संकटाच्या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी आपल्या विभागाने खूप मेहनत घेतली आहे. हा विक्रम केवळ आकड्यांचा नसून लोकांच्या सेवेचा आहे, असंच म्हणावं लागेल. याबाबत आपले व आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून आभार.
#राजाश्रीशिवछत्रपती ह्या मालिकेतील #शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे दृश्य व गाणं अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यात आनंदाश्रु आणणारा आहे.राजं मुजरा...आपण दिलेला स्वाभिमानी शिवविचार सर्वांना बारा हत्तीचे बळ देणारा होता आहे व सदैव राहणार.
@kolhe_amol
https://t.co/mEfqX2XCpF
क्षत्रियकुलावंत,सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
सकळकुळमंडित, न्यायालंकारपंडित, प्रौढप्रतापपुरंदर, महाराजाधिराज, अखंड हिंदवी स्वराज्य संस्थापक अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा..
पालक आणि उमेदवारांच्या विनंतीचा विचार करता राज्य सीईटी सेल, एमएचटी सीईटी २०२० साठी अर्ज दाखल केलेल्या नोंदणीकृत उमेदवारांना १० जून, २०२० (रात्री ११.५९ वाजे) पर्यंत जिल्हा प्राथमिकता बदलण्याची परवानगी देत आहे.
त्यामुळे हे काम रखडल्याचा नागरिकांना त्रास होतोय. @nitin_gadkari जी आपणास विनंती आहे की, यामध्ये प्रकरणी लक्ष घालून संबंधित यंत्रणेला हा रस्ता लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश द्यावेत. @OfficeOfNG@NHAI_Official
पुणे शहरातील नवले पूल ते कात्रज चौक या दरम्यानच्या रस्त्याचे काम रखडले आहे.संबंधित कंत्राटदाराला काम सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. परंतु त्याने अचानक काम थांबविले आहे.अनेक ठिकाणी काम अर्धवट सोडून दिले आहे. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज,दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग,पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरात थांबावं, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याच्या अधिनियमानुसार अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय निर्गमित केल्याबद्दल आपले अभिनंदन @VarshaEGaikwad ताई !
#म#मराठी#मायबोली
लॉकडाउन लागू झाल्यापासून आयपीसीच्या कलम १८८ अंतर्गत
तब्बल १,२१,०७५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यांत २३,६४१ जण अटक झालेत व ७६,८८३ वाहने जप्त झाली आहेत.
₹६,११,९३,८४८ इतका दंड
गुन्हेगारांकडून वसूल केला गेला आहे.
पोलिस हेल्पलाईन १०० वर #कोविड-१९ च्या कॉलमध्ये सातत्याने वाढ होत आहे. असे तब्बल ९८,६४२ कॉल आतापर्यंत आले आहेत.
५,९२,५८० लोकांना क्वॉरॉन्टाय्न केले गेले आहे व ७०६ जण क्वॉरन्टाय्नचे उल्लंघन करत असल्याचे आढळले.
राज्य सरकार ८१० मदत शिबिरं राबवित असून या ठिकाणी ३७,९९४ मजुरांना अन्न व जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेेत.
२५७ पोलिसांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये ८३५ जणांना अटक झाली आहे.
आज, खारेगाव येथील भूमिपुत्र मैदान येथे ४५० बेडसचे कोव्हीड हॅास्पीटलचे भूमिपूजन करण्यात आले. या कोव्हीड-१९ रुग्णालयात ॲाक्सीजनची सुविधा असलेले १०० बेडस् निर्माण करण्यात येणार आहेत तर ५० बेडसचे आयसीयू युनिट तयार करण्यात येणार आहे.