विधानसभेचे विरोधी पक्षनेते *मा* . *श्री. अजितदादा पवार* हे आज, गुरूवार, दि. २८ जुलै २०२२ रोजी विदर्भातील पूर व अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. अजितदादा हे गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना भेट देणार असून विविध तालुक्यांमधील पूर परस्थितीचा आढावा घेणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली; त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीनं राज्य शासनाच्या वतीनं करण्यात यावी.