पूनम ताई महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
उत्तर मध्य मुंबई जिल्हा हा कॉंग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला असतानाही सलग २ वेळा खासदार म्हणून निवडून येत पूनम ताई महाजन यांनी आपल्या नेतृत्वाची छाप जनमानसात उमटवली.
खासदार म्हणून त्यांनी मुंबई आणि मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव काम केले. त्यांच्या कार्यकाळात शेकडो मंदिरांचे बांधकाम, जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आले.
दुर्दैवाने यंदा उमेदवारी नाकारली गेली, तरीही त्या जनतेत अत्यंत लोकप्रिय असून विविध कार्यक्रमांना सक्रिय उपस्थिती लावत आहेत.
पूनम ताई महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
#PoonamMahajan #HappyBirthday #BJP #Mumbai #Leadership #Vikas #LokSabha #Mahajan #WomenInPolitics #PublicService #TempleRenovation #MumbaiDevelopment #ANILGALGALIRTI #AnilGalgali #Mumbai
"Happy Birthday, Shri Anil Dada Galgali ji! Wishing a remarkable RTI activist and dedicated social worker like you a day filled with joy, love, and appreciation. Here's to another year of creating positive change and empowering communities! 🌟🎂"
प्रमोद महाजन, नेल्सन मंडेला आणि मराठी साहित्य संमेलन !
विश्वास पाटील
काही माणसे फक्त जीवनभर स्वप्ने पाहतात. त्यापैकी फारच थोडे असे असतात, जे पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्याचा भीम पराक्रम करून दाखवतात. प्रमोद महाजन हे त्यापैकी एक होते.
1998 मध्ये परळी वैजनाथ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार होते, त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विनोदी साहित्यिक प्रा. द.मा. मिरासदार यांची निवडही झाली होती. साहित्य संमेलनाच्या तयारीला सुरुवात झाली. तेव्हा नेहमीप्रमाणेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण अशी चर्चा सुरू झाली.
त्या आम्ही काही वर्षांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि जगप्रसिद्ध नेल्सन मंडेला यांची दीर्घ कालावधी नंतर कारावासातून मुक्तता झाली होती. जगभर गवगवा होणाऱ्या या महान नेल्सन मंडेलाना आपल्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आणायला काय हरकत आहे, असा विचार मी एकदा सहज मुंबईत बोलून दाखवला.
परळीच्या साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी तेव्हा मुंबईत एक कार्यालय उघडले गेले होते. ते नेमके दादरला शिवसेना भवनच्या शेजारच्या पेट्रोलपंपा समोरच्याच एका माडीवर होते. तिथे आम्ही सारे जमत असू. नेमक्या त्या दिवसात “चंद्रलेखा” नाट्य संस्थेकडून नव्याने रंगभूमीवर येणाऱ्या माझ्या “पानिपतचे रणांगण” या नाटकाच्या तालमी सुरू होत्या. त्या तालमी पलीकडे भूपेश गुप्ता भवनमध्ये होत असत. संमेलनाशी संबंधित कार्यकर्ते व माझ्या नाटकाचे दिग्दर्शक वामन केंद्रे तसेच माणिक मुंडे वगैरे मंडळी आम्ही या संमेलनाच्या कार्यालयामध्ये रोज संध्याकाळी जमत असू. चर्चा करत असू.
एके दिवशी मला वामन आणि माणिकने माझी स्वागताध्यक्षपदाची भन्नाट शिफारस केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांचे पर्यंत पोचल्याचे सांगितले. अन दोन दिवसातच मला प्रमोदजींचा फोन आला, “तुमची शिफारस अफलातून आहे. पण अवघ्या तीन आठवडे ते एक महिन्यामध्ये एवढा मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बडा पाहुणा आणणे खूप मुश्कील आहे. तरी सुद्धा परराष्ट्र खात्याशी बोलून मी चाचपणी केली होती. तुमचे सजेशन मात्र बेहतरीन. दिल्लीला आलात की जरूर भेटा. मला आवडेल.”
