@pratikpawar2901 २०२३ च्या त्या कायद्यातच ही स्पष्ट अट लिहिलेली आहे की, ३३% महिला आरक्षण हे 'परिसीमन' (Delimitation) पूर्ण झाल्यानंतरच लागू होईल असा आहे, वर्ष फिक्स नाही @SandeepTikate
@pratikpawar2901 २००२ चा आयोग स्थापन झाल्यापासून अंतिम आराखडा लागू होईपर्यंत (२००८ पर्यंत) सुमारे ६ वर्षांचा कालावधी लागला होता आणि त्यात सर्व पक्षांच्या खासदारांना असोसिएटस म्हणून सहभागी करून घेतले होते. आजच्या प्रक्रियेत इतक्या मोठ्या बदलासाठी अत्यंत कमी वेळ आहे.
@WriterDeepak मेहरबाँ,मुल्क की हवा में आजकल,सत्ता के नक़्शे की बू है,जनता के मुद्दों से ज़्यादा, सीटों की गिनती की जुस्तजू है।
क़िले की प्राचीर से जो बदलते हैं लकीरें ज़मीन की,उन्हें क्या ख़बर,देश की साँसों में कितनी घुटन और लू है!
😉😉
@Villanraj007 महाराष्ट्रात केवळ 'डेटा आणि पीआर'वर दीर्घकाळ टिकता येणार नाही, तर केवळ जुन्या 'सहकार संस्थांवर'ही भविष्य घडवता येणार नाही. फडणवीसांचे अग्रेसिवनेस आणि पवारांची नेटवर्किंग कला याचा संयोग साधणारा नेताच उद्याच्या महाराष्ट्राचे नेतृत्व करेल. अजून बरंच शिकावं लागेल DF यांना.
@Villanraj007 सत्तेत असताना कोणीही प्रभावी ठरते, पण परीक्षा सत्ता, यंत्रणा नसताना होते. फडणवीस हे उत्तम विरोधी पक्षनेते नक्कीच आहेत, पण केंद्राची ताकद आणि पक्षीय यंत्रणेशिवाय शरद पवारांप्रमाणे केवळ स्वतःच्या करिष्म्यावर संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व ते सिद्ध करू शकतील का, प्रश्न आहे
@Villanraj007 राज ठाकरे हे महाराष्ट्र च्या राजकारणात एक "शापित राजहंस" आहेत,आज ना उद्या ते नक्कीच बहरून येतील, आपल राजकारण हे black n white नाहीये Gray zone मध्ये असत, आणि त्याचं राजकारण हे नेहमी black n White असा आहे.
@SanskrutiMandal मराठी भाषा आणि संस्कृती जपणे हे फक्त कलाकार आणि निर्मात्यांवर सोडणे चुकीचे आहे; जर आपण (प्रेक्षक म्हणून) मागणी (Demand) दिली, तर ते चांगले कलाकृती का नाही बनवणार?
@SanskrutiMandal बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातील अभिनेत्री (श्रद्धा कपूर) जेव्हा एका रांगड्या लोककलावंत स्त्रीची भूमिका साकारते, तेव्हा पात्राच्या लेखनात आणि संवादांत तिची 'स्टार इमेज' बाजूला ठेवून तिला पूर्णपणे 'विठाबाई' बनवण्यासाठी तुम्ही कोणते बारकावे पेरले?
@SanskrutiMandal उतेकर हे स्वतः एक उत्तम व्हिज्युअल स्टोरीटेलर आहेत. त्यांच्यासोबत 'ईठा'ची पटकथा आणि संवाद लिहिताना, कोणता असा एक प्रसंग होता जिथे तुम्हाला वाटलं की इथे संवादांची अजिबात गरज नाही, फक्त विठाबाईंच्या डोळ्यांतली वेदना किंवा घुंगरांचा आवाजच पुरेसा आहे?
@Liberal_India1 १९७६ व २००२ मध्ये परिसीमन २५ वर्षे पुढे ढकलताना सर्वपक्षीय एकमत होते. आज २०२६ मध्ये महिला आरक्षणाचे आव्हान समोर असताना आणि मित्रपक्षांनीही साथ सोडलेली असताना, ५० वर्षांपूर्वीच्याच धोरणाला चिकटून राहणे म्हणजे बदलत्या वास्तवाकडे दुर्लक्ष करणे नाही का?
@Liberal_India1 केंद्र सरकारच्या नवीन प्रस्तावाप्रमाणे, सर्वच राज्यांच्या जागा समान प्रमाणात (५०%) वाढवल्यास कोणत्याही राज्याचे नुकसान होत नाही आणि वाढत्या लोकसंख्येलाही अधिक लोकप्रतिनिधी मिळतात. त्यामुळे २५ वर्षे पूर्णपणे प्रक्रिया थांबवण्यापेक्षा हा मध्यम मार्ग अधिक व्यावहारिक नाही का?
@Liberal_India1 काँग्रेस पक्ष एकीकडे 'जितनी आबादी, उतना हक' म्हणतो, आणि दुसरीकडे परिसीमनासाठी १९७१ प्रमाणेच पुढील २५ वर्षे 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याची मागणी करतो. लोकसंख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या राज्यांना न्याय देताना काँग्रेसच्या या दोन्ही भूमिकांमध्ये वैचारिक विसंगती दिसत नाही का?
@WriterDeepak खरयं तुमच.
एकाच गोष्टीची गरज आहे'स्वाभिमानाची'!
जोपर्यंत आपण आपल्या हक्काच्या सुविधांना नेत्यांचे उपकार मानतो, तोपर्यंत हे बदलणार नाही. ज्या दिवशी सामान्य माणूस "मी कर भरतो, मला हिशोब हवा" या भूमिकेत येईल, त्या दिवशी आदर्शवाद वास्तवात उतरेल.
आणीबाणी ते अण्णा आंदोलन हेच दिसतं.
@Prasaadhere अमित शाह म्हणाले की, "विरोधी पक्षांनी आज हे विधेयक मंजूर करण्याची तयारी दर्शवावी; मी पुढच्या एक तासाच्या आत तुम्हाला हे लेखी (in writing) देण्यास तयार आहे. हेचण आजच्या bill मध्ये offical आलं आहे
@Prasaadhere वेणुगोपाल यांनी अमित शाह यांना विचारले की, "आगामी मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये (Delimitation) सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा जागांमध्ये ५०% वाढ केली जाईल, अशी लेखी हमी (Written Assurance) तुम्ही सभागृहाला देणार का?"
@xbuwa सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश – अध्यक्ष.
मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी नियुक्त केलेले निवडणूक आयुक्त.
संबंधित राज्यांचे राज्य निवडणूक आयुक्त.