सार्वजनिक माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळ. माघी गणेश चौक मालवण. गणेश मंदिराचा सातवा वर्धापन दिन व वार्षिक उत्सव 2023. आजच शनिवार दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी रात्रौ ठीक 9.30 वाजता ओमकार मित्र मंडळ आयोजित चांडाळचौकडी या नाटकाचा प्रयोग आहे. प्रयोग क्रमांक 15. सर्वांनी नक्कीच या...
जि. प. प्राथमिक शाळा नेरूर नं. 1, सिंधुदुर्ग बँक नेरूर, ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त ध्वजारोहण साठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. हिंदुस्थान मधील संरक्षण करणा-या सर्व जवानांना मानाचा मुजर���.
- मंजुनाथ सुभाष फडके.
(ग्रामपंचायत सदस्य-नेरूर.)
ओम शिवकृपा कला-क्रीडा मंडळ, सविनय सादर करीत आहोत, 43 वे नाट्यपुष्प. वि. वा. शिरवाडकर लिखित, गिरीश नेरूरकर दिग्दर्शित नाटक "नटसम्राट". माझी या नाटकात भुमिका आहे. आजच बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी कलेश्वर मंदिर च्या रंगमंचावर, नेरूर-देऊळवाडा. रात्रौ ठीक 10.00 वाजता.. याच हा.
गणेश जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करणारे, उत्कृष्ट कलाकार, मोरया फिल्म फेम संतोष जुवेकर सर यांच्या सोबत... ते स्टेज च्या पायरीवर उभे होते, मी खाली उभा होतो, वाकून ��ोटो पोज दिली... नम्र-गुणी कलाकार... गणपती बाप्पा मोरया...🙏🙏🙏🙏🙏
ग्रामपंचायत सदस्यांचे प्रशिक्षण शिबीर. खूप छान शिबीर. पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी, जि. कोल्हापूर.19 जानेवारी 2023 ते 21 जानेवारी 2023 3 दिवसीय प्रशिक्षण शिबीर कुडाळ, पिंगुळी येथे पार पडले. खूप छान, उपयुक्त माहिती मिळाली.. मार्गदर्शक सरांचे खूप आभार..
महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्ग चे 32 वे सिंधुब्रह्म समेलन कणकवली येथे छान दिमाखात पार पडले... पुढील 33 वे सिंधुब्रह्म संमेलन 2024 साली कुडाळ येथे होणार आहे... कुडाळ तालुका हा यजमान असणार आहे... समेलन चा नारळ स्वीकारताना कुडाळ चे पदाधिकारी...
महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग, कुडाळ शाखा - पौरोहित्य समितीचा मेळावा आमच्या निवासस्थानी अन्नपूर्णा भोजनालय मध्ये खूप सुंदर-नियोजनबद्ध पार पडला... कुडाळ तालुक्यातील सुमारे 70 ब्रह्मवृंदांची उपस्थित होती...
आमच्या निवासस्थानी सत्यनारायण महापुजा सुंदर सुसंपन्न झाली. सत्यनारायण महापुजा, आरती, तीर्थप्रसाद, जेवण असा सुंदर कार्य��्रम पार पडला. निवडणूकीला मला केक हे चिन्ह मिळाले म्हणून जिंकून आल्यानंतर केक वाटला. वडा चटणी आणि केक असा फक्कड बेत जाहला. मकरसंक्रांत,हळदी-कुंकू समारंभ पार पडला.
मी ग्रामपंचायत निवडणुक मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून बहुमतांनी निवडून आल्यानिमित्त माझ्या घरी- निवासस्थानी अन्नपुर्णा भोजनालय, नेरूर चव्हाटा येथे मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी सत्यनारायण महापुजा आहे... सर्वांनी तीर्थ प्रसादाला याच हा... आग्रहाचे निमंत्रण...
Walk On Right... पायी चालताना नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूनेच चालावे... या उपक्रमात सहभागी झालो... महाराष्ट्र पोलीस महोदयांच्या हस्ते प्रमाणपत्र मिळाले... जय हिंदुस्थान...
रस्ता सुरक्षा अभियान 2023...
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग...
"सडक सुरक्षा, जीवन रक्षा..."
महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्ग. 32 व्य��� सिंधुब्रह्म समेलन मध्ये माझा ग्रामपंचायत सदस्य झालो म्हणून गौरव करण्यात आला. महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर गुरूजी यांच्या हस्ते बहुसंख्य ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत शाल-श्रीफळ-सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अनेक कुटुंबांना उपयुक्त असणारी नेरूर आदर्श नगर येथील नळपाणी योजनेचे चालू असणा-या कामाची पाहणी करताना. काम चांगल्या रीतीने सुरू आहे. ग्रामस्थांची सुद्धा चांगल्या प्रकारे साथ आहे. सोबत नेरूर गावच्या सरपंच सौ. भक्ती घाडी, 2 नंबर वॉर्ड चे आम्ही तीनही सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होतो...