प्रिय सत्यजित दादा, @satyajeettambe
तुमच्या सोबत नाव जोडल्यामुळे जगात किंमत मिळाली, ओळख मिळाली , शब्दाला वजन प्राप्त झाले, मान सन्मान मिळाला, तुम्ही माझ्या सारख्या सर्वसामान्य, कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या युवकाला राजकीय दृष्टया फार कठीण मानले जाणाऱ्या अहमदनगर शहरात
विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचीत आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन !
यश व अपयश दोन्ही गोष्टी पचवण्यासाठी अवघड असतात, व तीच खरी परीक्षा असते.
यश मिळालेल्यांनी संयमाने काम करावे व अपयश मिळालेल्यांनी खुल्या मनाने लोकांचा निर्णय स्विकारावा, हीच अपेक्षा.
शेवटी आपण सर्वजण समाजकारण/राजकारण हे लोकांसाठी करत असतो, व सामान्य माणूस हाच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे.
माझे मामा, राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांचा उमेदवारी अर्ज सलग नवव्यांदा आज संगमनेरकरांच्या साक्षीने भरण्यात आला.
तालुक्यात येऊ पाहणाऱ्या वाईट प्रवृत्तींना रोखून संगमनेरकर सलग नवव्यांदा बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी आपला आशीर्वाद उभा करतील, हा मला विश्वास आहे.
Senior leader of the state, my uncle, Balasaheb Thorat, has filed his nomination for the assembly for the 9th consecutive time today in the presence of and with the blessings of the people of Sangamner.
I am confident that the people of Sangamner will once again stand by him for the 9th consecutive time and he will emerge victorious !
#Sangamner
महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. पुढील महिनाभर संपूर्ण राज्यात प्रचाराचा धुमाकूळ व आश्वासनांचा पाऊस असणार आहे. या गर्दीत देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी अत्यंत जागृतीने आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.
📌कोणत्याही आमिषांना व भूलथापांना बळी न पडता महाराष्ट्राचा विकास हीच प्राथमिकता ठेवून मतदान करावे.
📌केवळ आरोप प्रत्यारोप न करता आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योग, शेती, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर बोलण्यासाठी नेत्यांना भाग पाडावे.
📌 जात, धर्म, पंथ, प्रांत या मुद्द्यांना निवडणुकीत स्थान नसावे.
📌निवडणूक प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या मनातील भावना मतभेटीतून व्यक्त कराव्यात.
The Maharashtra Assembly elections have recently been announced. For the next month, there will be an intense campaign across the state with promises being made everywhere. As responsible citizens of the country, it is crucial for all of us to perform our duties with utmost awareness.
📌Vote with Maharashtra's development as the primary focus, without falling for any false promises.
📌Encourage leaders to speak on issues like health, education, employment, industry, agriculture, women empowerment, and infrastructure.
📌Caste, religion, creed, and region should have no place in the election.
📌Participate in the election process in large numbers and express your thoughts through your vote.
#Maharashtra #AssemblyElections2024 #Elections2024 #Vote
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून माझी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. माझ्यावर विश्वास दर्शवत ही जबाबदारी सोपवणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासनाचे मनापासून आभार !
महात्मा फुले हे कृषी क्षेत्रातील आधुनिक विचारवंत म्हणून ओळखले जातात. देशाच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासाचा पाया कृषीक्षेत्राशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत आहे. भूमी व भूमिपुत्र समृद्ध झाल्याशिवाय कृषिप्रधान देशात सर्वांगीण विकास साधता येणार नाही अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या विचारांचा पाईक म्हणूनच सर्व आमदारांना वेगवेगळ्या विद्यापीठात सदस्य म्हणून संधी मिळत असताना मी आवर्जून विनंती करून महात्मा फुले कृषी विद्यापीठाची निवड केली.
संशोधनाच्या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या, अनेक प्रगतशील शेतकरी, संशोधक व अधिकारी घडवणाऱ्या विद्यापीठाचा सदस्य म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करेन.
I am honored to have been appointed to the Executive Council of Mahatma Phule Agricultural University, and I thank the university administration for trusting me with this responsibility.
Mahatma Phule, a modern thinker in agriculture, believed that progress in an agrarian country can only be achieved when the land and its farmers prosper. As a member, I will do my part to contribute to in driving agricultural transformation through research and innovation.
#MahatmaPhuleAgriculturalUniversity
A national as well as a personal loss !
My idol from the business fraternity, the epitome of ethics and values, a great businessman as well as a great humanitarian, philanthropist Ratan Tata have taken the last breath today.
I pay my homage to the great Son of Mother India. RIP ! 💐
राष्ट्रीय व वैयक्तिक क्षती !
उद्योग विश्वातील माझे आदर्श व्यक्तिमत्व, नैतिकता व मूल्यांचे उत्तुंग दीपस्तंभ, पद्मविभूषण रतन टाटा साहेब यांचे आज दुःखद निधन झाले.
भारत मातेच्या या महान सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐
#RatanTata
आपल्या नाशिक जिल्ह्याच्या दुर्गम भागातून एका आदिवासी कुटुंबातून पुढे आलेल्या दिलीप गावित या धावपटूने फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरा-ऑलिम्पिकमध्ये उत्तम खेळाचा व चिकाटीचा परिचय दिला. या सामन्यात अवघ्या 4 सेकंदांच्या फरकाने त्याचं पदक हुकलं ! परंतु ज्या जिद्दीने तो खेळला ते खरोखर प्रेरणादायी आहे.
भविष्यात पुन्हा एकदा फिनिक्सप्रमाणे भरारी घेऊन तो नक्कीच देशाला पदक मिळवून देईल, असा विश्वास आहे. त्यासाठी दिलीपला मनापासून शुभेच्छा !
#Paralympics2024 #India #DilipGavit #Nashik #Proud
1985 पासून सलग 8 वेळा गेल्या 40 वर्षांपासून संगमनेरचे यशस्वी प्रतिनिधीत्व करणारे, राज्याच्या नकाशावर संगमनेरला वेगळी ओळख निर्माण करून देणारे आमचे मामा, राज्याचे ज्येष्ठ नेते, आदरणीय बाळासाहेब थोरात यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून आज महामहिम राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मु यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !
@bb_thorat
One should be lucky to receive this kind of love ❤️
आज एक आज्जी आमच्या घरासमोरुन जात असतांना त्यांनी मला पाहिले व मला खास भेटायला आल्या. त्यांनी ज्या पध्दतीने त्यांचे प्रेम व्यक्त केले ते पाहून माझे मन भरुन आले आहे.