तेव्हा गोपीनाथराव मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते. परळीचे साहित्य संमेलन मोठ्या थाटात पार पडले. इकडे माझ्या “रणांगण” या नाटकाला सुद्धा तुफान यश लाभले.
दोन महिन्यांनी दिल्लीला गेलो असताना मी प्रमोदजींना भेटलो. मंडेलांच्या त्या आठवणीने ते पुन्हा खळखळून हसले. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांना त्यांनी तो किस्साही ऐकवला. माझ्या “पानिपत” कादंबरीची प्रशंसा करून बऱ्याच वर्षांनी मराठीत असे सकस सुंदर वाचल्याचे त्यांनी सांगितले. पण त्याच वेळी त्यांनी आठवण करून दिली की, ” 1990 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपचे आमदार एवढ्या बहुसंख्येने निवडून आले होते. तेव्हा मुंबईत युतीच्या आमदाराना संबोधित करताना मी माझ्या भाषणात म्हणालो होतो की, सध्या महाराष्ट्रापुढे फक्त दोनच प्रचंड औत्सुक्याचे आणि कौतुकाचे विषय आहेत. एक म्हणजे ‘युती’ आणि दुसरी ‘पानिपत कादंबरी”.
तेव्हा मी नम्रपणे अनेकांकडून तो किस्सा ऐकल्याचे त्यांना सांगितले. एका साहित्यकृतीचा एका महत्त्वाच्या राजकीय घटने सोबत त्यांनी जाणीवपूर्वक उल्लेख केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले.
प्रमोदजिंकडे चहापान झाले. पुन्हा नेल्सन मेंडेलांचा विषय निघाला. ते म्हणाले, “मी अनेक ठिकाणी वाचले आहे की, मंडेलांच्या जीवनाची प्रेरणा आपले गांधीजी होतेच. पण सुभाषचंद्र बोस सुद्धा त्यांचे प्रेरणास्थान होते.”
प्रमोदजींचा निरोप घेताना ते म्हणाले, “शेवटी मंडेला यांच्या तोलामोलाचा पाहूणा पुढे कधीतरी मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून आणायला काय हरकत आहे ? एकीकडे जर आपण आपली मराठी भाषा ही जगातल्या दहा अकरा श्रेष्ठ भाषांपैकी एक आहे असे गौरवाने सांगतो, तर तिचा सन्मानही तसाच तोऱ्यात झाला पाहिजे. पुढे मागे पुन्हा मराठवाड्यात परळी सारखेच मोठे साहित्य संमेलन भरवू. तेथे प्रमुख पाहुणे म्हणून मंडेलानाच बोलावू. होऊन जाऊ दे , काय आहे त्याच्यात ? अमृताशी पैजा जिंकणाऱ्या आपल्या भाषेचा जागतिक स्तरावर आपणच रेटून सन्मान करायला हवा. करू काय आहे त्याच्यात ? हा, फक्त तोपर्यंत तुम्ही आम्ही आणि मंडेला सगळे हयात असायला हवेत इतकेच . दुसरा अडथळा काहीच नाही.”
पुढे अचानक सर्वांचा निरोप घेऊन प्रमोदजी हे जग सोडून गेले. परळीकडच्या एका शिक्षकाचा मुलगा ते ‘“प्रमोद महाजन” होण्या पर्यंतचा त्यांचा प्रवास तसा कोणाही मराठी माणसासाठी स्स्तिमितच करणार होता.
2019 मध्ये मी दक्षिण आफ्रिकेला गेलो होतो. तेव्हा मंडेलांना ज्या रॉबिन नावाच्या बेटावर दीर्घकाळ तुरुंगात ठेवले होते. त्या बेटावरची ती कोठडी पाहायला मी त्या बेटाची सफर केली होती. मंडेलांची ती बराक बघताना तिथे मात्र मला प्रकर्षाने प्रमोदजी आठवले. त्यांचा तो प्रफुलित चेहरा, त्यावरचा सततचा खळाळता उत्साह, डोळ्यातला एक विजयी लखलखता नूर आणि “काय आहे त्याच्यात एवढे” अशा शब्दातून पाझरणारा प्रचंड आत्मविश्वास आठवला.
