्यामुळे अडचण अशी झाली की मराठा-कुणबी, कुणबी-मराठा असं एकत्रित प्रतिनिधित्व या अहवालामध्ये दाखवण्यात आलं.
मी सातत्याने सांगत आलो की, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जरी एक असले तरी कुणबी समाज ओबीसी प्रमाणपत्र घेऊन शासकीय सेवांमध्ये, नोकऱ्यांमध्ये लागला आहे. माननीय न्यायालयाने Circumstances बघावेत. मराठा या तीन शब्दांवर मागासवर्ग आयोगाने अहवाल बनवला असेल तर तो सकारात्मकच आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचा टक्का अत्यंत कमी आहे, शैक्षणिकही प्रतिनिधित्वही आमचे कमीच आहे.
असे असेल तर हाच अहवाल १००% टक्के सकारात्मक आहे. राज्य सरकारने तात्काळ या अहवालाचे कायद्यात रूपांतर करावं, अशी अपील करतो.