संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२६०७०१
प्रति,
डॉ.सुवर्णा खरात
सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत.
माननीय महोदया,
नगर विकास विभागा अंतर्गत नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार (गट-ब/राजपत्रित) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण १४८ रिक्त पदे भरण्याबाबत मागणीपत्र दि. १० जून, २०२४ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी गेल्या २ वर्षांहून अधिक काळासाठी सदर जाहिरातीची प्रतीक्षा करत आहे. तसेच ग्रामीण भागातून आलेल्या अभ्यासासाठी व परीक्षेच्या तयारीसाठी शहरी ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या हजारो उमेदवारांची भरतीबाबत होणाऱ्या विलंबामुळे दिवसेंदिवस अनाठायी आर्थिक ओढाताण होत आहे. आगामी विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध व्हावी हि या तरुणांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि सदर जाहिरात आदर्श आचारसंहितेपूर्वी प्रकाशित व्हावी या मागणीचा विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा.
@Drsuvarnas@mpsc_office #MPSC #Maharashtra #Exams #DhananjayShinde
प्रति,
डॉ.सुवर्णा खरात(सचिव),
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात आदर्श आचासंहितेपूर्वी प्रकाशित करणेबाबत.