@KDMCOfficial स्वछता मोहिम क प्रभागात सुद्धा करा, रस्ता स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर अनधिकृतपणे जे कब्जा करून बसले आहेत त्याच्यावर.... नुसता सोसिअल मीडियावर विकास नको.
@KDMCOfficial कल्याण डोंबिवली महानगर पालिका पदपथावर करावाही फक्त ठराविक प्रभागंमध्येच करत आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमधील दुसऱ्या प्रभागातील नागरिकांचे काय???
@ThaneCityPolice@KDMCOfficial कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर बेकायदेशीर फेरीवाले/स्टॉलधारकांवर दररोज कारवाई करण्याबाबत. नागरिकांना चालण्यासाठी खूप त्रास होत आहे वरतून यांची दादागिरी सुद्धा असते.कारवाही करावी 🙏🙏🙏
@KDMCOfficial@ThaneCityPolice काल 11 ऑगस्ट रोजी तक्रारीचे निराकरण केले. कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात फेरीवाले बसणार नाही याबाबत दक्षता घेण्यात आली होती. सोबत व्हिडिओ देत आहे व्हिडिओ 12 ऑगस्ट दुपारी 1:20 PM. आपण काय कारवाई केली याबद्दल तपशील द्यावा????
@KDMCOfficial भारत देश स्वतंत्र झाला म्हणून आपण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. नागरिकांनी काय खावे आणि काय नाही खावे हे ठरवणारे महानगरपालिका कोण???? मास मच्छीची दुकाने उघडी ठेवण्यास समस्या काय आहे????
@ThaneCityPolice कल्याण पश्चिम मधील वालधुनी ब्रिज कल्याण पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तयार झाली आहे. एका साईडने जाणाऱ्या गाड्यांनी दुसऱ्या साईडने येणाऱ्या गाड्यांचा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे आपण लवकरात लवकर कारवाई करावी.
@KDMCOfficial युसूफ मेहर अली शाळा क्रमांक 92/5, गोविंदवाडी, कल्याण पश्चिम शाळेभोवती असलेल्या मैदानावर मागील दोन महिन्यापासून पाणी साचलेले आहे तेथे साचलेला पाण्यामुळे साथीच्या रोगांची पसरण होऊ शकते.
@ThaneCityPolice@KDMCOfficial दुर्गाडी सर्कलवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बस स्टॉप समोर कचरा उचलणारा ट्रक उभा आहे. प्रवाशांनी बस स्टॉप वर उभा राहून कचऱ्याचा वास घ्यावा की बस पकडावी?? येथे अनधिकृत लस्सी वाली गाडी मुळे लोक रस्त्यावर गाड्या लावून लस्सी पितात.
@KDMCOfficial@ThaneCityPolice ओल्ड बॉईज शाळेपासून ते अल्फा इंग्लिश हायस्कूल, गोविंदवाडी,शकूर बंगल्याच्या बाजूला, कल्याण पश्चिम या अरुंद रस्त्यावर रस्त्याच्या कडेला दिवस-रात्र वाहने उभी असल्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. आपण दखल घ्यावी.
@MSEDCL@Sekalyan1@ThaneCityPolice वारंवार उघड्यावर पडलेले डी पी बॉक्स बद्दल तक्रार टाकून देखील काहीही कारवाही होत नाही.एखादा अपघात झाल्या शिवाय प्रशासनाला जाग येत नाही का?
@ThaneCityPolice@KDMCOfficial
अतिक्रमणवर कारवाही करण्यासाठी ज्या गाड्या वापरण्यात येतात त्यांचे फिटनेस, इन्शुरन्स, पि यू सी नाही. या गाड्यांवर कधी कारवाही होणार नियम आणि कायदा फक्त सामान्य माणसासाठी आहे का?????
MH05 8919 गाडी क्रमांक आहे सोबत विडिओ देत आहे.
@KDMCOfficial@InduIAS16 गोविंदवाडी,मौलवी कंपाऊंड,कल्याण पश्चिम मध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराची पाणी वारंवार तुंबत आहे आणि ओसंडून वाहत आहे. तक्रार क्रमांक CN2025000018.लवकरात लवकर कारवाही करावी 🙏.कॉपी पेस्ट मेसेज पाठवण्यात वेळ न घालवता तक्रार क्रमांकावर कारवाही करावी
@KDMCOfficial तक्रार क्रमांक CN2024004856.या तक्रारीवर लवकरात लवकर दखल घ्यावी जेणे करून पुढे होणाऱ्या अपघाताला आपण आळा घालू शकतो. उगाच कॉपी पेस्ट मेसेज पाठवत बसू नका. तक्रार योग्य रित्या नोंदवली आहे. पुन्हा एकदा सांगतो तक्रार नोंदवली आहे. तक्रार क्रमांक सुद्धा आहे.