अनेकदा त्यांच्या त्या भेटीतील मुखातून बाहेर पडलेला
“ फक्त तुम्ही आम्ही सारे हयात असायला हवं “ हा संवाद जेव्हा आठवतो. तेव्हा मन विषन्न होते. अद्भुत आणि अकल्पित कळीकाळाचीच नाळ कुठे तरी मनुष्यमात्राशी जोडली गेलेली असते, याची प्रचिती मात्र पुन्ह: पुन्हा येते.
- विश्वास पाटील
@WestlandBooks@saamTVnews
@News18lokmat
@abpmajhatv@zee24taasnews@ZeeNews@TV9Marathi@mehtapublishing
#VishwasPatil #PramodMahajan #NelsonMandela #VishwasPatil #MarathiLiterature #LiteraryMemories #InspiringLeaders #LiteraryLegends #GlobalInspiration #MarathiPride #UnforgettableMoments #LeadershipJourney #MandelaLegacy #MarathiSahitya #CulturalIcons #TimelessStories #ResilienceAndDreams #HistoricalReflections #IndianPolitics #GlobalIcons #LegacyOfGreats
Military Stations of Jammu, Pathankot and Udhampur in proximity to the International Boundary, in Jammu & Kashmir targeted by Pakistan using missiles and drones.
No losses.
Threat neutralised by #IndianArmedForces as per SoP with kinetic & non-kinetic means.
#OpSindoor
#IndianArmedForces
#OperationalCapability
@DefenceMinIndia@SethSanjayMP@MEAIndia@MIB_India@SpokespersonMoD
मा. खासदार पूनमताई महाजन यांच्या पुढाकाराने चांदीवली, सुंदरबाग, अंबिका नगर येथील शिवशक्ती-भीमशक्ती मित्र मंडळ संचालित श्री शिव मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आला. या जीर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिराचे लोकार्पण आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले.
महाराष्ट्र में BJP की बड़ी जीत में, RSS की रणनीति और चुनाव प्रबंधन की अहम भूमिका रही. संघ ने micro-planning की और इसके लिए अलग-अलग नेताओं को ज़िम्मेदारी दी गई. इनमें केंद्रीय मंत्री @KirenRijiju से पूर्व सांसद @poonam_mahajan तक शामिल रहे
16 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजता आपले माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी #MeraBoothSabseMajboot अभियानांतर्गत महाराष्ट्रातील बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी #NaMoApp द्वारे थेट संवाद साधणार आहेत.
आपण आपले प्रश्न सुचवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://t.co/6JYaTRGTo2
माजी खा. पूनमताई महाजन यांनी 23 सप्टेंबर रोजी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालय येथे आयोजित " भारत महासत्ता निर्मितीत आपला सहभाग " कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन केले.
सदर वृत्त दैनिक देशदूत, पुण्यनगरी, सकाळ आणि नवराष्ट्र म्हणते प्रसिद्ध झाले.
@poonam_mahajan@BJP4Maharashtra@ChitraKWagh@Dev_Fadnavis@narendramodi@BJPMM4Maha@BJP4India
आज जळगाव प्रवासात “भारत - महासत्ता निर्मितीत आपला सहभाग” या विषयावर प्राध्यापक, शिक्षक आणि विचारवंतांसोबत झालेल्या संवाद कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत केलेली चर्चा समृद्ध करणारी ठरली.
शिरपूर येथील SPDM कॅम्पस मधील महाराणी अहिल्यादेवी होळकर फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत “भारत@2047 - संधी आणि सहभाग” या विषयावर चर्चा करणाऱ्या प्रेरणादायी सत्रात या संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषारजी रंधे यांच्यासमवेत सहभागी झाले.
आपले युवा पिढी उज्वल भविष्य घडवण्यात सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे पाहणे आनंददायक आणि प्रेरणादायी आहे.