UGC व महाराष्ट्र सरकार अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत ठाम निर्णय घेतील तेव्हा घेतील. पण या दोघांच्या वादात, विद्यार्थ्यांची अवस्था मात्र एखाद्या चेंडुप्रमाणे झाली आहे.
#AntiStudentsUGC#CancelFinalYearExams
तणावपूर्ण वातावरणामध्ये परीक्षा घेण्याच्या UGC च्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ न करता, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आधी झालेल्या सत्र परीक्षांच्या गुणांच्या सरासरी नुसार मूल्यांकन करून निकाल जाहीर करावेत.
#AntiStudentsUGC#CancelFinalYearExams
UGC आणि राज्य सरकार यांच्यातील वादामुळे विद्यार्थी द्विधा मनस्थितीत जगत आहेत. सरकारने केवळ परीक्षा घेण्यापोटी विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ करता कामा नये, व राज्यातील परीक्षा व मुल्यांकनाबाबत त्वरित निर्णय घ्यावा.
#AntiStudentsUGC
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरूंच्या वाहनचालकासह १६ अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सव्वा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा या काळात कशी घेणार असा सवाल या वेळी विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.