कोल्हापूरचा स्वाभिमानी दणका!
कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची स्वाभिमानी माती आहे! या मातीत अन्यायाविरुद्ध लढण्याची, स्वाभिमान जपण्याची आणि राजकीय डावपेचांना उत्तर देण्याची परंपरा आहे.
बंटी पाटील साहेबांना घेरण्याचा आणि त्यांच्यावर राजकीय डाव टाकण्याचा प्रयत्न झाला; मात्र कोल्हापूरच्या मातीत डाव ओळखण्याचं आणि वेळ पडल्यास तो डाव उलटवण्याचं सामर्थ्य आहे!
सतेज पाटील (बंटी पाटील) साहेब यांच्या नेतृत्वाखालील शाहू समविचार आघाडीला गोकुळच्या निवडणुकीत मिळालेलं प्रचंड बहुमत हा त्याचाच ठळक संदेश आहे.
आणि आता पुढचा नारा…
गोकुळ तो झाँकी है, पदवीधर और शिक्षक बाकी है! य
गोकुळच्या निकालाने राजकीय चर्चांना नवी दिशा दिली आहे. आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही राजर्षी शाहू महाराजांची माती आहे; इथे स्वाभिमानाशी तडजोड होत नाही आणि जनतेचा कौलच अंतिम असतो!
#कोल्हापूरचा_स्वाभिमान #राजर्षीशाहूमहाराज #सतेजपाटील #बंटीपाटील #गोकुळ #पदवीधर #शिक्षकमतदारसंघ
नैतिकता आणि रजा यांचा संबंधच काय?
नैतिकता असती, तर रजा नव्हे, थेट राजीनामा दिला असता!
तुमच्या मित्रांनी सांगितलं आणि तुम्ही रात्रीतून रजेवर गेलात. पण आता विद्यार्थी प्रार्थना करत आहेत की, तुम्हाला आणि तुमच्या मित्रांनाही नैतिकतेची जाणीव व्हावी!
ज्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या मनात एकच सवाल आहे — चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाणं ही नैतिकता असेल, तर पदावरून दूर होण्यासाठी राजीनामा का नाही?
आज रात्री पुन्हा तुमच्या मित्रांचा फोन येऊ दे… पण यावेळी त्यांनी तुम्हाला रजेवर जाण्याचा नाही, तर राजीनामा देण्याचा सल्ला द्यावा!
कारण विद्यार्थ्यांना रजा नको, उत्तर हवंय!
विद्यार्थ्यांना आश्वासन नको, न्याय हवा आहे!
रजेने प्रश्न सुटत नाहीत; जबाबदारी स्वीकारूनच नैतिकता सिद्ध होते!
ECI सुप्रीम कोर्टाचा आधार घेऊन,भारतीय नागरिकांची मस्करी कशी करते बघा.
एखाद्या उमेदवाराला जर त्याच्या मतमोजणी संदर्भात शंका असेल तर तो त्याच्या मतदारसंघात असणाऱ्या एकूण बुथच्या 5% मशिन्स ची तपासणी करण्याची मागणी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतों.
या प्रोसेसला टेक्निकल भाषेत,
Checking and Verification of burnt memory/microcontroller of EVM अस म्हणतात.
यासाठी प्रत्येक evm सेट मागे ECI 47 हजार रुपये चार्ज करते.आणि त्यानंतर चक्क डमी पोल उमेदवाराने निवडलेल्या मशीनवर करते.
म्हणजे पैसे मोजून देखील झालेलं मूळ मतदान ECI मोजत नाही.
हा संपूर्ण देशवासीयांच्या भावनेसोबत खेळ नाही का..?
*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार, छ.संभाजीनगरच्या लढ्याला यश!*
#DBatu विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार, छ. संभाजीनगरचे पदाधिकारी गेले चार दिवस साखळी उपोषण आंदोलन करत होते.
एकीकडे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्त्या देऊन पगार सुरू करायचा आणि दुसरीकडे राज्यसेवा परीक्षेतून अधिकारी झालेल्या 623 अधिकाऱ्यांना नियुक्त्या द्यायला टाळाटाळ करायची?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी #DBATU चा अनागोंदी कारभार सुरु आहे.यावर सातत्त्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवेदने दिली आहेत,आंदोलने केली आहेत. मात्र विद्यापीठ प्रशासनाचा कारभार सुधारत नाही, #भाजप#सरकार ला लक्ष द्यायला वेळ नाही
रेल्वेप्रवास करणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाला 2 दिवसापूर्वी इगतपुरी कल्याण दरम्यान बिफ नेत असल्याच्या संशयावरून काही समाकंटकांनी मारहाण केल्याची घटना समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती.
28 तारखेला ही घटना घडली होती.सदरील व्हिडिओ समाज माध्यमांवर viral झाल्यानंतर लोकांच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
यानंतर रेल्वे पोलिसांनी सदरील आरोपींना अटक केली होती.मात्र ठाणे रेल्वे कोर्टाने मात्र 15 हजार रुपये जामिनावर या आरोपींची सुटका केली.या प्रकरणात पोलिसांनी कुचकामी भूमिका घेत अत्यंत सौम्य कलमे सदरील आरोप पत्रात लावली होती.याबाबत संताप व्यक्त करत ठाणे लोहमार्ग पोलिसांना जाब विचारला.सोबतच फरार असणाऱ्या उर्वरित आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील केली.
@supriya_sule ताई एकदम बरोबर बोलल्या.राजकारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे.ते फक्त नैतिकतेने करावे एव्हढंच. एका विचारावर निष्ठा ठेवून लोकांसाठी काम करणे हि ज्याची त्याची आवड. त्याबदल्यात लोकं तुम्हाला मान सन्मान देतात, प्रसंगी आमदार,खासदार,मंत्री करतात. १/२
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार सोशल मिडिया फ्रंट आयोजित..
Social Media Front Meet UP 2.O
बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता..
स्थळ - निसर्ग कार्यालय, मार्केट यार्ड, पुणे.
वाजू दे तुतारी..
आपला महाराष्ट्र धर्म टिकावा,वृध्दींगत व्हावा, आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा विकासाच्या शिखरावर पोहचावा अशी इच्छा उराशी बाळगणाऱ्या स्वाभिमानी विद्यार्थीतरुणांनो आपल्यास्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत येत यामोहिमेत सहभागीहोऊयात१/२
#मीशरदमित्र
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार" पक्षातर्फे #माझ्या_स्वप्नातील_महाराष्ट्र या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. काल आदरणीय जयंत पाटील साहेब,डॉ.अमोल कोल्हे साहेब, वंदनाताई चव्हाण व माझ्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेत हे अभियान जाहीर करण्यात आले.
"साथ अनुभवाची, ताकद महाराष्ट्राची आणि सोबत आधारवड सह्याद्रीची!
चला, पक्षाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहूयात!"
उद्या, सोमवार, १० जून २०२४
सायं- ५ वाजता
स्थळ- न्यू आर्टस, काॅमर्स व सायन्स काॅलेज
लाल टाकी रोड, दिल्ली गेटमागे, अहिल्यानगर.