#पोपटपंची#चतुर_की_जान !
- महेश म्हात्रे
ज्यांचा माझा गेल्या तीन दशकांचा व्यक्तिगत परिचय आहे. ज्यांच्या 'राज'स व्यक्तिमत्त्वाचा, अमोघ वाणी आणि कुंचल्याच्या फटकाऱ्याचा मी जबरदस्त चाहता आहे ... मध्यंतरी त्यांनी लिहिलेल्या सुरेख पोस्ट वाचल्यावर मी त्यांच्या लेखणीचाही फॅन झालो ...
पण माझ्या मनात जे दुःख अभिनेता ऋषिकेश जोशी यांच्याबद्दल आहे , की, चांगले रुप, सुंदर अभिनय , अचूक टायमिंग, खणखणीत आवाज असं सगळं असूनही, हा माझा लाडका अभिनेता मराठी आणि हिंदी पडद्यावर फार 'झळकताना' दिसत नाही . राज ठाकरे यांचेही तसेच ... नावाप्रमाणे 'राजा' मनाचा हा नेता , ज्याने, शिवसेनेतील, घरातील सत्तासंघर्षात मोठा होण्याची 'किंमत' म्हणून , किणी प्रकरणात जीवघेणी 'अग्निपरीक्षा' दिली. तरीही मन खट्टू नकरता, आपली राजकीय वाटचाल त्याच तडफेने सुरु ठेवली. पुढे, घरचा पक्ष, पितृतुल्य काका यांना सोडून स्वतःची नवी वाट आखली ... अवघा महाराष्ट्र सुखावला. ज्याच्यात बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब दिसे, असा युवा नेता राज्याला नेतृत्व द्यायला उभा राहिला होता... संपूर्ण राज्यात तरुणाईला उधाण आले होते... मनसेला लोकांनी 'दिलसे' स्वीकारले होते.
पण... रानात जसा 'चकवा' लागतो , तसा हा लाडका नेता, एका मागोमाग एक अशा, जाहीर सभेच्या 'फेऱ्यातच' अडकत गेला. आजही अडकलेला दिसतोय.
परिणामी त्यांना लोकसभा,विधानसभा निवडणुका, त्यासाठीचे पार ३५८ तालुक्यातील, खेड्यापाड्यात, बूथ स्तरापर्यंत करावयाचे संघटनात्मक नियोजन, करण्याची कधी फिकीर दिसली नाही ...!
शिवसेनेच्या शाखा, हे बलस्थान आहे. आजही एकनाथ शिंदे यांनी सेना सोडल्यानंतर सुद्धा, उद्धव ठाकरे यांचे जे राजकारण सुरू आहे ते या शाखेत बसणार्या शिवसैनिकांनी जपले आहे.
राज यांनी तशी कार्यकर्त्यांची मांदियाळी जपली नाही. परिणामी, २००६ ते २०१० दरम्यान, जे 'राजगड' खिशातील पैसे घालून "राजगड" उभारण्याचे फॅड मनसे कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाले होते, ते अल्पावधीतच शमले. राज किंवा शर्मिला वहिनी यांनी उद्घाटन केलेल्या शाखांपैकी किती शाखा आज अस्तित्वात आहेत, याचा जरी आढावा घेतला तरी, राज यांच्या एकांती राजकारणाचे पतन का झाले ते उमगते.
अशा या प्रत्येक सभा गाजवणाऱ्या या नेत्याचे जीवन, राजकारण कायमच या जाहीर सभांभोवती, पत्रकार संवादा भोवती
गरगर फिरताना दिसतंय. त्यामुळे , प्रसिद्धी लाख मिळाली, पण ज्याच्या बळावर सत्ता मिळते, ते विश्वासू साथीदार, पक्ष, संघटना,कार्यकर्ते, निष्ठावंत मतदार, हे सगळं मागे पडलं... अगदी कायमचं...
मनसेने लढवलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या तेरा पैकी बहुतांश आमदार आणि पडलेल्यांपैकी बहुतांश नेते आज मनसेत नाहीत . ते त्यामुळेच ...
कायमच 'राज' प्रेमाने भारलेल्या या पक्षाला 'राजकारण' म्हणजे काय, हे कधीच कळले नाही. त्यामुळे , त्यांचे कार्यकर्ते कॅमेऱ्यासमोर मारझोड करणे , एखाद्या ठिकाणची मोडतोड करणे , यापलीकडे जाऊ शकले नाहीत . अगदी लहान गावातील मनसे कार्यकर्ता देखील जेव्हा राज साहेबांच्या 'स्टाईल' मध्ये बोलतो , वागतो तेव्हा 'यथा राजा, तथा प्रजा' ही म्हण आठवून हसू येते ...
