पुस्तक प्रदर्शन २०२६…!
आजपासून दिना बामा पाटील वाचनालय व अभ्यासिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून विविध पुस्तकांची माहिती घेतली.
हे पुस्तक प्रदर्शन दि. १८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत स्टेशन रोड, भांडुप येथे सुरू राहणार आहे.
सर्व पुस्तकप्रेमी, विद्यार्थी आणि वाचकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन नवनवीन पुस्तकांचा अनुभव घ्यावा.
#BookExhibition #Bhandup #DinaBamaPatilLibrary #RajoolSanjayPatil #SanjayDinaPatil
व्यंगचित्रकार म्हणून सुरू झालेला प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या नेतृत्वापर्यंत पोहोचवणारे बाळासाहेब ठाकरे हे राज्याच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या प्रभावी संवादशैलीने, स्पष्ट राजकीय भूमिकांनी आणि संघटनकौशल्याने महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला वेगळे वळण दिले. विविध मुद्द्यांवर त्यांची मते ठाम असत आणि ती मांडण्याची त्यांची पद्धतही स्वतंत्र ओळख निर्माण करणारी होती. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!