राज ठाकरे यांचे कालचे नवी मुंबईतील भाषण ऐकले आणि तसेच वाटले. सोबतच ‘पोपटपंची चतुर की जान, सुनो पार्वती सिरी भगवान...’ या समर्पक ओळी आठवल्या. कारण राज ठाकरे बोलतात तेव्हा त्यांच्या वक्तृत्वाला दाद द्यावीशी वाटते. पण राजकारणात केवळ वक्तृत्वाने सत्ता कशी मिळणार, त्याला संघटना बांधणारे कर्तृत्व आणि लोकहिताचे कार्यक्रम घेऊन खंबीर उभे राहणारे नेतृत्व याची जोड असावी लागते.
पण त्यांची आजवरची राजकीय वाटचाल पाहिली की जाणवते, एक देशपातळीवर जाण्याची क्षमता असलेले नेतृत्व, केवळ स्वतःच्या, स्वप्रतिमेच्या प्रेमात अडकल्यामुळे उंच झेपावले नाही... एक मराठी म्हणुन याचा खेद वाटतो !
आजही त्यांनी नेहमी प्रमाणे महाराष्ट्राच्या समस्यांचे प्रभावी वर्णन केले आणि शेवटी आपली नेहमीची इच्छा बोलून दाखवली, ‘महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, याची मी खरंच वाट पाहतोय!’
राज ठाकरे यांचे वाहतुकीवरील निरीक्षण चुकीचे नाही. वाहतुकीची बेशिस्त, बेफिकीर वाहनचालक, भ्रष्ट रस्तेबांधणी, पार्किंगचा गोंधळ आणि नियोजनशून्य शहरे हे प्रश्न खरोखर गंभीर आहेत. फुटपाथ रंगवून पार्किंग आणि नो-पार्किंगच्या जागा निश्चित करण्याची त्यांची सूचनाही विचार करण्यासारखी आहे.
पण प्रश्न असा आहे की, महाराष्ट्राला नगररचनेच्या समस्या समजावून सांगणारे आणखी एक उत्तम व्याख्याते हवे आहेत, की त्या सोडविण्यासाठी सातत्याने काम करणारे राजकीय नेतृत्व?
D j वर नाही झालं तरी त्यावर चालणाऱ्या गाण्यांवर regulation आले पाहिजेत किमान जे काही सण उत्सव चालू असतात त्या काळामध्येतरी
नवरात्र , दहीहंडी, गणेशोत्सव सणांमध्ये गाण्यांवर बंदी आलीच पाहिजे.
दुर्भाग्य ह्या समाजाचं ज्यामध्ये प्रत्येकवेळी 'स्व' ची जाणीव करून द्यावी लागते..
ना राजकारण्यांना देणं घेणं आहे, ना समाजातील मंडळांना.
कधी कधी वाटतं हे लोकं वर्गणी केवळ नाचण्यासाठी घेतात का ?
धर्माचं अधःपतन स्वतःच करणारा समाज आणि नंतर बोंब मारायची हम खतरे मैं है म्हणून
आदरणिय
घाणेरेड्या,गलिच्छ आणि खोटारड्या राजकारणी लोकांच्या जगात, मी "ठाकरेंचा" माणूस आहे ह्याचा अभिमान आहे!
राज ठाकरे डोळ्यात डोळे घालून नेहमी "खरं" बोलतो!
#Mumbai
ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती share मार्केटमध्ये पैसे घालवतो आणि Loss मधून बाहेर येण्यासाठी Training Class काढतो ; तसेच आहेत MPSC चे शिक्षक !
स्वतः नापास होऊन MPSC च्या विद्यार्थ्यांना खोटी स्वप्ने विकून त्यांना वर्षांनुवर्षे बेरोजगार ठेवण्यामध्ये हे शिक्षक जबाबदार आहेत.
#MPSC
दही हंडी आणि बाकी सणाच्या नावाखाली जे काही अश्लील चाळे चालू आहेत ते अगदी लाजिरवाणे आहे! महाराष्ट्राचा गाय पट्टा बनवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत! आपण आपलीच संस्कृती बिघडवतोय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे याला कुठेतरी जबाबदार आहेत! हे आता थांबायला पाहिजे
अर्धनग्न अवस्थेमध्ये जर का महिला दहीहंडीसाठी येऊन अंगविक्षेप करत असतील, तर हे श्रीकृष्णला तरी आवडणार आहे का? गणपतीला तरी आवडणार आहे का? - मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप
#MedhaKulkarni#Pune#Maharashtra#LatestNews#Ganpati#dahihandi
(Medha Kulkarni, Pune, Maharashtra, Ganpati, Dahihandi)
Since purchasing my HP Pavilion, I’ve repeatedly faced overheating issues. Every time, the technician applies thermal paste, after which the laptop works for a few months before the same issue returns.
@HPSupport@HP while continuing to provide justifications that are not acceptable.
I expect HP to take responsibility for the unresolved issue and provide a fair and permanent resolution without any further cost to me. @nch14404
@hp